साहित्य

चार जखमा काळजावर गोंदल्या

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 20 April, 2020 - 10:06

चार जखमा काळजावर गोंदल्या
- महेश मोरे (स्वच्छंदी)

चार......ओठांवर खुबीने पेरल्या
चार जखमा काळजावर गोंदल्या

बोलले नाही कुणी दोघांतले
पापण्या.. पण आसवांनी बोलल्या

वेळ आली एवढी काट्यावरी
पाकळ्यासुद्धा छळाया लागल्या

मी तुझ्या चौकात जेव्हा थांबलो
चालणाऱ्या चार वाटा थांबल्या

वादळाला त्रास होतो ना ? म्हणुन
मीच उघड्या दोन खिडक्या ठेवल्या

बाप लेकींना जसा सांभाळतो
मी तशा सल-वेदना सांभाळल्या

शेवटी आला तुझा आवाज अन्
मिट्ट काळोखात पणत्या पेटल्या

चक्रम माणसाशी कसे वागावे?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 20 April, 2020 - 02:26

समाजात वावरताना आपण काही माणसांशी संपर्क किंवा संवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो. ती माणसे आपली शत्रू असतातच अशातला भाग नाही. पण ती माणसे unpredictable असतात. आपल्याला ती कसा प्रतिसाद देतील याचा आपल्याला अंदाज नसतो. मग कशाला आ बैल मुझे मार करा. उगीच स्वत:चा अपमान करुन घ्यायला कुणी सांगितलय? असा विचार त्यामागे असतो. एका अर्थाने आपण त्यांना घाबरत असतो. आपण त्यांना विक्षिप्त किंवा तर्‍हेवाईक म्हणतो. किंवा सोप्या भाषेत चक्रम म्हणतो. खर तर आपण देखील काहीबाबतीत काही वेळा चक्रमपणा करत असतो. पण तो आपल्या लक्षात येतोच अशातला भाग नाही. कधीकधी काही चक्रम माणसे आपल्याबरोबर आपल्या घरातच राहत असतात.

नाती जपायला हवीत!

Submitted by पराग र. लोणकर on 20 April, 2020 - 01:13

असलेली कडू गोड नाती
आवर्जून जपायला हवी
झालेल्या नात्यांच्या गुंत्यांची
सोडवणूक करायला हवी...

स्वार्थाच्या या सागरामध्ये
एकेकटे पडलेले सारे
वादळातली आपली बोट
नात्यांच्या मदतीने तरायला हवी...

आई-वडील, भाऊ आणि बहीणी,
रक्ताचे धागे इतर सारे
मित्र, सोबती, सखे सोयरे
घट्ट पकडून ठेवायला हवे...

नात्यांचा आधार मोठा
जुन्या पिढीने अनुभवलेला,
आज घरोघरी एकेक अपत्य
आहे धोका फारच मोठा...

नात्यांची माणसं कमी होणं
हक्काची दारं लुप्त होणं
एकाकी हे जीवन जगणं
प्रयत्नांनी थांबवायला हवं...

शब्दखुणा: 

पावसातले ते क्षण

Submitted by Kajal mayekar on 15 April, 2020 - 15:14

आज पाऊस येईल वाटते सकाळपासून मळभ आहे... अजय विचारात बस स्टँडवर येऊन पोहोचला. अरेच्चा हे काय आज इथे कोणीच कसे काय नाही... रस्त्यावर माणसांची वर्दळही फारच कमी आहे... अजय रस्त्यावर दूरवर नजर टाकत म्हणाला. जाऊदे ना आपल्याला काय उलट आरामात बसून घरी पोहचेन नाहीतर काय त्या बसमध्ये गर्दी असते... अजय विचारात होताच कि इतक्यात वारा जोरात वाहू लागला. वातावरणात बराच फरक अजयला जाणवला.

घरी पोहोचेपर्यंत पाऊस नको येऊदे रे देवा... अजयच्या मनात विचार चालूच होता इतक्यात त्याला समोरून एक मुलगी स्वतःची ओढणी सावरत येताना दिसली. ती मुलगी अजय थांबलेल्या बस स्टँड जवळच येत होती.

ती रात्र

Submitted by सागर J. on 15 April, 2020 - 07:07

'आई काय ग हे !.काय सारखा सारखा लहान मुली सारखा मला घरी लवकर यायला सांगता .मी मोठी आहे आता '
' सोन्या तुझी काळजी वाटते आम्हाला म्हणून सांगते.आणि हो ...बाबा येणारेत बरका तुला दररोज तुला क्लास मधून आणायला .....
निशाची आई तिला समजावत समजावत होती .तिच्या बोलण्यातून खूप काळजी व्यक्त होत होती . निशाचे आई समोर काही चालले नाही .निशाला माहीत होते की काही दिवसा पासून आई आणि बाबा थोडे काळजीत दिसत आहेत .कारण हि तसेच होते .काही दिवसांपुर्वीच ती बातमी आली होती ...

विषय: 

माझी लाडकी ओम्नी!

Submitted by पराग र. लोणकर on 14 April, 2020 - 08:39

(साधारण चौदाएक वर्षांपूर्वी (२००५-०६च्या सुमारास) लिहिलेला हा लेख आहे.)

`आपल्याला मुलगी असती, तर तिच्या लग्नप्रसंगी तिला निरोप देताना, ती सासरी गेल्यावर तुमचं काय झालं असतं?` माझ्या पत्नीचं मला हे असं डिवचणं हल्ली सतत चालूच असतं.

हे असं चालू झालंय साधारण वर्षांपूर्वीपासून!

मी माझी मारुती Van विकल्यापासून...

मी माझी लाडकी मारुती व्हॅन विकल्यापासून...

शब्दखुणा: 

आहे तो माझा नाही

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 13 April, 2020 - 04:53

आहे तो माझा नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)

घुटमळतो देहामध्ये तो श्वास स्वत:चा नाही
होता तो माझा नव्हता, आहे तो माझा नाही

पडद्यावर दिसते आहे ती खरी जिंदगी नाही
जो समोर दिसतो आहे तो खरा चेहरा नाही

तू विचार करायचा ना मज चुंबायाच्या आधी
सोडेन हातची संधी इतका मी साधा नाही

तू टप्प्यामध्ये माझ्या आल्यावर मरणारच ना ?
मी वजीर होतो वेड्या कुठलासा प्यादा नाही

शब्दांनी देऊ शकतो मी मनासारखे उत्तर
पण प्रश्न तिच्या मौनाचा तितकासा सोपा नाही

शब्दखुणा: 

प्रवास यशाकडचा!

Submitted by पराग र. लोणकर on 13 April, 2020 - 04:50

अवास्तव स्वप्नांच्या विश्वात
मी कधी वावरलोच नाही
वास्तवाचे भान माझ्या
मी कधी विसरलोच नाही

मर्यांदांची जाण माझ्या
सदा ठेवुनी मनी
प्रयत्नांची कास माझ्या
मी कधी सोडलीच नाही

असंख्य आली अपयशे
झाल्या अनेक उपेक्षा
यशाची त्या आस माझ्या
मी कधी गमावलीच नाही

दीर्घ अशा या प्रवासात
झाल्या अनेक जखमा
चिकाटीच्या औषधाने
त्या भरल्यात आता

ठेवलेल्या संयमाची
दिसू लागलीत फळे
जागोजागी दिसू लागलेत
आता यशाचे मळे...

***

शब्दखुणा: 

©राक्षसमंदिर - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 13 April, 2020 - 03:27

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

Pages

Subscribe to RSS - साहित्य