साहित्य

दारात सांज येता

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 9 April, 2020 - 14:52

दारात सांज येता होतात भास काही
आहे उगाच डोळा माझ्याच आस काही

झाला अबोल आता संवाद आपलाही
आहे उदास जे तू मीही उदास काही

जेव्हा प्रकाश होता आला जगात साऱ्या
काळोख दाटलेला माझ्या नभास काही

वाटेल ना जरी हे सारे खरेच आहे
देतात काळजाला नातीच त्रास काही

आक्षेप ना तसाही खोटा निलेश त्यांचा
मोडेल कायदा ती लोकेच खास काही

निलेश वि. ना. शेलोटे
आनंदकंद(गागाल गालगागा गागाल गालगागा )

भेट

Submitted by पराग र. लोणकर on 8 April, 2020 - 02:18

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर
आस माझी फळास आली
आज अचानक कुठुन तरी ती
हलकेच माझ्या दारी आली

भेट तिची स्वप्न माझे
असे अचानक पुरे झाले
कोणत्या जन्मीचे पुण्य माझे
या जन्मी कामास आले

शोधात होतो सदैव तिच्या मी
गवसत नव्हती कुठे कधी ती
कसे तिला मी कुठे भेटावे
सांगत नव्हते कुणी मित्रही

आज अचानक भेट जाहली
जाणिव आहे ओळख नवी ही
तरी अडखळत हा चालू केला
संवाद त्या माझ्या कवितेशी...

***

शब्दखुणा: 

अभिवादन

Submitted by Asu on 7 April, 2020 - 11:38

आजच्या जागतिक आरोग्यदिनानिमित्त सर्व ज्ञात अज्ञात आरोग्य सेवकांना-

अभिवादन

संकर भयंकर रणी माजला
कोरोनाचे होता आक्रमण
वणव्यासम जगी पसरला
भेटेल त्यास करी संक्रमण

बेधुंद मातला जगी पसरला
रोज करतो सहस्त्र भक्षण
देवही आता लपून बसले
कवण करील आपुले रक्षण

शूर सैनिक लढती रणांगणी
डॉक्टर परिचारक फार्मसिस्ट
पोलीस प्रशासन आणि सेवक
रात्रंदिन अविरत करती कष्ट

फार्मसिस्टसम अनामवीरांची
वाटते खरोखरी मनात खंत
गौरविले जरी नाही कुणीही
काम सदैव जैसे करती संत

शब्दखुणा: 

आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:41

सध्या माहीत नाही का ते, पण मायबोली वर बरच लिखाण हे आंबट शौकीन होत चाललंय. कदाचित हे फक्त मला वाटत असेल. गेल्या ८-९ वर्षांपासून मी मायबोली वर वाचतेय, गेल्या काही महिन्यांपासून लिहतेय, पण अगदी गेल्या काही दिवसांपासून बरच लिखाण हे अश्लिलते कडे झुकल्यासारख वाटायला लागलं आहे. एक दोन ठिकाणी मी प्रतिक्रियांमध्ये टाकलं हे. पण आता जरा जास्त व्हायला लागलं आहे.
ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:40

चूकून दोन धागे तयार झाले होते. आणि कोणताही बंद होत नव्हता म्हणून इथून मजकूर हटवला. कृपया दुसरा धागा वाचवा.

विषय: 
शब्दखुणा: 

हिटलरची प्रकृती व त्याला वाटणारी विविध प्रकारची भीती!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 01:37

महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.

शब्दखुणा: 

प्रिय बाबा!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 00:31

माझे परम दैवत
हरवून बसलोय मी
पाठीशी उभी आधाराची भिंत
ढासळलेली पहातोय मी

माैज-मजेचे दिवस
आता सारे संपलेत
सारे बाल्य माझे
गमावून बसलोय मी

तुमचे ते हास्य
तुमचे ते बोलणे
हवेहवेसे ते सारे
आज शोधत बसलोय मी

आदर्श वडील कसे असावे
याचे मूर्तिमंत रुप तुम्ही
तुमच्या त्या वात्सल्यासाठी
अक्षरश: वेडावलोय मी

तुमच्याशी प्रेमभरा संवाद
क्वचित झालेला वाद
तरीही तुमच्या जवळ बसून
होणारी ती चर्चा आठवतोय मी

शब्दखुणा: 

क्षमस्व

Submitted by शुभम् on 5 April, 2020 - 23:04

http://manatalepanavar.blogspot.com/?m=1

या ठिकाणी त्या चारही कथा आहेत .
वाचून पहा मग ठरवा शृंगारिक आहेत कि अश्लील आहेत की उत्तानरसाच्या कथा आहेत....

तुम्हाला त्या उत्तान वाटत असतील , तर त्या मी काढलेल्या आहेतच .

Pages

Subscribe to RSS - साहित्य