सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सतरा...मिशन नवीन ..शिलेदार निघाले...
तिच्या हाताची बोटं थोडी हलायला लागली..व्ह्यूफ व्ह्यूफ...फुssssss तिच्या नाकातून आणि तोंडातून सुस्कारे बाहेर आले...थकावट सरळ सरळ जाणवत होती. शरीर काळपट पडलेलं, दणदणीत होतं त्या लाल प्रकाशाने तिची ही अवस्था करण्यापूर्वी...आत्मा त्या जळक्या शरीरातुन सुटकेची धडपड करत होता जणू. नक्की काय त्या शक्तीच्या मनात होतं काय ठाऊक.
'राजकारण' या एकूणच विषयाबद्दल काहीशी नकारात्मक आणि परकेपणाची भावना घेऊन जन्माला आलेल्या आणि बहुतांश आयुष्य़ जगलेल्या एका पिढीत आणि वर्गात आपल्यातील बर्याच जणांचा समावेश होतो. आपण ज्यांना खरोखर आदर्श ’नेता’ किंवा ’पुढारी’ म्हणून ओळखत होतो आणि अजूनही ओळखतो ते सारे आपल्या जन्माच्या कैक वर्षे आधीच निवर्तलेले होते किंवा त्यातले थोडके आपल्या बालपणीच संपून गेले. आपल्या पुढे ’राजकारण’ या क्षेत्रातला आदर्श म्हणावे असे खरे पाहता कुणीच हयात स्थितीत नव्हते.
चित्रपसृष्टीत स्त्री प्रधान चित्रपटांची आत्ता कुठे व्यवस्थित सुरुवात झालीय. म्हणजे आधी पण काही चित्रपट येऊन गेले ज्यात स्त्री भूमिका ही प्रमुख होती, मदर इंडिया, कहाणी, मर्दानी इत्यादी... पण ह्या सगळ्या चित्रपटात कुठे तरी non fiction बघायला मिळतात. यात असलेल्या महिला ह्या खरचं आयुष्यात आहेत की नाही इथून प्रश्न पडतात. पण सध्या नवीन आलेल्या "थप्पड" आणि "छपाक" मध्ये रोजच्या जगण्यातल्या बायका बघायला मिळाल्या...
मालती च्या चेहऱ्यावरचं acid असूद्या की अम्रिता च्या चेहऱ्यावर पडणारा थप्पड, दोघींचा संघर्ष फक्त दोनच गोष्टीसाठी ते म्हणजे "आदर" आणि "आनंद".
न्याय मिळाला!
दुष्ट नराधम फाशी गेले
न्याय मिळाला निर्भयाला
मरणांतीही तळमळणारा
आत्मा आज मुक्त जाहला
लांडग्यासम लचके तोडुनि
मिटक्या मारून किती छळले
होता शिक्षा फाशीची
मरणाचे त्यां भय कळले
न्यायासाठी फिरती वणवण
अन्यायी हे दुष्ट दुर्जन
अन्यायाचा करता कावा
स्मरावे त्यांनी त्यांचे वर्तन
विनंती इतुकी न्यायदेवते
विनाविलंबित न्याय व्हावा
दोषी ठरता निर्णय देता
अंमल शिक्षेचा त्वरे करावा
निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना आज दि.२० मार्च २०२० रोजी फाशी झाली. गेली सात वर्ष तळमळणारा निर्भयाचा आत्मा अखेर आज मुक्त झाला. निर्भयावर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या नराधमांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मात्र जीव तोडून धडपड केली. तरीही अखेर न्यायाचा विजय झाला.
पण, अशा निर्घृण बलात्कार प्रकरणी नराधमांना मी कवितेत म्हटल्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून असं दुष्कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होऊ नये.
निर्भया
"वत्सला ताई, शांताला खूप त्रास दिलाय त्यांनी आन ती पूर्णपणे त्यांच्या हातातलं ख्येलन झाली हुती, आन मलाबी लै तरास दिला...ताई...ताई.."तो आवाज दूर गेला. वत्सल मागे वळली तशी एक झुळूक सूळकन बेडरूमच्या बाहेर गेली. ती गोदा, तिचा आत्मा होता. ती बरच काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला मर्यादा होत्या. हतबल होती...वत्सलने अंदाज लावला.पण आपला मोर्चा शांताकडे वळवला.
'शांता, तू अशी परत भाईर कशी आलीस? तू तर उद्या ईनार हुतीस न्हवं?"
पुष्कर दुपारी “ खेळ खल्लास” सिनेमा बघून आला होता. त्याच्या सर्व आवडत्या सुपरहीरोंची झालेली दयनीय अवस्था बघून त्याला वाईट वाटत होते. सन्नाटा नावाच्या खलनायकाने सर्व सुपरहीरोंना पळवून लावून पृथ्वीवर कब्जा केला होता. हवाहवाईने केलेले हवाई हल्ले त्याने परतवून लावले होते. सूर्यकुमारच्या झळाळीला सन्नाटाने झाकोळले होते. सूर्यकुमारच्या तेजस्रोतामागे असणारी अणुप्रक्रिया त्याने ग्राफाईटचे अस्त्र सोडून बंद पाडली होती.त्यामुळे सूर्यकुमार खग्रास ग्रहण लागल्यासारखा निस्तेज झाला होता. मिस्टर इंडिया सन्नाटाच्या समोर जो अदृश्य झाला तो पुन्हा कोणालाही दिसला नाही.
भूतांच्या गोष्टी: चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे
१. चला चला बायांनो
ही खूपच जुनी आठवण आहे. म्हणजे ३५ वर्षापूर्वीची असावी. त्यावेळेस मी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावात राहत होतो (म्हणजे माझे घर – माहेर तिथे आहे). आमच्या घरी दरवर्षी गौरीपुजा असते. इथे त्याला महालक्ष्मी पुजा म्हणतात.
काय म्हनू तुले…
(लेवा गणबोली)
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
डोस्कं नको तपवू माह्यं
घरचा तुह्या रस्ता धर
हात जोडीसन सांगतो तुले
काहून करतू रिकामं घर
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
गह्यरं गह्यरं आईकलं तुह्यं
आता तू बी आईक माह्यं
शेवटचं तुले सांगतो बाप्पा
लई झाल्या तुह्या गप्पा
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
वेश्याव्यवसाय हा जगातला कदाचित सगळ्यात जुना व्यवसाय असावा. लाखो वर्षांपूर्वी मनुष्य अस्तित्वात आला तेव्हापासून त्याची उत्क्रान्ती टप्प्याटप्प्याने होते आहे, असं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. ही उत्क्रांती शारीरिक, मानसिक आणि लैंगिक - अश्या तिन्ही पातळ्यांवर झाली आणि होत राहील, असंही विज्ञान सांगतं. मनुष्य हा ' समाजात ' राहणार प्राणी आहे, त्याच्या सामाजिक उत्क्रांतीत त्याने 'नाती' निर्माण केलेली आहेत आणि त्या नात्यांशी निगडीत चौकटीसुद्धा त्याने आखून घेतलेल्या आहेत, असा समाजशास्त्रीय सिद्धान्त त्या उत्क्रांतीवादाबरोबर सांगितला जातो.