चिनी पाहुणा

चिनी पाहुणा

Submitted by Asu on 12 April, 2020 - 01:43

चिनी पाहुणा

शपथ घालतो तुला माणसा
टाकू नकोस पाऊल पुढे
लक्ष्मणरेषा उंबरठ्याची
ओलांडुनी जाशील कुठे?

कोरोनाचा चीनी रावण
मागतो भिक्षा दारोदारी
नका फसू चिनी नाटक्या
रक्षा करा राहून घरी

साम्यवादी चिनी पाहुणा
जेष्ठ-श्रेष्ठ ना भेद करी
सुष्ट-दुष्ट समान सगळे
सगळ्यांशी हा करतो यारी

मैत्रीखाली शत्रू लपला
चिनी भुताची निती खरी
हिंदी चीनी भाई म्हणुनि
जाईल घेऊन मरणदारी

नको बाहेरची मेवामिठाई
घरची बरी मीठ भाकरी
घरात बसू मिळून हसू
करू घरच्या घरी चाकरी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चिनी पाहुणा