तो दार ढकलत आत आला .
गोल , लालसर काळपट , लबलबीत , चिपचिपीत , पुर्ण वाढ झालेल्या माणसाच्या मस्तका एवढा होता तो गोळा . पांढरा व चिकट द्रव त्यामधून स्त्रवत होता . अचानक त्याला लालभडक असे माणसासारखे दोन ओठ फुटले . ते एक तोंड होते . त्या तोंडातुन रंगहीन लाळ टपकत होती . तोंडात पांढरेशुभ्र दात होते . ती जीभ मात्र सापासारखी दोन तुकड्यात विभागलेली होती .
" तु मेलाय , "
स्स्स्स..... असा आवाज पार्श्वभूमीवर करत तो मला म्हणाला . " खाली बघशील का जरा..." . मी खाली पाहिलं . चार पाय असलेलं माझं शरिर रस्तावर चपटं होउन पडलं होतं . मी तर घरात होतो , इथे कसा आलो ....
आजी
---------------------------------------------------------------------------------------------
“आजोबा, मला आजी का नाही?” सिनियर केजीमधल्या चिंटूने विचारलं.
त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नावर मी चमकलोच,” का रे? “
“साहिलची आजी किती मस्त आहे ! मलापण अशी एक आजी पाहिजे .”
मी गप्पच झालो. मला अमिताची आठवण आली . आमचं लव्हमॅरेज. पण पुढे बिनसतच गेलं. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला .पण नाही! तिने पुढे दुसरं लग्न केलं. मी तसाच राहिलो .तिच्या आठवणींमध्ये झुरत .
अन आता चिंटूला आजी पाहिजे म्हणून, पुन्हा दुसरं लग्न करायचं?...
प्रश्नच प्रश्न
असंख्य प्रश्नांच्या गर्दीत
हरवून बसलोय मी
उत्तरं शोधण्याचा आता
प्रयत्नच सोडलाय मी...
हे असंच का?
ते तसंच का?
कोण कधी असं तसं
अनाकलनीय वागलंच का?
चालता बोलता हसता खेळता
क्षणात अचानक जीवन संपावे
क्षणभंगूर या जगण्यासाठी
दिवसरात्र मग का खपावे?
सुख-दु:खांचा सारा पसारा
सुखसरींचाच वर्षाव जादा
अल्पशा दु:खांची तरीही
दिवसरात्र का व्यापून छाया?
मी मी करता कधी वाटे
काहीच माझ्या हातात नाही
ही जाणिव झाल्यावर भासे
हा जन्मच मग का व्हावा?
हुमान..कोडे आहे का ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)
सामान्याला सहजासहजी सुटण्याजोगे आहे का ?
जीवन म्हणजे चकवा, गुंता, हुमान..कोडे आहे का ?
ऐन तिशीतच देह येथला किती लागला वाकाया
जगण्यावर इच्छांचे सांगा इतके ओझे आहे का ?
नजर पेरण्याच्या आधी बस् हवे मला हे बघायला
तिच्या पापण्यांइतके ती'चे मनही ओले आहे का ?
फक्त एकदा फसले होते तिला दिलेल्या शब्दाने
पुन्हापुन्हा हे फसायला मन साधेभोळे आहे का ?
दोन चुंबने दिली मला अन् विचारते की, "भरले का ?"
भरायला सांगा माझे मन म्हणजे पोते आहे का ?
टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की.
काटकसर
महाबळेश्वरच्या त्या जराश्या आडवाटेवरच्या खोल दरीच्या वरच्या उंच कड्यावरील जराशा सपाट जागेवर आम्ही दोघं बसलो होतो. सगळीकडे तशी भयाण शांतताच होती. त्या शांततेचा भंग करत सुधा मला म्हणाली,
`हा जो सगळा खर्च तुम्ही चालवला आहे...`
`सुधा... मी तुला काय म्हटलंय, अजिबात पैशाचा विषय काढायचा नाही.` मी तिला मध्येच थांबवत म्हणालो.
साधू वध
*****
भगव्यातील भोंदूलाही
देव मानणारा
हा हिंदू समाज
जेव्हा पाहतो
तुम्ही क्रुरतेने
हिंसेने मारलेले
रक्तामध्ये लडबडलेले
त्या असाहाय्य निष्पाप अन
त्या वृद्ध साधूंचे शव .
तेव्हा होते आक्रंदण
श्रद्धेचे भावनेचे
आदराच्या उल्लंघनाने झालेलं
लक्षात ठेवा
तेव्हा तुम्ही टाकलेली असते
काडी तेलाचा विहिरीत
मारलेली असते
उडी सिंहाच्या गुहेत
बोलली नाहीस तू............!
- महेश मोरे (स्वच्छंदी)
घालुनी डोळ्यात डोळे अंतरी भिडलीस तू
पण हवे होते मला ते बोलली नाहीस तू
वय गुलाबाचे म्हणू की मी तुझी जादू म्हणू
ऐन चाळीशीतसुद्धा वाटते बावीस तू
मोगऱ्याची वेल जेव्हा लोंबताना पाहतो
पाकळ्यांआडून पडते नेमकी दृष्टीस तू
सर्वकाही द्यायचा देतेस मजला शब्द पण
ऐनवेळेला किती करतेस घासाघीस तू
हक्क नाही एवढाही आज माझ्यावर तुझा
शेर विरहाचा कसा मग लावते छातीस तू
नाव माझे टाळले तेव्हाच कळले हे मला
आजही पाहून मज होतेस कासावीस तू
रंग जे तुझे बघून घेतले
आज मी असे रडून घेतले
प्यायलो जसे कधी नसेल मी
जामही तसे भरून घेतले
टाळणे मला जमेल का अता
श्वासही तुला स्मरून घेतले
लागतो कसा कलंकही तुला
नाव मी नसे अजून घेतले
आसवे निलेश का उगाच रे
तूच हे तुला फसून घेतले
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- वारकामिनी
(गालगाल गालगाल गालगा)
तरी मी काही सगळंच सांगत नाही तुला.
कितीही बोललो आपण तरी...
काही थोडं उरतंच!
काही मुद्दाम राखलेलं,
काही नकळत राहिलेलं,
काही 'यात काय सांगायचंय'
अन काही 'हे नकोच!'
.....असं चाललेलं.
या न बोललेल्याचं कोवळं धुकं
तू नसतानाच्या लांबलचक संध्याकाळी
सावळे ओले बाष्प होऊन
नजरेवर बसतं
थोड्याची अल्लाद वाफ होते.
थोड्याचे टपटप थेंब
तळाशी साठून
एक गढूळलंसं तळं होतं!
मग कुठल्याश्या उन्हाळ्यात
त्याचीही वाफ होऊन
तुझ्या- माझ्या आकाशात ते निरर्थ तरंगत राहतं.