ती रात्र

Submitted by सागर J. on 15 April, 2020 - 07:07

'आई काय ग हे !.काय सारखा सारखा लहान मुली सारखा मला घरी लवकर यायला सांगता .मी मोठी आहे आता '
' सोन्या तुझी काळजी वाटते आम्हाला म्हणून सांगते.आणि हो ...बाबा येणारेत बरका तुला दररोज तुला क्लास मधून आणायला .....
निशाची आई तिला समजावत समजावत होती .तिच्या बोलण्यातून खूप काळजी व्यक्त होत होती . निशाचे आई समोर काही चालले नाही .निशाला माहीत होते की काही दिवसा पासून आई आणि बाबा थोडे काळजीत दिसत आहेत .कारण हि तसेच होते .काही दिवसांपुर्वीच ती बातमी आली होती ...

14 वर्ष्याच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिला मारले .....
मुलीचा म्रूतदेह जळालेल्या अवस्थेत ..नराधम  फरार.......

 

ह्या बातमीने निशाच्या कुटुंबातले सर्व जण काळजीत पडले होते .निशा सद्या अकरावीच्या वर्गात होती . निशा हि हळू हळू तारुण्यात येत होती .स्त्री मध्ये असणारे लक्षण पण तिच्यात दिसू लागले होते , ती दिसायला हि सुंदर होती . आपली मुलगी सुरक्षित राहावी हि काळजी आई वडिलांना असतेच . त्या काळजी पोटीच बाबानी ठरवले होते कि ते निशाला दररोज रात्री ८ वाजता ट्युशन वरून घरी घेऊन येणार होते . जेंव्हा पासून ती बातमी आली तिची आई तर खूप वेड्या सारखी वागायलीय असे निशा ला वाटत होते . जरा नेहमी पेक्षा १० मिनिटे जास्त झाले कि तिची आई पार त्यांच्या कॉलनी च्या कमानी पर्यंत तिच्या भावाला घेऊन यायची तिची वाट बघत .....

निशा नि आई ला खूप समजावण्याचा प्रयत्न  केला , तरी आई ऐकलं तर शप्पत ..... आईने  बाबांच्या मागे लागून त्याना निशाला ट्युशन मधून वापस आणण्यास तर केले होते . निशाला आई ची काळजी समजत नव्हती असं काही नव्हतं पण बाबा ट्युशन ला येणे जरा अतीच वाटत होते तिला .तिच्या सर्व मैत्रिणी ट्युशन जवळच हॉस्टेल वर राहत होत्या .त्या तिला हसतील अशी भीती निशा ला  वाटत होती .तस ट्युशन घरापासून ३ किलोमीटर तर दूर होती . ती आता पर्यंत दररोज सायकल वर ये जा करतच होती ना , वरून वरून जरी निशा धीटपणे वागत होती तरी कुठेना कुठे तरी तिच्या मनात पण भीती  होतीच. तिच्या मैत्रिणीना  पण ह्या वातावरणात थोडं  असुरक्षित वाटत होता .कॉलेज आणि ट्युशन च्या सरानी पण सर्व मुलींना काळजी घेण्यास सांगितलं होते .

काही दिवसांनी निशा चा मावस भाऊ अरुण काही दिवसांसाठी त्यांच्या कडे राहायला आला होता. निशा ला तिचा अरुण भैया खूप आवडायचा म्हणून मग निशा पण खूप खुश झाली . जेवण झाल्यावर तिच्या भैयाला तिने आई ची काळजी सांगितली . हे ऐकून अरुण विचारात पडला आणि म्हणाला

' मग निशा ने कराटे क्लास का नाही लावला . तिला थोडा तर सेल्फ डिफेन्स आला पाहिजे  '

' अरे अरुण निशाची बारावी आहे पुढच्या वर्षी , तिला कॉलेज आणि ट्युशन करून अभ्यासाला पण वेळ भेटत नाही मग कसा ?'

पण अरुण ने निशा आणि घरच्याना कराटे क्लास साठी तयार केले होते . जवळच्या कॉलोनीतली ताई क्लास घेत होती . अश्या प्रकारे निशा क्लास ला जाऊ लागली .अरुण ने जाताना निशाला पेपर स्प्रे पण गिफ्ट दिला . हि गोष्ट निशाला गमतीची वाटली पण ती काही बोलली नाही .

एक वर्षांनी ....................

निशाची रात्री ची ट्युशन सुटली होती . निशा ला बाबा दिसलेच नाही . बाबांची वाट पाहत निशा तिथेच उभी होती . निशा सोबत असलेली तिची मैत्रीण तिला थोड्या  वेळ हॉस्टेल वर  घेऊन जायचा म्हणत होती पण बाबा ना समजणार नाही ते काळजीत पडतील असा वाटून निशा तिथेच थांबली .तिची मैत्रीण  पण झोप येत असल्याने होस्टेल ला निघून गेली .

रात्र वाढत जात होती तरी बाबा का येत नाहीत म्हणून निशा ला काळजी वाटत होती . सगळीकडे सामसूम .......एवढा उशीर बाबा कधीच करत नव्हते . ते नेहमी ट्युशन सुटायच्या अगोदर रोडला उभे असायचे , पण आज काय झाले .... रात्र वाढत होती हिवाळ्याचे दिवस होते ते ...थंड वारा सुटला होता ..तिची ट्युशन तिच्या शहराच्या थोडी बाजूला पडत होती . आजूबाजूला काही वस्ती नव्हती . काही बिल्डिंग चे काम चालू होते बाजूला पण तिथे पण दिवसाचं लगबग असायची ....

अचानक निशाच्या लक्षात आले बाबा ना सकाळी काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते पण ते रात्री येणार होते . ते अजून आलेच नसतील तर ......

निशाने एकटच घरी जायचा ठरवलं आणि ती घराच्या दिशेने जाऊ लागली . निशाला आता खूप भीती वाटत होती . तिची सावली पण तिला घाबरवत होती कधी कधी, ती तशीच शांत जीवघेण्या वातावरणात पुढे जात होती आणि एका कॉर्नर वर तीन मुलं गप्पा मारत उभे होते .तोंडाला मफलर गुंडाळली होती त्यांनी.  त्यांच्या हातात दारूच्या बोत्तल दिसत होत्या . हे पाहून निशा खूप घाबरली . त्यानं मुलांनी निशाकडे पहिले आणि एकमेकांना काहीतरी बोलून हसत टाळी दिली . ते निशाकडे येऊ लागले . हे पाहून तिच्या हृदयात धड धड वाढू लागली . आजूबाजूला वाचवणारे कोणीच नव्हते . निशा जिवाच्या आकांताने पळत सुटली . ते लांडगे पण तिच्या मागे पळू लागले . ते काही ओरडत होते पण निशाला ला काहीच ऐकू येत नव्हते . आता ह्यांच्या तावडीत सापडलो तर हे माझ्यावर....................नाही नाही ...मला घरी जायचंय..... आई च्या कुशीत शिरायचं आहे ... बाबा कुठे आहेत तुम्ही , मला घ्यायला या ना ......निशाला खूप रडू येत होते पण ती तशीच पळत सुटली होती . मुख्य रस्ता सोडून ती कच्या रस्त्यावर पळत सुटली होती . कडेला असलेले काटेरी झुडपे पण तिला जखमा करत होते . मागे पळणारा एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि आणि अचानक तिच्या हातानी त्याला जोरात गुद्दा मारून खाली पाडले ..अरे हे काय ...अरे हो मला कराटे येतात कि ... त्याही वेळेस तिला आपण कराटे शिकल्याचे समाधान वाटले ..पण भीती तर अजूनही होतीच . तिने पडलेल्या मुलाला जोरात लाथ घातली आणि पुढे पळू लागली मागून अजून पण दोघं येत होतेच . दोघं एकदम आले तर आपले काहीच खर  नाही ........तिला एक मंदिर दिसले . छोटेसे होते ती त्याच्या मागे जाऊन लपली . निशा खूप थकली होती , चक्कर येऊन पडतेय का काय असे तिला वाटत होते ...पण आता निशाने  लढायचे ठरवले .कोण कुठले लोक ...ह्याना माझी अब्रू का म्हणून घेऊ द्यायची ...मला मोठा डॉक्टर व्हायचय ....मग माझा स्वप्नं  असच तोडू देऊ कुणाला पण ...

ती मुला जवळ आली .निशाने बाजूला पडलेली दगड त्याना मारायला सुरवात केली . ते मूल दगडी लागल्यामुले मागे सरकले .त्यांच्या बोलण्यातुन ते तिला सोडणार नाहीत असा निशाला ऐकू येत होते .भिती तर खूप वाटत होती तिला .पूर्ण अंग थरथरत होते ...पण आता नाही .....
एक मुलगा मागून जवळ आली तशी तिने एक जोरात लाथ तिच्या कंबरेत घातली .तो ओरडत खाली कोसळला .इतक्यात निशा ला तिच्या भय्या ने दिलेला पेपर स्प्रे आठवला ..तिने चपळाईने तो बाहेर काढून मागच्या मुलाच्या तोंडावर मारला . आणि त्याला खाली पाडले . दोन्ही मुला बेशुद्ध झाली होती निशाच्या मारामुले .निशा तिथून पळत सुटली ते थेट घरी येई पर्यंत थांबली नाही . आई तर घरच्या दरवाज्याला उभी होती .आजूबाजूचे लोक पण होते वाटत ...आई ला बघून तिचा बांध फुटला ,पळत आई च्या कुशीत गेली आणि निशा ची शुद्ध हरपली ......
जेंव्हा निशा जागी झाली तेंवा तिच्या जवळ आई बाबा , आणि अरुण भैया पण होता . तिने आपल्या सोबत झालेले सर्व त्याना सांगितले . तिच्या सांगण्याचा नुसार पोलिसांनी घटना स्थळी जाऊन त्या मुलांना अटक केली .कठीण परिस्थिती मध्ये निशाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत होते .......
  निशाने एक गोष्ट ठरवलेली होती की ती जमेल तेवढ्या मुलींना सेल्फ डिफेन्स (कराटे ) शिकण्यास प्रव्रूत करणार होती .जेंव्हा मुली ते शिकतील तेंवा त्या स्वतःचा बचाव नक्की करू शकतील हे निशा ला स्वः अनुभवाने लक्षात आले होते .

अबला स्त्री  सुध्धा मां दूर्गेचे रूप धरण करू शकते तशी वेळ आल्यावर ...........
पानिपत चित्रपटातील गीताच्या नारी बद्धल काही ओळी

दुविधा के आगे जब नारी जागे हिम्मत से काम ले
चूड़ी उतार कंगन उतार तलवार थाम ले

© सागर J.

नमस्कार मंडळी कथा आवडली असेल तर किंवा काही चुका झाल्या असतील तर नक्की सांगा. आणि माझ्या दुसऱ्या कथा ही पाहा . तुमच्या सहकार्यानेच स्वतः तील लेखक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
मी ईथेपन www.marathirt.in

 

 

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users