श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट -वरद - वैष्णवीका
श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा
अ गट -वरद कार्लेकर
वय - १० वर्षे
श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा
अ गट -वरद कार्लेकर
वय - १० वर्षे
मी मायबोलीवर नवीन आहे, त्यामुळे इथले बरेच संक्षेप अजिबात समजत नाहीत. त्यांचा खुलासा कोणी करू शकेल का? उदा.:
1. धन्स
2. बाफ
3. रच्याकने
4. विबासं
5. मावे (हे मायक्रोवेव्ह असावं असा अंदाज आहे)
अजून काही असतील तर तेही सांगा कृपया..
इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? पूर्वी फ्रेंच आणि जर्मन या भाषांना इंग्रजीपेक्षाही मानाचं स्थान होतं म्हणे.मग या भाषांना मागं टाकून इंग्रजीला जगभर पसरवून ती जागतिक भाषा बनवणं इंग्रजांना कसं शक्य झालं? इतकी की ती आज विज्ञान/तंत्रज्ञानाचीसुद्धा सर्वात महत्त्वाची भाषा बनली आहे.
आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
नवलच ये कारण असं वाटलं न्हवतं याच्या आधी काही,
लिहिण्याआधी वाटलं होतं किती लिहिल आणि किती नाही,
लिहिताना मात्र प्रश्न पडला काय लिहु आणि काय नाही,
किती राबते ती आमच्यासाठी हे लिहू की
किती जिव आहे तिचा आमच्यावर हे लिहू,
तिची प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी हे लिहू की
तिच अस्तित्त्वच हरवलीये ती आमच्यात हे लिहू,
छोट्या छोट्या गोष्टीत तिचं सुख मानन लिहू
की संकटांना सामोर जाताना तिचं खंबीर होन लिहू,
आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
'आई'च लिहू शकलो फक्त.. पुढे पेन उचललाच नाही..
मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे. यामुळे आपल्याला बँकेच्या नावाच्या पाट्यांवर 'बैंक' असे लिहिलेले दिसते.ते आपणा मराठी लोकांच्या दृष्टीने ब+ऐ+न्+क = बैंक असे असले तरी हिंदी भाषिकांच्या दृष्टीने ते ब+ॲ+न्+क = बँक असेच आहे.
माडिया गोंड भाषा येणारे कोणी इथे आहे का? मला थोडी मदत हवी आहे.
धन्यवाद
मायबोली वर लिहिणे हा माझ्या मते एक अभिमानाचा विषय आहे. इंग्रजीत त्याला आपण प्रेस्टीजियस असे म्हणू. मराठी ही देव नगरी या लिपीत लिहिली जाते. देवनगरी म्हणजे देवांच्या नगरीत जी लिहिली आणि बोलली जाते ती. म्हणजे विचार करा की ही भाषा आणि लिखाण किती पवित्र असेल. मायबोली वर मराठी लिहिणाऱ्या समस्त मंडळींना आपण दंडवत का घालावे याचं हे एकच कारण पुरेसे नाही का?अशी लिपी आपण लिहितो आणि असे लिखाण आपल्याला कळते ही भाग्याची गोष्ट नाही काय?
इतर लीपिंची नावं ऐकली आणि देवनागरी लीपिशी तुलना केली तरी त्यातला फरक लक्षात येतो.
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.