Submitted by सुप्रिया जाधव. on 4 June, 2019 - 23:15
काय असते चव.. कळू दया हे तरी
या सुखान्नो एकदा माझ्या घरी
साजरे करते ऋतूंचे सोहळे
बदलते रुपडे... धरा नटमोगरी !
काय दयावा मी स्वतःचा भरवसा ?
ओळखीची मी कुठे माझ्यातरी
चांदण्यांची प्रणयगाथा कल्पिते
लाजते आभाळ, होते शेंदरी
संयमाचे वस्त्र होते ओढले
वासनांच्या बरसल्या जेव्हा सरी
साखळीपाणी किनारी खेळते
लाट फिरते परतण्याला सासरी
धृवतारा व्हायचे होते मला
रिक्त नव्हते स्थान त्याच्या अंतरी
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<<
<<<
धृवतारा व्हायचे होते मला
रिक्त नव्हते स्थान त्याच्या अंतरी
>>>
क्या बात है, अ-प्र-ति-म _/\_
धृवतारा व्हायचे होते मला
धृवतारा व्हायचे होते मला
रिक्त नव्हते स्थान त्याच्या अंतरी>> कोणते शेर कोट करु? सगळेच सुंदर जमले आहेत. अगदी छान!
सुंदर
सुंदर
सर्वच्या सर्व शेर आवडले.
सर्वच्या सर्व शेर आवडले.
खूप छान☺️
खूप छान☺️
सुरेख
सुरेख
संपूर्ण गजल मस्तच...
संपूर्ण गजल मस्तच...
भरवसा शेर जास्त आवडला...
खुप छान , मजा आली
खुप छान , मजा आली
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
आई ग...
आई ग...
काय द्यावा
काय द्यावा
मी स्वतःचा
भरवसा?
ओळखीची मी
कुठे
माझ्यातरी
वाह! क्या बात है!