Submitted by Asu on 13 March, 2020 - 02:48
काय म्हनू तुले…
(लेवा गणबोली)
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
डोस्कं नको तपवू माह्यं
घरचा तुह्या रस्ता धर
हात जोडीसन सांगतो तुले
काहून करतू रिकामं घर
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
गह्यरं गह्यरं आईकलं तुह्यं
आता तू बी आईक माह्यं
शेवटचं तुले सांगतो बाप्पा
लई झाल्या तुह्या गप्पा
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
चिपचाप घरी जाय रे भाऊ
खाऊ बिऊ काय बी दिऊ
करोना, कोडगा नको व्हऊ
नको आता तू आढी राहू
समदी दुनिया तुले तरासली जनू
गुडबाय रामराम काय काय म्हनू
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
सर्व हक्क स्वाधीन
(दि.13.03.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे सर
छान आहे सर
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!