भाग ५
भाग ६
मंगेश त्याच्या कामात खरच बेस्ट असावा. लकी त्याच्याकडे रिलॅक्स होता. सिद्धीने "गो चॅम्प!" म्हंटल्या म्हंटल्या तो मंगेशच्या मागोमाग घरात आतल्या बाजूला गेला देखील न कुरकुरता.
"बघ म्हंटलं होतं ना मी he is the best"
"खरय. He is the best" तिला उत्तर देताना मनात मात्र येऊन गेलं, "ही माझ्याबद्दल कधी, म्हणेल असं?”
भाग ४
भाग ५
पुढल्या दोन मिनिटात ओला कार गेट मधून आत आली.
कारमधे मागच्या बाजूला सिट कव्हर पसरुन पाठ टेकतो तिथे त्याच्या ब्लॅंकेटची चौघडी ठेवून लकी महाराजांना खिडकीजवळ स्थानापन्न केले. त्याच्या बाजूला मधल्या सीटवर सिद्धी बसली. दुसऱ्या खिडकीजवळ लकीची प्रवासी बॅग ठेवून मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो.
गाडी एसी असल्याने खिडकीच्या काचा बंद होत्या. लकीने बाहेर डोकं काढलं तर? बाहेर निघायचा प्रयत्न केला तर? या माझं बिपी वाढवणाऱ्या शंकांना त्यामुळे सध्या पूर्णविराम मिळाला होता.
भाग 3
भाग ४
शनिवारची सकाळ म्हणून गजर बंद करुन ठेवला होता. पण चिन्याच्या कॉलने झोपमोड झालीच.
"विकेंडला सकाळी ६ वाजता कोण कॉल करतं? आता कारण तसंच काही महत्वाचं नसेल ना चिन्या तर तिथे येऊन बदडेन तुला." मी फोन उचलून बेसिनपाशी जात म्हंटलं.
“अव्या यार एक इमर्जन्सी आलेय. मदत हवी होती. ताईच्या कारला अॅक्सिडेंट झालाय. जिजूला पण बराच मार लागलाय.”
“ओह! मॅन. फार लागलय? नीट सांग मला सगळं. काकांना सांगितलं? मी येऊ तिथे?”
भाग २
भाग 3
"अव्या आज तुझी वकिलीण बाई बरोबर डेट नाही ना?" किर्तीच्या प्रश्नावर मी, ‘नाहीये’ म्हणून उत्तर देऊन पुढे काही मेसेज करणार इतक्यात तिचाच मेसेज आला.
"कूल. मग आज काही इतर प्लॅन करुही नको. उद्या पहाटेच्या फ्लाईटने मी परत जातेय. मी आजचा दिवस तुम्हाला भेटायला फ्री ठेवलाय. तू आणि चिन्या मला साडेसहा वाजता भेटताय मॉकिंगबर्ड कॅफेत." तिने ऑर्डरच सोडली.
"बरं चिन्याला कळवलयस ना? साहेब हल्ली व्यग्र असतात वेगवेगळ्या कामात" मी ऐकवलं.
भाग १
भाग २
घरी नकार कळवून एक आठवडा झाला आज. आईने पहिल्या दिवशी नकाराबद्दल ऐकलं तेव्हा एकच प्रश्न विचारला, “नकारच देणार होतास तर एव्हढा वेळ तरी का वाया घालवलास?”
“अरेच्या! मी माझी मतं सांगितली होती ना आधी तुला? तूच म्हणालीस एकदा भेटून तर ये.”
“मला वाटलं होतं कदाचित भेटल्यावर मतं बदलावी वाटू शकेल तुला. आणि गेल्यावेळी तू अर्ध्या तासात काही तरी कारण काढून आलायस ना घरी.”
“तू काय घड्याळ लावून वॉच ठेवतेस काय माझ्यावर?”
सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सतरा...मिशन नवीन ..शिलेदार निघाले...
तिच्या हाताची बोटं थोडी हलायला लागली..व्ह्यूफ व्ह्यूफ...फुssssss तिच्या नाकातून आणि तोंडातून सुस्कारे बाहेर आले...थकावट सरळ सरळ जाणवत होती. शरीर काळपट पडलेलं, दणदणीत होतं त्या लाल प्रकाशाने तिची ही अवस्था करण्यापूर्वी...आत्मा त्या जळक्या शरीरातुन सुटकेची धडपड करत होता जणू. नक्की काय त्या शक्तीच्या मनात होतं काय ठाऊक.
सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग पंधरा
कोण प्यादे? बकुळा की त्या दुष्ट शक्ती?
डॉक्टरना ही व्हायब्रेशन्स नवीनच होती. डॉक्टरनी पुन्हा महामृत्युंजय म्हटला. व्हायब्रेशन्स ची तीव्रता वाढली....
डॉक्टरनी त्या अनोळखी मुलीवर या मंत्राचा प्रभाव आणि परिणाम अगोदरच बघितला होता. त्यांना आता कुठे लक्षात आलं की बकुळा काय किंवा त्या प्रकाश शक्ती काय कुणिच इजा का करू शकलं नाही!!
नवीन आणि डॉक्टर एकत्रच घरी आले. वत्सल आत्यानी दार उघडले..नवीनचा चेहरा पाहून त्या त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. आणि डॉक्टर घामाघूम दिसले...तिने हळूच नवीनला आणि डॉक्टरना आत घेतले. हळुवार बाहेरचा कानोसा घेतला. सावध पवित्रा होता वत्सल आत्याचा