सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग तेरा...

Submitted by मुक्ता.... on 3 March, 2020 - 16:00

डॉक्टरना ही व्हायब्रेशन्स नवीनच होती. डॉक्टरनी पुन्हा महामृत्युंजय म्हटला.  व्हायब्रेशन्स ची तीव्रता वाढली....
डॉक्टरनी त्या अनोळखी मुलीवर या मंत्राचा प्रभाव आणि परिणाम अगोदरच बघितला होता. त्यांना आता कुठे लक्षात आलं की बकुळा काय किंवा त्या प्रकाश शक्ती काय कुणिच इजा का करू शकलं नाही!!

इकडे वत्सल आत्या त्या मुलीच्या मागे बाहेर गेल्या. मोठा धोका पत्करला. मुलगी पॅसेज मध्ये डाव्या कुशीवर,बेशुद्ध जखमी सापडली. वत्सल जवळ येताच तिच्या आडून ते काळ मांजर समोर आलं. त्याच तोंड रक्ताने माखलेले होतं.गुर गुर करत फटकन वत्सलच्या बाजूने त्यांच्या घराकडे झेपावलं. जाताना वत्सलचा ओझरता स्पर्श त्याला झाला आणि ते अत्यन्त किळसवाणे विव्हळत धप्प खाली पडलं, पण तसच पाय घासत पिढी गेलं. वत्सल घाबरली, कारण गडबडीत घराचा दरवाजा उघडा, काचेचा अडथळा नव्हता, आणि वत्सलही घराबाहेर, रान मोकळं होत. आणि ही घटना विचारांच्या वेगाने झाली, काही कळण्याआतच. वत्सल तशीच मागे वळली, आता नवीनच काही खरं नाही असं वाटलं...वत्सलची छाती जोरजोरात धडधड करत होती. तिने त्याही स्थितीत महामृत्युंजय सुरू केला. दरवाज्याशी पोचतच होती इतक्यात ते मांजर धाडकन मेन दरवाज्याच्या भिंतीवर आपटलं. आणि किळसवाणे रडायला लागलं...वत्सलने समोर बघितलं तर तिथून डॉक्टर येत होते त्यांच्या गळ्यातली काचमाळ चमकत होती. डॉक्टरांच्या गळ्यावर लाल चट्टे उमटले होते...वत्सल आत्या जवळ येताच ते मांजर जास्तच भेसूर रडायला लागलं. शेवटी त्यातून एक हिरवी तिरीप बाहेर आली.ते बघून वत्सल बाजूला झाली त्याबरोबर ती शक्ती सटकली...झिप झाप झूम.....प्रकाशाच्या वेगाने....मांजराचे शरीर ओल्या कपड्यासारखे खाली कोसळले. वत्सल त्या मुलीकडे वळली. पटकन डॉक्टरांच्या मदतीने तिने तिला आत आणले. त्या मांजराने त्या मुलीच्या शरीराला कडाडून चावा घेतला होता. तिचे श्वास मंदावले होते. डॉक्टरनी तिची नाडी तपासली. तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला हवं पण मग त्यात कायदा मध्ये यायचा धोका होता. डॉक्टरनी सूत्र हलवली...आणि तिला सलाइन ची व्यवस्था केली. गंगा चे त्या मुलीकडे नीट लक्ष होते. डॉक्टरनी ग्लोवस घातले आणि तिच्या जखमेला ड्रेसिंग केलं...अगदी सगळं विचित्र घडत होतं.
इतक्यात गंगाचं लक्ष त्या मुलीच्या पायाकडे गेलं. तिचे पाय हळू हळुवार काळे पडत होते आणि त्यावर हिरवे पट्टे मधूनच दिसत होते..."आत्या, हे बघ अभद्र काहीतरी, आत्या मला वाटतं तिच्या बॉडीमध्ये काही केमिकल चेंज होत आहेत, हिला इथे ठेवणं योग्य नाही आत्या...आपण एखादा तास ओबसर्व करू नाही तर इथून तिला बाहेर न्यावच लागेल." गंगा श्वास रोखून म्हणाली. ती हळू हळू पुढे सरकत त्या मुलीजवळ आली. मांजर जिथे चावले ती उजव्या दंडा वरची जागा नीट निरखून बघू लागली. ती जखम नॉर्मल माणसांच्या जखमांसारखी वाटत नव्हती. वेगळीच होती. आता तिथे रक्त वाहिल्याच्या खुणा नव्हत्या. जखम सुकल्यासारखी दिसत होती. पण स्किन ओढली जायला हवी होती, ताणल्यासारखं दिसायला हवं होतं तिथे, पण तसं नव्हतं. गंगा चक्रावल्यासारखी झाली. तिने डॉक्टर टंडन आणि वत्सल दोघांना ते दाखवलं.

डॉक्टरही बुचकळ्यात पडले. आता हे मात्र आणखीन काही विक्षिप्त होतं. इतक्यात वत्सल आत्याना त्या मांजराच्या शरीराची आठवण झाली. जे ती हिरवी शक्ती दाराबाहेर टाकून सटकली होती. वत्सलने तत्परता दाखवत दार उघडलं न उघडलं इतक्यात दाराबाहेरून झपाकन मांजर गायब झालं...पण मांजर म्हणजे ती हिरवी शक्ती जर घरात गेली तर अशी विव्हळत बाहेर का आली? तिथे डॉक्टर टंडन होते त्या वेळेला. त्यांनाच बघून ते बिथरलं आणि घाबरून त्याने घरात प्रवेश केला नाही. वत्सलला हे ही आठवलं की डॉक्टरच्या गळ्यातली माळ विलक्षण चमकत होती. डॉक्टरांच्या गळ्यावर फोड आणि चट्टे उमटले होते.

वत्सलने दार बंद केले. गंगाला देवकीला फोन करून सावध रहायला सांगितले आणि येताना आत्या खाली आणायला येईल म्हणून सांगितले. तसेच शिकवलंय तसा महामृत्युंजयचा जप करायला सांगितले.

वत्सल आत्या डॉक्टरांजवळ आल्या आणि म्हणाल्या"मला चाची म्हनता न्हवं डागतर? मंग येक ईचारु? त्ये मांजर तुम्हांसनी भिऊन  भाईर आलं,आन तुमचा गळा ह्यो असा भाजल्यावानी लाल झालेला आन ती माळ ती बी चकाकत हुती? ह्ये कस? ती माळ कसली हाय? आन कुटुनशी आनली? "

डॉक्टर म्हणाले "चाची ये माला क्रिस्टल की है, नॉर्मल ग्लास क्रिस्टल,मेरे माताजी ने कोई शिवजी का बडासा मंदिर है, वहासे लाया. उन्हे लगता है इसे दुष्ट शक्तियोसे मेरा संरक्षण होगा, मैने जैसे ही आपको उस लडकी के पिछे बाहर जाते हुए देखा तो मैने अपनी आदत अनुसार इस माला पर अपनी उंगली फेरना शुरू किया. आणि त्या नंतर तुम्ही सतत म्हणत असलेला महामृत्युंजय आपला आप म्हणायला शुरू केला. आणि पता नही इसमे व्हाब्रेशन्स शुरू हो गये. आणि माळ गरम झाली.मी दरवाज्याकडे आलो ते मांजर विव्हळत होत म्हणून तर समोरून माझ्या छातीवर उडी मारली आणि मी मागे कोलमडून पडणार तर ते मांजर माझ्यापासून लांब फेकलं गेलं..एनी वेज, मी आईकडून अजून अशा माळा मागू का? असतील तिच्याकडे...मैं उनसे बात करके देखता हुं"

वत्सल आतुन खूप विचलित झाली हे ऐकून ,कारण नवलच होतं हे. पण तिने ओळखलं की यावर गंगा स्पष्टीकरण देऊ शकेल."जी डागतर, आप बात करो. लै चांगलं हुईल बगा. पन म्हंजी महामृत्युंजय जपला तर त्या शक्तीसनी आव्हान दिता यील म्हनायच!"

"येस चाची, और एक बात कहू? आप गोदाजी के आत्मा से बात करानेकीं कोशीष किजीए, मेरी बात करवाइये, वो कुछ राज जानती हैं. आप बाहर गयी तो नवीन को उन्होंनेही शांत किया. क्या ये पोसीबल होगा चाची?"

वत्सल डॉक्टर टंडन कडे पाहत म्हणाली "का न्हाई?हुईल, माज्या मनातलं बोललात बगा. पण त्ये इजय सर आल्यावर शक्य हुईल..."

"ओह ओके, उनसे मुलाकात का मे इंतजार कर रहा हू, अब दो दिन और,फार अविनाश भी आयेगा, वत्सल चाची अब ये सब....यावर लवकर काही केलं पाहिजे."

त्या मुलीच्या बेड जवळ बोलत असताना अचानक, तिच्या कण्हण्याचा आवाज त्यांनी ऐकला.."आई, मला ,मला वाचव, आई....मला ते त्या हिरव्या देवळात नेतील, मला आकाशात, तो तो हिरवा....तो .....तो लाल......आssssssssई....ती बाई.....आsssss"

वत्सल आत्या तिच्या जवळ गेल्या...."काय झालं बाळ?तू कोन हाईस? कुटून आलीस? या दुष्टांच्या तावडीत कशी गावलीस?"

हं हं हं   तिला धाप लागली. श्वास खूप जोरजोरात खालीवर खालीवर होऊ लागला.
"म म मी श श शांता. मला,म म मला त्या बकुळा बाई....." वत्सल आत्या तिच्या आणखीन जवळ बसल्या.तसं शांताच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू पसरले. "मला किंवा माझ्या कातडीला डायरेक्ट हात ल ल लावू नका, निदान....आता ,या क्षणी....आधीच...त्रास...दिलाय...." आणि शांताला धाप लागली..डॉक्टरनी वत्सल आत्याना ग्लोवस दिलें. वत्सलने तिचा हात हातात घेतला. तिला खुणेनेच शांत रहायला सांगितले. तिची ती विचित्र हिरवट जखम निरखून बघायला सुरवात केली.
शांता ,हो शांता नाव सांगितलं तिने. खूप वाईट अवस्था झाली होती. गंगा आणि डॉक्टर बसून सगळं पहात होते. गंगाचं लक्ष शांताच्या पावलांकडे होते. गंगाची पावलं काळी झाली होती. हा प्रकार अत्यंत संथ गतीने सुरू होता. तूर्तास तरी याला गांभीर्याने घेतलं नव्हतं.पण तेच तर गंगाला मुख्य खटकत होतं. शांताला श्वास घ्यायला ,बोलायला खूप त्रास होत होता. जीभ आत आत ओढली जात होती. ती काहीतरी सांगायचं असा प्रयत्न करत होती. पण एक एक शब्द बोलायला मिनिटभर लागत होता. आणि मुख्य म्हणजे वत्सलने पकडल्यावर गावरान बोलीत बोलणारी शांता आता स्पष्ट शहरी मराठी बोलत होती. हे गंगाने डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं. हे आणखीन रहस्यमय आणि गूढ होत चाललं होतं.शांताच्या अस्वस्थतेत आणखीन वाढ झाली. सलाइन चालू होतं. शांताच्या अस्वस्थतेत आणखीन वाढ होत होती.
" डागतर सायेब, ही जखम येगळीच दिसतीया, यातून रगात दिसत न्हाय की कुटली कातडी आन मांस, त्ये बी न्हाय, सुकून हिरवी कशी हुईल? आन हिच्या भवती ह्यो काळा रंग,आक्रीत हाय ह्ये, हिरवी जखम आसन तर तिच्यात पु होतोया, जंतू संसर्ग असाया हवा, ही जखम ओली बी नाय, तुमीच सांगा ह्यो समदा काय प्रकार हाय त्यो"

"आई....आई.......म म मावशी, व व वत्सल मावशी...मोठं आहे हे सगळं....ख ख खूप खराब माणसं आहेत ती....त त त्यांनी म म माझ्या आई वडिलांना म म मारून टाकले....त त त्यांना मी ह ह हवी होते.....ते ते....आह....म म मावशी म म मी खूप ज ज जगेन असं वाटत नाहीय...."

शांता बेशुद्ध पडली. तिचा श्वास मंद झाला होता. पण ती जिवंत तर नक्कीच होती. देवकी अजून आली नव्हती. डॉक्टरनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. प्रसंग बाका होता. शांता कडून काही महत्वाची माहिती मिळेल अशी आशा होती. 

इतक्यात वत्सल तात्यांचा फोन वाजला. गंगाने बघितलं. अव्या होता. वत्सलने तात्काळ फोन घेतला " मावशी, ऐक. धिस इज बिट सिरियस. मी काय पाहतोय हे? तू त्या मुलीला घरात ठेवलंस ...अगं  काहीही विचित्र असू शकतं ते. मावशी काहीही....तिने समज काही हल्ला केला तर?"

अव्या  आज गर्लफ्रेंड म्हणाला नाही. तेव्हाच वत्सल समजली काहीतरी नक्कीच याला कळलय जे भयंकर आहे. " आर अव्या, अविनाश...आयकून घे पयले...म्या इजय सरांशी बोलले हाय, त्यांनी काई गुष्टि सांगितल्या हाईत . ती पोर ज्यास्त जगलं आस वाटत न्हाई. त्या बकुळीने तिचे संमदे लोक मारले हाईत. आन हिला त्ये मांजर त्यो हिरवा परकाश लै जोरात जखमी करून पळाला. तिची जखम हिरवी हाय आन पाय काळे पडले हैत. तिला सलाईन बी लावलं हाय. हिट डागतर टंडन बी हैत."

" मावशी...तिची जखम हिरवी? स्ट्रेंज....मला बघायचंय तिला...थांब हा कॉल व्हिडीओ  मध्ये बदलतो. मला दाखव मावशी...आणि प्लिज ग्लोव्हस घाल."

व्हिडीओ कॉल वर अविनाशने ती जखम बघितली. शांता चे पाय बघितले. " मावशी, हे आणखीन विक्षिप्त आहे. मी आणि विजय सर, उद्या मायामी ला भेटणार आहोत. माझी एक महत्वाची कॉन्फरन्स आहे. आणि सर एका योगाच्या परिषदेसाठी येणार आहेत. या खेपेला माझी जॉब रिलेटेड कॉन्फेरेंस असल्याने मी ते अटेंड करू शकणार नाही, पण सर डिटेल्स देणार आहेत. मावशी , गंगा, मिस्टर टंडन...मी तिकडे येईपर्यंत प्लिज त्या शांताला जपा. आणि नेक्स्ट वत्सला मावशी, तू हि काळजी घे.या सगळ्याचा कणा आहेस.त्यांच्या टार्गेट्स मध्ये आता तू आहेस मावशी.त्यांचे प्लॅन्स तू उधळलेस.सेंटीमेंटल होऊ नको. शांता मध्ये अडकू नको. सगळं आपल्या हातात नाही. बस आता अजून दोन दिवस.मग आपण सगळे प्रत्यक्ष एक होऊ. प्लिज बी प्रिपर्ड. तयारीत रहा. मोठा संघर्ष आहे.सर आणि मी एकत्रच मुंबईला फ्लाय करणार आहोत."

सगळ्यांनी श्वास रोखून धरला. अविनाशच्या निरोप घेतल्यानंतर, डॉक्टर घरी जाऊन येणार होते. देवकीला येताना पीक अप करणार होता. शांतावर करडी नजर होती. रात्रीचे दहा वाजले. गंगावर आता स्वयंपाक घराची जबाबदारी सोपवली. नवीन जागा झाला. त्याला वत्सलने सगळी हकीकत समजावून सांगितली. नवीन पुष्कळ सावरला. आणि मुक्ख्य म्हणजे शांत राहिला. 

वत्सल आता दीर्घ ध्यानाला बसणार होती. त्यासाठी तिने विजय सरांशी सल्ला मसलत केली. त्यांनी तिला शांताच्या बेड जवळ बसायला सांगितले. वत्सलने आपले आसन अंथरले. आपल्या आराध्याचे स्मरण केले. देवकी आल्यावर तिला सर्व परिस्थिती समजावण्याची जबाबदारी आणि शांताकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी नवीन वर देण्यात आली.

डॉक्टर देवकीसहित त्यांच्या आईकडून त्या स्फटिकाच्या माळा घेऊन आले. आणि त्या नवीन, देवकी , गंगा यांना घालायला दिल्या. विजय सरांच्या सांगण्याप्रमाणे शांताच्या गळ्यातही ती माळ घालण्यात आली. 

दीर्घ श्वसन करून वत्सल आत्यानी ध्यान लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. आता हे सर्व नवीनच्या बेडरूम मध्ये करण्यात येणार होते. वत्सल हळू हळू ध्यानस्थ अवस्थेत शिरल्या. होते ते सर्व ज्ञान त्यांनी पणाला लावले. आता त्यांना केव्हा त्यातून बाहेर येता येईल हे कुणीच सांगू शकत नव्हतं. हळू हळू त्यांच्या श्वासाची गती कमी झाली. देह स्थिर झाला. त्यांचे आत्मतेज त्या खोलीत फिरू लागले. त्यांना खिडकीपाशी एक मुलगी दिसली.........त्या हळू हळू तिच्या जवळ आल्या..".कोण हैस बाई?"

तर ती त्यांच्या कडे बघू लागली." शांता तू?" एकीकडे शांताचं देह तसाच होता. आणि इकडे शांता म्हणजे तीच आत्म....

"काय झालं...तुज्यासंगत ? मावशी म्हणालीस  न्हवं? सांग....."

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर !!! रोज कधी एकदा पुढचा भाग येतो ह्य कडेच लक्ष अस्तं आमचं. फार ओघवती लिहिली आहे ही कहाणी तुम्ही. पु.भा.प्र.

कथा फास्ट लिहिली आहे हे शंभर टक्के.अचूक निरीक्षण.किती बारकाईने वाचताय! टायपो एरर राहत आहेत. कधी कधी कथानक सुचणं, आणि ते लिहिणं या वेगात फरक राहतो…सुचलेले विसरायला होईल की काय अशी भीती वाटते आणि पटापट लिहायला लागते. प्रतिसाद असले की लिहायला हुरूप येतो.घाई होते हे ही पकडलंत आणि जे चांगलाय त्याला चांगलं ही म्हणता, चुकाही सांगता. मनापासून आभार (हसरी बाहुली)

अडीच वाजता पोस्ट करते, री रिडींग आणि करेक्शन्स करतेय... शुद्धलेखनाच्या चुका करून नाराज करायचं नाहीय आज कुटुंबियांना