Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 13 April, 2020 - 04:53
आहे तो माझा नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
घुटमळतो देहामध्ये तो श्वास स्वत:चा नाही
होता तो माझा नव्हता, आहे तो माझा नाही
पडद्यावर दिसते आहे ती खरी जिंदगी नाही
जो समोर दिसतो आहे तो खरा चेहरा नाही
तू विचार करायचा ना मज चुंबायाच्या आधी
सोडेन हातची संधी इतका मी साधा नाही
तू टप्प्यामध्ये माझ्या आल्यावर मरणारच ना ?
मी वजीर होतो वेड्या कुठलासा प्यादा नाही
शब्दांनी देऊ शकतो मी मनासारखे उत्तर
पण प्रश्न तिच्या मौनाचा तितकासा सोपा नाही
तू नकोस मारू हाका टाकू नजरेने जाळे
फसण्याचा आता सखये माझाच इरादा नाही
देहाच्या फांदीवरचे स्वच्छंद पाखरू आहे
हा आत्मा कैदी नाही, हा देह पिंजरा नाही
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>
>>>
देहाच्या फांदीवरचे स्वच्छंद पाखरू आहे
हा आत्मा कैदी नाही, हा देह पिंजरा नाही
<<<
वा!
मनस्वी धन्यवाद.....
मनस्वी धन्यवाद.....
छानच...
छानच...
>>तू टप्प्यामध्ये माझ्या आल्यावर मरणारच ना ?
मी वजीर होतो वेड्या कुठलासा प्यादा नाही<<
शेवटच्या कडव्या व्यतिरिक्त हे पण खूपच आवडले...
एकसो एक शेर...
एकसो एक शेर...
शेवटचा तर आरपार....