साहित्य
©राक्षसमंदिर - ५
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084
द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new
तृतीय भाग -
https://www.maayboli.com/node/74100
वारसा
रात्रीचे बारा वाजले होते .गोल गरगरीत चंद्र पांढराशुभ्र प्रकाश संपूर्ण धरतीवर फेकत होता . गावाबाहेर असलेल्या डेरेदार वडाच्या झाडाखाली एक म्हातारी गुडघ्यात मस्तक घालून बसली होती . भेसुर आवाजात ती रडत होती . चंद्राचा प्रकाशामुळे पडणाऱ्या पारंब्याच्या सावल्या वाहणार्या वार्याबरोबर सळसळत होत्या . त्या सळसळत्या सावल्यांचं एक वेगळंच चित्र तयार होत होतं . म्हातारीचा रडण्याचा आवाज हळूहळू कमी झाला . तिला तिच्यासमोर काहीतरी हालचाल जाणवली . पारंब्यांच्या सावल्यातून काहीतरी आकार धारण करत जमिनीवर उभा राहत होतं .
चिनी पाहुणा
चिनी पाहुणा
शपथ घालतो तुला माणसा
टाकू नकोस पाऊल पुढे
लक्ष्मणरेषा उंबरठ्याची
ओलांडुनी जाशील कुठे?
कोरोनाचा चीनी रावण
मागतो भिक्षा दारोदारी
नका फसू चिनी नाटक्या
रक्षा करा राहून घरी
साम्यवादी चिनी पाहुणा
जेष्ठ-श्रेष्ठ ना भेद करी
सुष्ट-दुष्ट समान सगळे
सगळ्यांशी हा करतो यारी
मैत्रीखाली शत्रू लपला
चिनी भुताची निती खरी
हिंदी चीनी भाई म्हणुनि
जाईल घेऊन मरणदारी
नको बाहेरची मेवामिठाई
घरची बरी मीठ भाकरी
घरात बसू मिळून हसू
करू घरच्या घरी चाकरी
वास्तु १८
गिरिजा जरी मनुष्य नसली तरी तिच्यामध्ये अजुन देखील बरीच माणुसकी शिल्लक होती. तिच्यावर झालेले अत्याचार ती विसरली नसल्यामुळे कोणत्याही दुसऱ्या मुलीवर तसं काही होणं तिला त्रासदायकच वाटत होतं. त्यातल्या त्यात सई वर तर नकोच, सौम्यचा जीव जडला होता सईवर आणि सौम्यसाठी का असेना गिरिजा कडून मदत होणं हे ठरलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. पण तिच्याकडून मदत मिळवणार कशी? तिला कळेल कसं की नक्की तिला काय करायचं आहे.
हे करायला हवं!
अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं
आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं
करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा
मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं
आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...
***
वाडा
वाडा - लघू भयकथा
©राक्षसमंदिर - २
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
प्रथम भाग - https://www.maayboli.com/node/74084
मीरा का मोहन - एक विधिलिखत प्रेमकहाणी
मीरा आज खूप आनंदी होती... त्याला कारणही तसेच होत. २०-२२ वर्षे बंद पडलेला त्यांच्या कुलदेवतेचा देवीचा गोंधळ यावर्षी पुन्हा सुरु होणार होता.
लहानपणापासून कोकणात वाढलेली हि मीरा गावडे, अवघी तीन वर्षाची असताना मालतीताईंसोबत (मीराची आई) मुंबईला आली. मधुकरराव गावडे (मीराचे बाबा) मुंबईतच एका मिलमध्ये काम करत होते. आपल्या तुटपुंज्या पगारातून त्यांनी एक छोटीशी झोपडी वजा खोली विकत घेतली होती आणि आता त्यातच त्या राजाराणीचा संसार सुरु झाला होता.