भाषा

शब्दजोड्यांचा खेळ

Submitted by तोमीन on 1 March, 2020 - 07:39

नमस्कार
मराठी दिनानिमित्त आम्ही आमच्या मित्रपरिवारात काही खेळ खेळलो.
त्यापैकी एक शब्दखेळ आपल्या विरंगुळ्यासाठी आणि भाषाज्ञानाला चालना देण्यासाठी इथे देत आहे.

खाली दिलेल्या शब्दजोडीची समर्पक उत्तरे द्यायची आहेत. दोन्ही उत्तरे ३ अक्षरी आहेत. जोडीच्या दोन्ही उत्तरांची पहिली दोन्ही अक्षरे समान आहेत. तर फक्त तिसरे भिन्न आहे.

उदा: मधला / दलाल
उत्तर आहे : मध्यम / मध्यस्थ
……..

०१ प्रीत /ओंकार
०२ सहाय्य /अनंग
०३ खटाटोप /प्रस्थान
०४ जुळे /एक शब्दालंकार
०५ लोक /संयोग

विषय: 
शब्दखुणा: 

मावशीच्या कचाट्यातील "माय"मराठी

Submitted by Silent Banker on 1 March, 2020 - 00:37

भाषाशात्र्यज्ञांच्या मते संवादचे माध्यम असणाऱ्या भाषांचे ४ भागात वर्गीकरण करता येते। या भाषांची जर एक उतरंड पद्धतीने मांडणी केली तर सर्वात तळाशी येते ती " बोली भाषा " ज्यामध्ये जगातील ९८% भाषा समाविष्ट होतात। या परिघावरच्या भाषा जगातील १०% पेक्षा कमी लोक बोलतात। या भाषा छोट्या छोट्या समुदायात संवादासाठी वापरले जातात। त्यानंतर नंबर लागतो तो काही प्रमुख " प्रादेशिक/राष्ट्रभाषा यांचा ".

शब्दखुणा: 

म्हणी ओळखा : चित्रखेळ

Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26

थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.

mhnaee pict.png

विषय: 
शब्दखुणा: 

अक्षरगाणे

Submitted by कविन on 26 February, 2020 - 22:41

अ अ रे आईचा
ब ब रे बाळाचा
क क रे कोणाचा?
काळ्या काळ्या केसांचा

ख ख रे खाण्याचा
ग ग रे गाण्याचा
घ घ रे कोणाचा ?
तो तर माझ्या घराचा

च च रे चकलीचा
छ छ रे छत्रीचा
ज ज रे कोणाचा?
जेवणातल्या जिलबीचा

झ झ रे झोपेचा
ट ट रे टोपीचा
ठ ठ रे कोणाचा?
ठ तर आहे ठेंग्याचा

ड ड रे डब्याचा
डबा असतो खाऊचा
ढ ढ रे ढगाचा
काळा ढग पावसाचा
ण ण रे कशाचा?
पाणी गाणी शब्दामध्ये
ण तर असतो शेवटचा

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

Submitted by पाषाणभेद on 22 February, 2020 - 19:48

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

तो जपानी परत का गेला?

Submitted by सखा. on 22 January, 2020 - 03:24

images (1).jpeg
जपानी प्रवासी हरुतो ताकाहाशी सान यांच्या प्रवासात चोरीला गेलेल्या डायरी मधील नोंदी:

दीर्घ आजारातून, सर्जरी नंतर बरे होतांना तुम्ही काय काय केले?

Submitted by प्रशि_क on 7 January, 2020 - 01:53

जेव्हा तुम्ही अगदी २ ३ महीने घराच्या बाहेर निघालेले नसता, तेव्हा तुमचे अनुभव एकदम नगण्य होऊन जातात त्या काळापुरते तरी. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात बोअर व्हायला लागतं. लिखाण करणारे असाल तर, लिहायला ही काही विषय सुचत नाहीत. आता माझ्याबाबतीत सुद्धा असेच होत आहे, काहीतरी व्याधी झाली आणि मी २ महीने नुकतेच पूर्ण केले, कशाचे- घराच्या बाहेर पाऊल न टाकण्याचे. आणि, आयुष्य एवढे कंटाळवाने वाटू लागले आहे की बस्स!

चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

Submitted by कुमार१ on 22 December, 2019 - 21:18

पूर्वार्ध इथे : https://www.maayboli.com/node/72730
*********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 

स्वावलंबी

Submitted by nimita on 9 November, 2019 - 04:05

नाही आवडत तुला
माझं कोणावर अवलंबून राहणं
माहीत आहे मला

आणि म्हणूनच भीती वाटते

इतकंही स्वावलंबी नको करू मला
की उद्या तुझीही गरज नाही भासणार ...

©प्रिया जोशी

Pages

Subscribe to RSS - भाषा