भाषेशी खेळू नका
************
भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी
कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी
भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी
एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी
आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही
मायबोली
माय मराठी, आई मराठी
वाढलो आम्ही बोलत मराठी
नाव मराठी, गाव मराठी
अनं हावभाव आमचे ते बी मराठी.
संतांची वाणी मराठी,
सहयाद्रीची गाणी मराठी
शिवशंभूंचे राज्य मराठी
अनं भगवे आमुचे रक्त ते बी मराठीचं
शिरकाव झाला परभाषेचा
कोनीच न उरला वाली
पेचात पडली आमुची मायबोली
धुंद झाली आमुची मती
आमचीचं आम्ही केली माती
सांगावे लागेल जगाला
आमची मराठी काय होती
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
नेपाळ मध्ये सरकारी आणि खासगी शाळांत चीनी भाषा मेंडरीन (Mandarin) शिकवली जाणार आहे. ह्या साठी नेपाळ सरकारने पुढाकार घेतला आहे.
हि भाषा शिकवण्यासाठी ,शिक्षकांचा संपूर्ण खर्च चीन सरकार करणार आहे. नेपाळ सरकारने फक्त त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची तरतूद करायची आहे आणि त्यासाठी नेपाळ सरकार तयार आहे.
पण नेपाळ हि भाषा का शिकत आणि आणि चीन खर्च करून हि भाषा का शिकवत आहे.
तू फक्त भेट तिला किनारा बनून
फिरू दे ना थोड तिला
तुझ्या प्रेमाच्या किनाऱ्यावर,
भिजू दे ना तिला थोड,
त्या तुझ्या बऱ्या वाईट लाटांतुन उडणाऱ्या तुषारांमध्ये,
कळू देत तिला काय देण लागते ती या समुद्राच
भेट तिला एकदा किनारा बनून...
रेखाटू देत तिला ही
तिच्या मनात लपून ठेवलेल्या जखमा
तुझ्या मनाच्या रेतीवर,
पण हो लाटांनी त्या पुसायचा प्रयत्न मात्र नको करुस
मग बघ बांधेल तीही,
तिच्या स्वप्नांचा महल.
तू मात्र शंख शिंपल्यांची आरास करून तिला थोडीफार मदत मात्र कर.
१. भारतात संस्कृत ही भाषा साधारण कधी आली?या विषयाची बहुतांश 'मान्यताप्राप्त इतिहास संशोधन संस्थांनी' मान्य केलेली थेअरी कोणती?
२. संस्कृत भारतात येण्याआधी संपूर्ण भारतात द्रविड कुळातल्या भाषाच बोलल्या जात होत्या का?की अजून कोणते कुळ होते?कोणत्या प्रदेशात?
काय असते चव.. कळू दया हे तरी
या सुखान्नो एकदा माझ्या घरी
साजरे करते ऋतूंचे सोहळे
बदलते रुपडे... धरा नटमोगरी !
काय दयावा मी स्वतःचा भरवसा ?
ओळखीची मी कुठे माझ्यातरी
चांदण्यांची प्रणयगाथा कल्पिते
लाजते आभाळ, होते शेंदरी
संयमाचे वस्त्र होते ओढले
वासनांच्या बरसल्या जेव्हा सरी
साखळीपाणी किनारी खेळते
लाट फिरते परतण्याला सासरी
धृवतारा व्हायचे होते मला
रिक्त नव्हते स्थान त्याच्या अंतरी
सुप्रिया मिलिंद जाधव
ढिगाने पडलेत ग तारे, रोज ढिगाने वाढतातही म्हणे
पण त्या ढिगात, तू बरोबर बोट करून कस मलाच ओळ्खतेस नेहमी?
बहुदा जास्त चमकत असेल ना मी
की तुझ्या डोळ्यातील आसवे मला पाहून जास्त चमकतात?
इथे एक एक जण खर्ची पडतो
तेंव्हा बहुदा एका ताऱ्याचा जन्म होतो नाही!
की तुम्ही लोकांनीच ही अंधश्रद्धा पाळलीय मनात
मी सांगतोय, मी नाहीय तो तारा
मी काय कुणीच नाहीय कोणता तारा
आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात. ज्याला लाडाने आपण खट्टे मिठे सुद्धा म्हणतो आणि खरच असतात ते तशे. काही अनुभव शरद ऋतूतील चांदण्यांप्रमाणे असतात, अगदी अल्लड, नाचतच येतात आपल्या भेटीला सुखद धक्के घेऊन. काही खूपच अंधरलेली असतात अगदी शिशिरातल्या काळ्या रात्री सारखे, एकदा आले की तेवढा काळ अंधार सोडून आपल्याला काहीच दिसत नाही. ओढल्या जातो आपण त्या अंधारलेल्या रात्रीच्या भयाण शांततेत, जेंव्हा आपल म्हणायला अस चांदण ही उरत नाही. काही अनुभव ढगाळलेले असतात आषाढातील आसमंताप्रमाणे, नभांसारखे दाटून आलेले असतात पण कधी बरसून एकदा रिते होतील आपल्याला पण माहीत नसते.