प्युअर सिक्वेन्स - भाग ४

Submitted by कविन on 24 October, 2023 - 01:01

भाग 3

भाग ४

शनिवारची सकाळ म्हणून गजर बंद करुन ठेवला होता. पण चिन्याच्या कॉलने झोपमोड झालीच.
"विकेंडला सकाळी ६ वाजता कोण कॉल करतं? आता कारण तसंच काही महत्वाचं नसेल ना चिन्या तर तिथे येऊन बदडेन तुला." मी फोन उचलून बेसिनपाशी जात म्हंटलं.

“अव्या यार एक इमर्जन्सी आलेय. मदत हवी होती. ताईच्या कारला अ‍ॅक्सिडेंट झालाय. जिजूला पण बराच मार लागलाय.”

“ओह! मॅन. फार लागलय? नीट सांग मला सगळं. काकांना सांगितलं? मी येऊ तिथे?”

“दोघंही सध्या आयसीयुत आहेत. ताईच्या मणक्याला फ्रॅक्चर झालय. अजिबात हालचाल करायची नाहीये. जिजूला उजव्या बाजूला बराच मार लागलाय. बाकी तपासण्या सुरु आहेत. तपशील कळले नाहीत फार. जिजूच्या मित्राने कॉल करुन सांगितलं. तिथे गेल्यावरच कळेल आता बाकीचं”

“मी येऊ बरोबर?”

“बाबा येतायत बरोबर.”

“अरे काकांना घरी राहूदेत. मी येतो सोबत.”

“ते ऐकत नाहीयेत. गेली पंधरा मिनिटे हेच समजावण्यात गेली. प्रत्यक्ष बघत नाहीत ते दोघांना तोपर्यंत त्यांनाही चैन पडणार नाही. मी फ्लाईटची तिकिटं बूक केल्येत आमची. आम्ही तिथे जातो आणि मग तुला पुढची माहिती देतो.”

“ओके. नीट जा. मी काय मदत करु सांग मला”

“त्यासाठीच कॉल केलाय मी. इतक्या घाईत लकीची सोय करणं कठीण आहे. यापूर्वीचा डॉग बोर्डींगचा अनुभव तसाही वाईट होता आमचा. दुसरीकडे चौकशी केली होती पण तिथे सध्या जागा नाहीये. लकीला सोडून जाता येणार नाही आणि घेऊन जाणेही शक्य नाही. तुला आजचा दिवस बघायला जमेल का त्याच्याकडे?”

“मला? अरे यार बाकी काहीही सांग हवतर. मी जाऊ का काकांना घेऊन तिथे”

“मी जाणं गरजेचं आहे, बाबांना त्यांच्या मन:शांती साठी नेतोय फक्त."

"बरोबर आहे तुझं पण मला नाही झेपणार अरे."

"मला माहिती आहे टफ टास्क आहे तुझ्यासाठी पण प्लीज ना यार. तो तुझ्याबरोबर कंफर्टेबल असतो. मी नोटीस केलय ना हे.”

“तो असतो रे कंफर्टेबल. माझं काय? मी दहशतीखाली असतो त्याचं काय?”

“त्याची सोय लावून मी उद्या निघायचाही विचार केला होता एकदा पण तिथेही घरचं कोणी लवकरात लवकर जाणं भाग आहे."

"अरे! नाही नाही. तू यासाठी थांबू वगैरे नकोस. तुझं तिथे असणं आत्ता जास्त महत्वाचं आहे. मी बघतो काहीतरी जमवतो"

"Thanks यार, मी सिद्धीलाही मेसेज केलाय. ती तिच्याकडून काही सोय होते का बघतेय. आज संध्याकाळपर्यंत किंवा फारतर उद्यापर्यंत सोय होईल म्हणालेय. तोपर्यंत इथे येऊन थांबलास तरी चालेल किंवा मी तुझ्याकडे आणून सोडतो. तुला जे कंफर्टेबल वाटेल ते सांग.”

"ओके. ठिक आहे. फ्लाईटच टायमिंग काय आहे? मी येतो तिथे.”

“Thanks a lot मित्रा. शब्दात सांगता येणार नाही इतकं मोठं काम केलयस माझं आज.“ असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि आईला कल्पना देऊन मी स्वतःला पेप टॉक्स देत आवरायला सुरुवात केली.

मी तिथे पोहोचेपर्यंत चिन्याने लकीच्या खाण्याचं वेळापत्रक लिहून काढलं होतं. त्याला द्यायला अंड उकडून ठेवलं होतं. त्याचं नंबर दोन प्रकरणही आटोपलं होतं. माझं बिपी हे सगळं बघून जरा नॉर्मल झालं असलं तरी अख्खा दिवस हे सगळं मी कसं हॅंडल करणार होतो देव जाणे.

चिन्या आणि काकाना जाऊन तासभर झाला तरी लकी त्याच्या जागेवरुन जराही हलला नव्हता. त्यांचा बॅंगलोरला पोहोचल्याचा फोन आला तेव्हाही तो त्याच जागी त्याच पोझिशनमधे होता.

मी जरा लांबून त्याला हाक मारुन बघितली. चिन्याने दाखवून ठेवलेली ट्रिट्स समोर धरली तरी काही फरक पडला नाही. माझ्याकडे एकदा बघून परत मान तिरकी करुन तो तसाच बसून राहिला.

नेहमीसारखा तो उत्साही आनंदी वाटत नव्हता. दुपारी खायला तरी उठेलच तो असं वाटलं होतं पण तो चेहरा पाडून तिथेच बसला होता. मग मात्र न राहवून मी जरा धीर करुन त्याच्या डोक्यावरुन हलकेच हात फिरवला. त्याच्या नाका समोर हात नेला. त्याने एकदा माझ्याकडे बघून हात चाटल्यासारखं केलं आणि परत तोंड पाडून बसून राहिला.

सकाळपासून ना खायला उठला ना पाणी प्यायला म्हणून जरा काळजी वाटायला लागली.

मी गुगलवर सर्च केलं तर दु:खी, आजारी ते डिप्रेस्ड डॉग लक्षणं असे रिझल्ट मिळाले. शेवटी मी न राहवून सिद्धीला त्याचा फोटो काढून पाठवला आणि माझ्या शंकाही पोस्ट केल्या.

तिचा पुढच्या पाच मिनिटात फोन आला. तिने calming music पासून ते टच थेरपी पर्यंत छोटे छोटे उपाय सांगितले. मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तीशी नॉर्मल संभाषण करतो तसंच त्याच्याशी करत त्याला घरातली माणसे लवकरच येतील हे त्याच्यापर्यंत पोहोचवायला सांगितले. माणसाचं बोलणं प्राण्याला कळेल? या प्रश्नावर फक्त "प्रयोग करुन स्वतः पहा आज" इतकेच म्हंटले. आत्ता बाहेर आहे पण तरीही मी तिथे यायला हवे असेल तर सांग, मदतीला येऊन जाईन" म्हणत तिने फोन ठेवला.

तिच्या शब्दांनी बराच आधार मिळाला. म्युझिक थेरपीचा फायदा काही दिसला नाही मला. पण हात फिरवत गप्पा मारल्यावर मात्र जरा गडी नॉर्मल झाल्यासारखा वाटला आणि मीच हुश्श केले.

तीन वाजेपर्यंत मात्र फार काही न करताही मला थकायला झालं होतं. बसल्या जागी कधी झोप लागली कळलंही नव्हतं. बेल वाजली म्हणून जाग आली तेव्हा पाच वाचल्याचं कळलं. दोन तास मी असा इथे सोफ्याला टेकून लकी पासून अवघ्या एक हात अंतरावर झोपलो हाच मोठा धक्का होता माझ्यासाठी.

दार उघडल्यावर दुसरा धक्का समोर सिद्धीला पाहून बसला.

“कॉल उचलला नाहीस आणि मेसेजही बघितला नाहीस म्हणून चिन्मयने मला मेसेज केला. माझाही मेसेज अनरीड राहिला. तू ठीक आहेस ना?”

तिचं अर्ध बोलणं रजिस्टरच नव्हतं झालं. ब्लॅक वन पीस, स्मोकी आय मेकअप आणि स्लाईटली ग्लॉसी ओठ हेच काय ते रजिस्टर झाले होते. हम्म! केस थोडे मेसी दिसत होते इतर गोष्टींच्या मानाने पण imperfectly perfect की perfectly imperfect म्हणतात तसं वाटत होतं.

कुठे निघाली असावी? डेट? असेल तर स्पेशल असावी? रमीचा सिक्वेन्स पूर्ण करणारी? त्यादिवशी तर याच्या एक टक्काही एफर्ट घेतले नव्हते हिने. का घेईल म्हणा नकारच तर द्यायचा होता.

तिने परत प्रश्न रिपीट करत लकीने इतका मेंदू थकवलाय का विचारले तेव्हा मेंदू परत जागेवर आला आणि तिचे बोलणे रजिस्टर झाले.

“लकीने काहीच त्रास दिला नाही पण मला सवयच नाहीये म्हणून थकायला झालं.” मी म्हंटलं

“असं होतं. पण डोंट वरी. माझ्या एका मित्राकडे त्याची सोय झालेय. मंगेश.. माझा मित्र, डॉग बोर्डींग चालवतो. त्याचं बोर्डींग थोडं लांब आहे पण मी स्वतः त्याची गॅरेंटी देऊ शकतेय. चिन्मयशी बोलणं झालय माझं त्याबाबत.”

“ओके, दॅट्स ग्रेट! पण लकी राहील नीट? म्हणजे पॅनिक नाही होणार?”

“होपफुली राहील. मंगेशने यापुर्वी अगदी पिटबूल्स, रॉटवायलर्स, डॅशहुंड्स सगळ्या टाईपच्या डॉग्जना हॅंडल केलेय आणि माझा मंगेशवर विश्वास आहे. He is the best. आम्ही डॉग शेल्टरमधे एकत्र वॉलेंटिअर केलय यापूर्वी बरेचदा. प्रॉब्लेम एकच आहे. आपल्याला त्याला वसईपर्यंत कारने न्यावं लागेल. मंगेशला वसई सोडून यायला जमणार नाहीये.”

“ओह, ओके! “

“काळजी करु नकोस मी येईन बरोबर.”

ही डेव्हलपमेंट भारी होती पण तरी मनात मगाशी डोकावून गेलेली शंका काही स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी मी तिच्या एकंदर अवताराकडे निर्देश करत बोलूनच टाकलं, "मला वाटलं होतं तुझा वेगळा प्रोग्रॅम आहे."

"ओह! हे? नाही नाही तसं नाहीये ते. मी लंचला बाहेर गेले होते. तिथे असतानाच मंगेशचा मेसेज आला तसं लगेच चिन्मयला कळवलं. आमच्या दोघांचा फोन उचलला नाहीस की मेसेज बघितला नाहीस म्हणून लंच आटपल्यावर घरी न जाता इथे आले.”

“Thank you. चहा घेशील? माझ्यासाठी ठेवतोच आहे. चहा घेऊन ओला बूक करु.” लंच डेटबद्दल जाणून घेण्यात जराही रस नाहीये मला असं भासवत मी विचारलं.

“आलं घालून करत असशील तर चहा चालेल धावेल पळेल. बांद्र्याहून टॅक्सी करुन सरळ इथे आलेय मी.” ती म्हणाली.

“तू बस इथे लकी बरोबर. मी आलोच चहा घेऊन. चिन्याशीही बोलून घेतो.”

आमचं संभाषण ऐकत असलेल्या लकीने आता तिचा ताबा घेतला होता. ती लकीला जवळ घेऊन कुठे जातोय? काय करतोय सांगत होती आणि तो ही तिचं बोलणं कळतय अशा अविर्भावात तिच्याकडे बघत होता.
त्यांना डिस्टर्ब न करता मी चहा करायला किचनमधे वळलो.

"ओला राईडमधे पेट्सना प्रवेश देतात?" मी चहाचा कप तिच्या हातात देत विचारलं

"असा काही नियम नाहीये त्यांचा बंदी असल्याचा पण ते त्या त्या ड्रायव्हरवर असतं. काहीना चालतं तर काही ड्रायव्हर राईड रिजेक्ट करतात. बूक केल्यावर ड्रायव्हरला फोन करुन विचारलेलं बरं माझ्यामते." चहाची वाफ डोळ्यावर घेत तिने उत्तर दिलं.

"ओके. Don't take it wrong, पण प्रवास कितपत तापदायक होऊ शकतो त्याच्यासाठी आणि आपल्याही साठी?

"Be ready for a bumpy roller coaster ride." तिने डोळे मिचकावत म्हंटलं.

आता या वाक्यात माझी मस्करी करायचा उद्देश किती आणि खरं किती हे कळणार होतंच थोड्यावेळात. लंच डेट ना सही ओला राईड तो साथ मे नसीब हो गयी. असं स्वतःशीच म्हणत मी ट्रे उचलून आत गेलो.

मी कप विसळून बाहेर येई पर्यंत तिने लकीला हार्नेस आणि लीश लावून तयार केलं. मी ओला बुक करुन ड्रायव्हरला पेट्स चालणार आहे का कन्फर्म करायला कॉल लावला.

तिने चिन्मयशी बोलणं झाल्याप्रमाणे लकीचे ट्रीट्स, आवडते ब्लॅंकेट, डॉग कार सीट कव्हर आणि छोटे टॉय एका बॅगेत घेतले. पाणी बॉटल, ड्राय डॉग फूड आणि त्याचा नेहमीचा खाण्याचा बोल ॲडिशनल सेफ्टी म्हणून सोबत घेतले.

चिन्या म्हणाला तसा कार सिकनेस करता दिलेला स्प्रे काही आम्हाला मिळाला नाही त्याच्या सामानात. त्यामुळे आता जे होईल ते होईल म्हणत आम्ही तयार होऊन खाली उतरलो.

राईड यायला अजून ७ मिनिटे दाखवत होती. तेव्हढ्या वेळात मी चिन्याला सोसायटी सेक्रेटरीशी बोलून बाईक एक रात्र ठेवू देण्याबद्दल परवानगी घ्यायला सांगितल आणि त्याच्या सांगण्यानुसार सोसायटीच्या वॉचमनला भेटूनही कल्पना दिली.

सोसायटी वॉचमन मला ओळखत होता म्हणून बाईक त्याच्या जीवावर सोडून निघायला तसा काही प्रॉब्लेम नव्हता मला.

आता राईड २ मिनिटावर दिसत होती ॲपवर.
आम्ही तिघे राईडची वाट बघत गेटजवळ येऊन थांबलो.

विकेंड एकंदरीत फारच हॅपनिंग होत चाललाय.

क्रमशः
भाग ५

Group content visibility: 
Use group defaults

ओक्के..ओला राईड साथ साथ! (पण बिचाऱ्या ताई आणि जिजुंना accident करून घ्यावा लागला ना यांना ओला राईड मिळावी म्हणून!)
लकी ओली करून नको ठेऊस आता ओला!!

पण वादळ किधर है? सिद्धीच्या स्मोकी आय मेकअप मध्ये? का आता ओला मध्ये येणार? सुहाना सफर और ये मौसम हसीं वगैरे वगैरे? Wink

अनु, रायगड, मन्या धन्यवाद

लकी ओली करून नको ठेऊस आता ओला!!>> अर्र! बाकी कोणाची नाही तरी ड्रायव्हरवर कृपा कर गं. परत कधी पेट्सना एंट्री देणार नाही नाहीतर तो. Lol

मला तर आता तो हम आपके है कौन चा टफ्फी होईल वाटतं...>> लकीने hahk नाही बघितलाय म्हणून बरय Lol

धन्यवाद रमड.

पण वादळ किधर है? सिद्धीच्या स्मोकी आय मेकअप मध्ये? का आता ओला मध्ये येणार? सुहाना सफर और ये मौसम हसीं वगैरे वगैरे>> येडाय ग तो अवनीश. पण सांगेल तोच याबद्दल पुढच्या भागात Wink

किती छोटा भाग केलायस गं.

ओला नाही घडणार. शेवटी बाईकवर जावं लागणार बहुतेक.

जाताना तिघं, अन येताना दोघं
सूनच आणेन भेटवायला!

हा भाग लेट डाऊन झाला हा! काही तरी घडवा चटकन! Lol
वाचतोय!
मामी सारखंच वाटलं.... बाईक बद्दल जरा जास्तच फुटेज आहे तेव्हा बाईकचा रोल असणार का? तसंही परत येताना बाईक बरी पडेल ना! Lol

हा भाग लेट डाऊन झाला हा! काही तरी घडवा चटकन! Lol>> हो हो लकीला सांभाळून दमलाय हिरो. जरा ताळ्यावर आलं डोकं की करेल काहीतरी हालचाल Lol

किती छोटा भाग केलायस गं.>> सॉरी बर्का मामी Proud खूप मोठा भाग झाला म्हणून ४ & ५ अशी कात्री लावायला लागली मला. परिमार्जन म्हणून उद्याच टाकते बघ तुझ्यासाठी ५ वा भाग Happy

बाईक बद्दल जरा जास्तच फुटेज आहे तेव्हा बाईकचा रोल असणार का? >> मलाही तेच वाटले. ओला नि बाईक वर भलताच भरवसा दिसतोय. Happy

काही तरी घडवा चटकन! >> +१ म्हणजे अगदी रमड म्हणते तसे रुप तेरा मस्तानाच हवे असे नको पण .... Wink

धडाधड चारही भाग वाचुन काढले. Cute आहे कथा. I love lovestories. आता पुढचे भाग आणि सुखांत वाचायची घाई झाली आहे. मस्तशी वेब सिरीज होईल. आधी पाहिलेल्या मुली, त्यातले एकेक नमुने, अविच्या घरातील लग्न चर्चा, मग सिध्दी, थोडे तिच्या dog त्रेनिंगचे शॉट्स, तिच्यानंतर भेटलेल्या रुक्ष वकील मुली, अवी, चिन्या आणि त्यांची मैत्रिण यांच्यातील दोस्ती प्रसंग / नोकझोक इ इ

पुणेरी कुजका / भोचक निरीक्षण -
दुपारी लंचला जाताना LBD आणि smokey eye makeup, यावरून मी मुलगी नापसंद केली असती Wink

ओहो, मस्त चौथ्या भागात बरंच हॅपनींग घडलंय. कवे, मी केड्रामा सोडून आधी तुझी गोष्ट वाचतेय हल्ली. मीरा इज म्हंणींग राईट, यावर वेबसिरीज होईल झकास पैकी.
पण मामी म्हणतेय ते रिस्की आहे, बिचाऱ्या लकी ला बाईक वरुन? ते ही वसईपर्यंत? मला अजिबात झेपत नाहीये. त्याऐवजी ओला सगळ्यांनाच कंफी आहे. छान एसी.

ते रिस्की आहे, बिचाऱ्या लकी ला बाईक वरुन? ते ही वसईपर्यंत? मला अजिबात झेपत नाहीये.>> अगदी अगदी. माझ्यासारख्या पेट पॅरेंटलाही घाम फुटेल मग अवनीश तर रोमान्स चा र पण उच्चारु शकणार नाही बधीर होऊन Lol

काही भुभू एंजॉय करतात बाईक राईड. मी रस्त्याने नेताना बघितल आहे. पण तरी वसई पर्यंत म्हणजे असं न्यायचं तर माझ्याच पोटात पाकपूक होईल. त्यापेक्षा कारसिकनेस टॅकल करणं आणि व्हाईनिंग टॅकल करणं परवडेल Lol

दुपारी लंचला जाताना LBD आणि smokey eye makeup, यावरून मी मुलगी नापसंद केली असती Wink>> अनु आणि मीरा माफी द्या सिद्धीला. फॅशन सेन्सचा फार विचार न करणारी बया आहे ती. शिकेल हळूहळू Lol तसही अवनीश आधीच गारद झालाय, ती वर्कर्स युनिफॉर्म जरी घालून गेली असती तरी त्याला beautiful च वाटली असती Lol

हा भाग जरा फिल्मी वाटला, पण चालतंय...

:स्मोकी आय मेक-अप म्हणजे कसा या विचारात पडलेली काकू-बाहुली: Lol