भाषा

काहींही हं श्री(बिथोवन!)

Submitted by बिथोवन on 6 July, 2020 - 23:34

मायबोली वर लिहिणे हा माझ्या मते एक अभिमानाचा विषय आहे. इंग्रजीत त्याला आपण प्रेस्टीजियस असे म्हणू. मराठी ही देव नगरी या लिपीत लिहिली जाते. देवनगरी म्हणजे देवांच्या नगरीत जी लिहिली आणि बोलली जाते ती. म्हणजे विचार करा की ही भाषा आणि लिखाण किती पवित्र असेल. मायबोली वर मराठी लिहिणाऱ्या समस्त मंडळींना आपण दंडवत का घालावे याचं हे एकच कारण पुरेसे नाही का?अशी लिपी आपण लिहितो आणि असे लिखाण आपल्याला कळते ही भाग्याची गोष्ट नाही काय?
इतर लीपिंची नावं ऐकली आणि देवनागरी लीपिशी तुलना केली तरी त्यातला फरक लक्षात येतो.

शब्दखुणा: 

शब्द

Submitted by पाचपाटील on 24 June, 2020 - 00:33

बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत

बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं

बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर

बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत

बोलणं, वार्‍यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं

बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.

बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.

एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.

पश्चाताप

Submitted by सखा on 13 June, 2020 - 23:18

काळोख दग्ध रात्र प्रहरी अवचितच अरण्यात विज चमकावी व तिच्या दिव्य कल्लोळात एखाद्या प्राचीन मंदिराचे भग्नावशेष उजळून निघावे आणि प्रचिती यावी धूमकेतूच्या आदिम उगमाची. तशी काहीशी ही अनुभूती.
प्रात:समयी कसलेल्या योध्या प्रमाणे त्याची तर्जनी चाळवली गेली. सावजाला बघताच जशी चक्र फिरू लागतात हिंस्त्र श्वापदाच्या मेंदूच्या पेशी पेशीत किंवा युद्धभूमीत टारारून फुगते त्या तपस्वी योद्ध्याच्या भव्य माथ्या वरली बाहुबली शीर. तद्वत.

मायबोलीवरील शॉर्टकट्स

Submitted by शिवप्रीत on 25 May, 2020 - 07:58

समस्त मायबोलीकर, नवीन मायबोलीकर या नात्याने मला मायबोली वरती वापरले जाणारे सर्व शॉर्टकट्स जाणून घ्यायचे आहेत. कृपया मदत हवी!?!

एकटीच @ North-East India दिवस २९

Submitted by सुप्रिया राज जोशी on 17 May, 2020 - 10:33

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

६ मार्च | दिवस २९

प्रिय आई,

एकटीच @ North-East India दिवस २८

Submitted by सुप्रिया राज जोशी on 7 May, 2020 - 10:23

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

5th मार्च 2019

प्रिय nameless जावई,

एकटीच @ North-East India दिवस २७

Submitted by सुप्रिया राज जोशी on 6 May, 2020 - 15:20

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

4th मार्च 2019

प्रिय कोमल,

विषय: 

धर्मो रक्षति रक्षितः

Submitted by maitreyee on 9 April, 2020 - 12:58

परवा टिव्ही वर स्पेशल ऑप्स ही सीरीज बघताना रॉ चे ब्रीदवाक्य दिसले
"धर्मो रक्षतो रक्षितः"
अर्थाचा नीट विचार केलेला नव्हता कधी पण आता केला. आणि डोक्याला किडा लागला.
प्रचलित अर्थ साधारण पणे - धर्माची रक्षा करणार्याचे रक्षण धर्म करतो असा काहीसा सांगितला जातो पण शब्दशः पाहिले तर तो अर्थ चुकीचा वाटतो.
धर्मो रक्षति - हे सरळ आहे , पण धर्मो रक्षति रक्षकः असे नसून ते "रक्षितः" असे आहे. रक्षित = ज्याचे रक्षण केले गेलेले आहे असा होतो. ज्याने त्या ओळीचा अर्थ बदलतो! मग मी तो पूर्ण श्लोक शोधला तो असा :
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः

शब्दखुणा: 

निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

Submitted by तैमूर on 24 March, 2020 - 23:08

संत एकनाथ एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक विकृत माणूस त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. विकृत परत थुंकला, नाथांनी परत बुडी मारली. अस १०८ वेळा घडलं. नाथांनी ना त्याला शिव्या दिल्या, ना शाप दिले, न काही बोलले.

शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिली:

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भाषा