मभागौदि २०२५ :- लहान मुलांसाठी गंमतखेळ - शॉर्ट्स/रिल्स बनवणे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 22 February, 2025 - 00:40

काय छोट्या दोस्तांनो?

कसे आहात सगळे?

तुमच्यासाठी एक सुंदर खेळ घेऊन आलो आहोत.

ह्या खेळात तुम्हाला रील्स /शॉर्ट व्हिडिओझ बनवायचे आहेत बरं का!
खूप मजा येईल ना!
आपले आईबाबा किंवा घरातील कोणत्याही मोठ्या माणसांची मदत घ्यायची. कारण त्यांचा मोबाईल वापरायचा आहे ना आपल्याला ?
पण म्हणजे नेमकं काय करायचं?
सोपं आहे.

तुम्हाला येत असलेली कविता, गाणे, बडबडगीत, संवाद, कथा, लेख असं *मराठी* साहित्य छोट्या लांबीच्या चित्रफितीच्या माध्यमात कैद करायचं , म्हणजे रीलचं शूटिंग करायचं.
एका गोष्टीची काळजी घ्यायची की विडिओचे चित्र आणि आवाज स्पष्ट असावेत.

उत्साहाने भाग घ्यायचा ना?

चला तर मग मायबोलीच्या तूनळी मार्गिका (youtubeचॅनेल)ला आवड(Like ) दर्शवूया , प्रतिसाद(कंमेंट) देऊया, अग्रेषित(share ) करूया आणि सभासद(subscribe) बनूया!

नियम :
१. व्हिडिओ मध्ये वापरले गेलेले संगीत / गाणे / content मायबोलीच्या कॅापीराईट पॅालिसी सांभाळून वापरलेला असावा.

२. आपली प्रवेशिका mp4 स्वरूपा मध्ये sanyojak@maayboli.com ई-मेल पत्त्यावर पाठवावी. फाईल साईझ २० mb पेक्षा जास्त असेल तर drive/Dropbox/weshare सारख्या माध्यमातून पाठवावी.

३. ई-मेल मध्ये आपले नाव, मायबोली आयडी आणि काय सादर केले आहे ह्याचे शीर्षक नमूद करावे.

४. पूर्वप्रकाशित व्हिडिओ असेल तरी चालेल. त्याची link न देता दिलेल्या फॉरमॅट मधली फाईल पाठवावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users