सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग बारा

Submitted by मुक्ता.... on 28 February, 2020 - 14:19

नवीन आणि डॉक्टर एकत्रच घरी आले. वत्सल आत्यानी दार उघडले..नवीनचा चेहरा पाहून त्या त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. आणि डॉक्टर घामाघूम दिसले...तिने हळूच नवीनला आणि डॉक्टरना आत घेतले. हळुवार बाहेरचा कानोसा घेतला. सावध पवित्रा होता वत्सल आत्याचा
काही न बोलता तिने आस पास च निरीक्षण केले. हलकेच नविनला आणि डॉक्टरना आतल्या खोलीत नेण्याची गंगाला खूण केली. गंगाला इशारा समजला. जेमतेम पाच फूट उंचीची गंगा...तीन हळूच उंच पुरे डॉक्टर आणि नवीन यांच्याकडे पाहून तोंडावर बोट ठेवत काहीही न बोलण्याबद्दल आणि आवाज न करण्याबद्दल सुचवले. त्या दोघांनी मान डोलावली.आणि त्या दोघांना दबक्या पावलांनी आत नेऊन विजेच्या वेगाने गंगा बाहेर अली आणि वत्सलच्या मागे जाऊन उभी राहिली. आणि आणि... वत्सल अत्यानी आपल्या किरमिजी सुती साडीचा पदर खोचला. साडीच्या पायघोळ निऱ्या थोड्या वरती खोचला.
काहीतरी संशय नक्कीच आला होता....
वत्सल एकदम अचानक बाहेर गेली. झपकन एका मुलीचा हात धरला.....तशी जिवाच्या आकांताने गगनभेदी किंकाळीने ती ओरडली....
वत्सलने तिला जवळ खेचले.....ती हात सोडवायचा प्रयत्न करायला लागली. वत्सलने तिच्या केसांना धरून तिचे डोके स्वतःकडे केलं. त्यासरशी वत्सल ला तिला देवकी म्हणून भेटायला आलेली मुलगी आठवली...त्या मुलीचे डोळे नॉर्मल वरून डाम्बरासारखे काळे झाले आणि त्यात हिरव्या रेषा फिरायला लागल्या. " सोड मला, बकुळा कळली म्हणजे समदं कळलं अस न्हाय....अजून लै ख्योळ बाकी हाय, त्यानला जे पाय जे त्ये लै मोट हाय...तू इचार बी क्येला नसशील....वत्सल आता तुजी पाळी."

वत्सल ने तिला आणखीन घट्ट पकडली. आणि आत घरात खेचली. तिला एका खुर्चीला बांधलं. आणि महामृत्युंजय सुरू केला...ती आणखीन किंचाळायला लागली...पण तिचे काही चालेना...."थांबिव ह्ये समदं....त्यो मंतर नग ". तो ओरडा आरडा ऐकून डॉक्टर न रहावुन बाहेर आले. त्यांना गंगाने शांत उभं रहाण्याचं खूण केली.

डॉक्टर थक्क झाले हे बघून त्यांच्या मेडिकल सायन्स च्या पलीकडचं काही होतं हे....तरीही याच उत्तर त्यांच्याकडे होतं...त्यांनाच ते द्यायला लागणार होत.
इकडे गंगा आणि स्पेशली नविनची बोबडी वळली. काहीतरी विचित्रच...त्या मुलीला आकडी येत होती...वत्सलने नाविनला बोलावलं आणि त्या मुलीचा चेहरा दाखवला. वत्सलने डॉक्टर टंडन कडे बघितलं...डॉक्टरना खूण केली नविनला पुढे घ्यायची , डॉक्टर लगेच उठले.नविनला धीर दिला, "तुझी हीच अवस्था होती नवीन...अशीच व्हायची होती...नवीनदादा कमोन फेस कर....." गंगा म्हणाली....
नवीन डॉक्टरांच्या सहाय्याने कसाबसा उभा राहिला. आणि त्या मुलीपुढे उभा राहिला, त्याने डोळे घट्ट बंद केले होते. धीर एकवटून त्याने डोळे किलकिले केले...गुरगुर करत ती मुलगी त्याच्याकडेच बघत होती. ते पूर्ण काळे डोळे बघितले नवीन पार म्हणजे पार वितळला...."माय हीच हीच ती...इकडे आली पहिल्यांदा आणि हिच्याबरोबर ती ....ती भयांकर बाई पण होती...माय, पहिल्यांदा...आणि त्यानंतर सगळं चक्र"
नवीन खाली कोसळला, त्याची शुद्ध अर्धवट हरपली...त्याला आराम खुर्चीत बसवले गेले, आपलं आपण जागेवर यायला.
आता पदर खोचून वत्सल त्या मुलीकडे वळली. अर्थात तीही त्या हिरव्या रंगाच्या शक्तीच्या प्रभावाखाली होती....
आssssssह आsssssssssह..
काळवळत होती ती....
वत्सलने महामृत्युंजय म्हणत एका ग्लासात पाणी घेतलं. तिला माहीत होतं की या साध्या उपायांच्या ती पलीकडे गेलेली आहे. वत्सलच्या जागी नवीन असता तर त्या मुलीच्या मात्र स्पर्शानेही परत त्या गर्तेत सापडला असता. वत्सल आत्यामुळे ती कमकुवत झाली. तर ते पाणी त्या मुलीच्या कपाळाला लावलं त्या क्षणी ती किंचाळून निपचित झाली.
घरात एकदम शांतता पसरली. तिला आता गच्च बांधून ठेवली होती. पण पुन्हा कधी शुद्धीवर येईल याचा नेम नव्हता. तिकडे नवीन कितीतरी वेळ शांत पडला होता.
एक अर्धा तास शांततेत गेला असेल. डॉक्टर नि ही शांतता भंग केली
"अहं अहं, अरे भै, भूख लगी है, मैं भाकरी खाने आया हुं, वत्सला चाची, क्या आप मुझे खिलाऍंगी या फी र..."

या मिश्किल उद्गारानी वातावरण थोडे सैल झाले. खसखस पिकली...ओशाळ होत वत्सल म्हणाली, " व्हय व्हय, आता खिलवती...गंगे भाजी गरम कराया घे, आन पान बी घे,म्या भाकर थाप्ती."
"या डागतर सायेब, बसा आन खावा ह्यो गावरान भाकर ,भाजी आन ठेचा..."
थोड्या गप्पा होत जेवण होतच आलं, "वत्सलचाची ये कौन है, ये उस दिन जब नविनके हिप्नॉटिझम का आखरी सेशन था , मैं लेट आया था. और थोडा जखमी था. मेरा एकसिडेंट हुआ था. तो यही लडकी मेरे गाडी के सामने आई थी. इसे बचाने के लिए मैने गाडी डायव्हर्ट की तो एक पेड पर ठोक दी. कुछ हरेसे रंग का स्पार्क हुआ. झटका लगा. वो मेरे गाडी के खिडकी के सामने आई उसी वक्त. पता नही लेकीन जोरसे ओरडून पळाली.," डॉक्टर नि सांगितलं.

" काय म्हणताय डॉक्टर? तुम्हालाही नाही सोडलं त्यांनी,कमाल आहे, मला वाटतं तुम्ही दादाची मदत करताय म्हणूनच, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला" गंगा म्हणाली.

वत्सल नवीनच्या जवळ जाऊन बसली होती आणि बरोबरच त्या दोघांचं बोलणं ऐकत होती.

" गंगा वत्सलचाची आनेसे पहले , देवकी नवीन को लेके मेरे पास ट्रीटमेन्ट के लिए आती थी. पता नही उसे क्या हुआ था. उसे कोई इलाज लागू नही हो रहा था. गंगा, तुमि सोचू बी शकत नाय असं चॅलेंज मला होत. नवीन मृत्यूच्या वाटेवर होता. त्याच्या सेकंड सिटिंगला त्याला वोयलंट अटॅक आला. त्याने माझ्यावर हल्ला केला होता. टेबल वर चढला.त्याचे डोळे बी ह्ये अशेच पण पूर्ण नाही थोडे, काळे झाले होते.मी माझे गार्डस बोलावले. त्याला बेडला बांधला.त्या दिवशी त्याला मी नर्व्हस डिप्रेसंट दिल.इंजेक्शन थ्रू ....अँड एक चीज ऍड करता हुं...मैने वही ग्रीन लाईन्स नही लेकीन मी ते डॉट्स पाहिले होते.आणि येह लडकी cctv च्या फुटेज मध्ये बऱ्याचदा क्लिनिक च्या आसपास मैने देखी. नवीन की तबियत और बिगड गई तो मैने देवकिसे हात जोडकर माफी मांगी. और मी काय बी करू शकणार नाही असं म्हटलं. कारण मला भीती वाटत होती. स्वतःच्या जीवाची."

आह...हि ही ही ही ही..भीती भीती....तू बी सापडणार....

ती मुलगी...नवसंजीवनी मिळाल्यासारखी जागी झाली आणि राकट राक्षसी हसू लागली.....आणि ज्या खुर्चीत तिला बांधलं होतं त्या खुर्चीत जोरजोरात हलू लागली....ही ही ह....

वत्सल ताडकन उठून उभी राहिली की डॉक्टर दचकले...
"डागतर उटा, अन चला, इकडं या, त्या पोरीम्होर उबे रहा"

"नही वत्सलचाची, आपने मेरी बात अभि तो सून ली, और आपने ये भी देखा के उसने मेरे साथ क्या किया...फिरभी तुम्ही मला तिच्या जवळ जायला सांगताय?"डॉक्टरनी वत्सला आत्याना चकित होऊन विचारले.

"तुमाला माज्यावर इस्वास हाय म्हनलात नव्ह? काय बी नाय होत तुमाला. ती आदीबी काय करू शकली? ती तुम्हांसनी नाविनपासून लांब ठिवयचा प्रयत्न करती. ह्यो त्या बकुळाचा डाव हाय.आयकाल माज?" वत्सल म्हणाली...

"काय वत्सल चाची , विश्वास हाय ना...।इसिलीये तो आया हुं. मैं कुछ नया अनुभव लेना चाहता हुं, और ये मेरे मेडिकल सायन्स के पडाकू अनुभव से ,ज्ञान से कुछ अलग है चाची. मानस शास्त्र को एक नया चॅलेंज लगा ये...ये बकुळा कौन है? ये सब क्या है?बर ते असू द्या सावकाश सांगा.पहिलं त्या मुलीला शांत करा...प्लिज चाची, वो नवीन को मै समभालता हुं"

वत्सलने या वेळेस महामृत्युंजयाची पट्टी वरची वापरली, अधिक उच्च स्वरात...आणि ती मुलगी एकाएकी तडफडू लागली.....पाणी पाणी, पाणी द्या...आज्याबात न्हायी...वत्सलने मनाई केली. तब्बल अर्धा तास हे थरार नाट्य सुरू होतं..वत्सल चा त्या मुलीच्या डोक्यावरचा हात चटका बसल्यासारखा लालसर दिसायला लागला. अखेरीस अर्ध्या तासाने ती पुन्हा निद्रित अवस्थेत गेली. गंगाच लक्ष वत्सलचा हात भाजलेल्याकडे गेलं." आत्या...हात ,हात बघ,थांब पाणी....नाही नको मी जेल लावते...थांब आत्या."
"ओह माय गॉड...ये क्या अनहोनी है? वत्सलचाची आपका हाथ जल गया है...रुकिये..गंगा प्लिज जलदी आना"

"व्हय डागतर आणील ती, काळजी करू नगा सा, मला या आदी बी ह्ये झालंय, जवा नविनला म्या शांत करत हुते तवा, पण ही पोरगी...लैच तरास हाय हिला...म्या हिला आत आनली ,कोण कुटची, लै वंगाळ अवस्था हाय तिची"

"चाची इसे फिलहाल यही रेहने दिजीए, इसके जान को खतरा है. आपही उसे इस सिच्युएशन से बाहर ला सकती हो" डॉक्टर असे म्हणत असताना, सगळे एकदम शांत बसले.
आता परत शांतता पसरली. नाही म्हणायला मधला एक महिना गेल्या सहा वर्षात निर्णायक ठरला होता. मेन म्हणजे नवीन आता पुष्कळ बदलला होता....पूर्वी होता तितका घाबरट राहिला नव्हता. देवकी प्रोजेक्ट ची काम एकतर्फी करू शकत होती.
या सगळ्या घडामोडीत नवीन अगदी गळून गेला. डॉक्टरांच्या मदतीने त्याला बेडरूम मध्ये त्याच्या बिछान्यावर झोपवले गेले. आणि डॉक्टर नि एक साधी हिलींग दिली. वत्सलने काही काळ महामृत्युंजय त्याच्या बाजूला बसून जपला. मुख्य म्हणजे ती मुलगी जिथे बांधली ती खुर्ची हॉल मध्ये होती. पण बेडरूम मध्ये अगदी हळू आवाजात सुरू असलेला जप तिला त्रास देत होता. ती या घरात आल्यापासून सगळंच गंगाने मोबाईल कॅम वर रेकॉर्ड केलं होतं. तिने तर सगळं अविनाशला पाठवलं. आणि अविनाशने विजय सरांना!!

नवीन अगदी शांत ,रिलॅक्स चेहऱ्याने झोपला. त्याला शांत करून वत्सलने चहा केला. एव्हाना दुपारचे चार वाजले होते. डॉक्टर कुठल्यातरी विचारात हरवले होते. वत्सलने चहा पुढे केला. डॉक्टर तंद्रीतुन बाहेर आले. कुठलं तरी इ बुक रिफर करत बसले होते.

" थँक्स चाची. हे काय आहे सगळं? इथे सुपर नॅचरल म्हणजे अमानवी शक्ती आहेत? आय स्टील डोन्ट वॉन्ट टू बिलिव्ह धिस.. बट आय हॅव टू....चाची मला सगळं खरं आणि काय काय घडलं ते सविस्तर सांगा. विश्वास रखीये मैं किसींको कुछ कहुंगा नही.मे आपकी मदद करना चाहता हुं..प्लिज सांगा"

"येस टंडन सर, आय विल...लेट्स गो अहेड, सीन्स आत्या केम हिअर...." वत्सला आत्या आणि गंगा दोघींच्या चेहऱ्याकडे, कथनाकडे लक्ष देऊन ऐकत डॉक्टरना धक्यावर धक्के बसत होते...अविनाश म्हणजे आपला अव्या आणि विजयसर याना भेटायला डॉक्टर आता अधीर झाले होते.
घटनाक्रम सांगता सांगता संध्याकाळ उजाडली. रात्रीचे साडेसात वाजले. नविनच्या हाकेने ही मीटिंग मोडली...."माय, ए माय,चहा देतेस का जरा, डोकं जड झालाय ग."
"व्हय आणते रं"
वत्सल आत गेली, चहा पिऊन नवीन परत झोपला.
वत्सल बाहेर आली..."देवकिजी कुठे आहेत,अजून आल्या नाहीत?" डॉक्टरनी विचारलं

"वहिनी,आज उनके मायके गयी है...एक बात है सर..आपको इतनी बार इन लोगोने मारनेकीं कोशिश की लेकीन कर नही पाये..क्यू?"गंगाने देवकीविषयी सांगून ही एक शंका उपस्थित केली.

"पता नही गंगा...लेकीन ये भी सच है...ये मेरे ध्यान मे कैसे आया नही,देखते हैं...कभी न कभी पता चलना है ही. काफी वक्त हो चुका है.मुझे अब चलना चाहिए, घर पे राह देख रहे होंगे, वैसे मैने उन्हे आगह कर दिया है, नही तो, चिंता करत बसतील.

वत्सलचाची , अब इस लडकी का क्या करोगी , खतरा हो सकता हैं ...." डॉक्टर म्हणाले.

"व्हय त्ये हायेच. म्या इचार करती तुमि ती जागी हुईस्तोवर थांबा. द्येवकी आली कि काय म्हणती त्ये बगु. मला या पोरीची दया बी येति.आन असं बी वाटतंया का हिला हित ठिवण धोक्याचं हाय, नविन आन माज्या देवकीसाटी ."

इतक्यात बाहेर मांजर गुरगुर करण्याचा आवाज आला. ती मुलगी अचानक भानावर आली. आणि इकडे तिकडे पाहू लागली. एक वार तिने मी कुठाय? असा अगदी नॉर्मल आवाज काढला. हा सर्व होताना गंगाच लक्ष तिच्याकडं गेलं. तीन त्या मुलीच्या डोळ्यात पहिले. एक क्षण गंगा पहातच राहिली. तपकीर झाक असलेले काळे डोळे अगदी सामान्य माणसासारखे.डॉक्टर आणि वत्सल दरवाज्याच्या बाजूने जिथे मांजर गुरगुरण्याचा आवाज येत होता तिथे म्हणजे स्लायडिंग ग्लास विंडो जवळ.आणि त्या मुलीकडे ते पाठमोरे उभे होते. गंगाने मागे सरकत हळूच मोबाईल कॅमेरा सुरू केला आणि वत्सल आणि डॉक्टरना हळूच पाठीमागून ओढलं. गंगेच्या या वागण्याचा नीट अर्थ न कळल्याने, दोघेही काय म्ह्णून मागे वळले. ते त्या मुलीकडे बघतात तोच तीच चेहऱ्यावरचे भाव एकदमी बदललें आणि आधीसारखे पुन्हा कुट्ट काळे होत त्या वर हिरव्या आणि लाल रेषा दिसायला लागल्या.तिने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली. तसा नवीन बाहेर आला.तो हे दृश्य बघून थोडं बिथरला.हे वत्सलने बघितले. तिच्यातल्या आईने त्या मुलीला जाऊ देण्याचा निर्णय घेतला.खिडकीबाहेर आता मांजर जाऊन एक हिरवा प्रकाश झोत दणादण नाचायला लागला. त्या मुलीने एक मोठी किंकाळी फोडली पूर्ण जोर लावून बंधन सैल केले...आणि दरवाज्याच्या दिशेने धूम ठोकली.....इथे खिडकीबाहेर

स्टिक स्टिक स्त्याव स्त्याव.......किर्र्रर्र्र्र ......त्या हिरव्या प्रकाश वलयाने .....अ अ आता हा हा हिला मारणार.....ब बकुळा ....

ती मुलगी आता दाराबाहेर पळली .....इतक्यात माळ्यावरून सरसर करत एक वाऱ्याची झुळूक वत्सलच्या कानाशी येऊन गुणगुणली.......वन्स.....ती पोर....कामाची हाय....तिला थांबवा....ती बरी न्हाय झाली तरी आपल्या पोराला यातून भैर काढायला मदत हुईल , ती आतला भैर ग्येली...त्यो मारील तिला...आता त्याची शक्ती तिला पूर्ण काबीज न्हाय करू शकत.वाचवा तिला....

आणि ती झुळूक नवीन पाशी गेली.डॉक्टरना हे अस्तित्व जाणवलं....ते नुसतेच पुटपुटले...गोदाजी....

हे विचित्र प्रसंग परिस्थिती.....डॉक्टर भाम्बावून गेले......आता मोठी झटापट होणार हे त्यांना जाणवलं...कदाचित वत्सल आत्यांना त्याची मदत लागणार होती....डॉक्टर सहज महामृत्युंजय गुणगुणत होते आणि सवयीप्रमाणे गळ्यातल्या स्फटिकांच्या माळेला त्यांनी हात लावला. त्यांना व्हायब्रेशन जाणवले...

क्रमश:

वत्सल आत्या त्या मुलीला वाचवू शकेल का? काय मदत होईल तिची? देवकी असं काय काम म्हणून एव्हढी घाईने तिच्या आईकडे गेली? ती आली की अजून काय नवीन गौप्य स्फोट होईल......?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!!!! वाचत आहे. कॄपया शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष द्या. जे खटकले ते सांगत आहे. राग मानु नका!

छान !!

कॄपया शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष द्या. जे खटकले ते सांगत आहे. राग मानु नका! >>>>+१

मनापासून आभार सर्व कुटुंबियांचे, शुद्धलेखनाकडे नीट लक्ष देईन, नक्कीच. सुचवलंत हे छान वाटलं.असाच स्नेह असू द्या. पुढचा भाग आज पोस्ट करते.