(परमस्नेही खासे अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे
वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी विनंती केली ऐसीजे..
याप्रमाणे जाहली हकिकत लिहिली असें.)
ये समयी मौजे पुणे मुक्कामाचे दिवस मोठे मौजेचे.
रात्रीचा उद्योग रात्री करावा आणि दिवसाही रात्रीचाच उद्योग करावा, ऐसा सुवर्णकाळ प्राप्त जाहला असे.
ऐशाच येका दिवशी सूर्यास्त इत्यादी जालियानंतर दोन घटिका मौज करणें हेतूने आम्ही 'बैसलों'.
परंतु येकमेकांचे आणि आलम दुनियेचे गुणदोष काढितां
काढितां मोठीच मौज येऊ लागल्याने दोन घटिकांच्या चार-आठ घटिका कैशा होत गेल्या कळावयास मार्ग नाही..!
माझे दहावीपर्यंतेच शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले, म्हणजे अगदी विज्ञान सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करण्यापेक्षा Newton’s law of motion पाठ करणे सोपे आहे हे अकरावाव्या वर्गात समजले. बऱ्याचदा असे वाटते स्वादुपिंड, यकृत, आतडे, जठर यात अडकून जर गोंधळ झाला नसता तर मी आज इंजीनियर होण्याऐवजी डॉक्टर झालो असतो. आता जरतरला काही अर्थ नाही. माझा इंग्रजी माध्यमाचा पहिला तास आजही आठवतो. अकरावीचा गणिताचा तास होता. सर Logarithm शिकवत होते. सरांनी फळ्यावर a^n असे लिहिले आणि याची फोड करुन सांगा असे विचारले. मी आपला आधी मराठी भाषेत विचार केला
15 ऑगस्टच्या तयारीसाठी आमच्या बोकलवाडीच्या सुप्रसिद्ध शाळेच्या मेन गेटपाशी एखादा माणूस कमरेपर्यंत आरामात उभा राहू शकेल एवढा मोठा खड्डा हेडमास्तर दाबे सरांच्या मर्जीत नसलेल्या शिक्षकांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. एक मोठे लोकल नेते तिथे एक कुठलेसे झाड की झुडूप लावायला येणार आहे म्हणे! झाड लावण्यासाठी एवढा मोठा खड्डा करतात का? असा लॉजिकल विचार तुमच्या मनात येऊ शकतो परंतु महत्त्वाचा मुद्दा तो नाही, मुद्दा ऑलिंपिकचा आहे, अभिमानाचा आहे, खेळाडू वृत्तीचा आहे.
नीरज चोप्रा कुठल्या जातीचा आहे यावर अख्ख्या भारतात मूलभूत चर्चा चालू आहे. त्यामुळे मला ही गोष्ट तुम्हाला सांगणे अत्यंत गरजेचं वाटतं. कृपया मनःपूर्वक आणि शांतपणे वाचाच. एक उत्कृष्ट सीक्रेट तुम्हाला कळाल्याचा हर्ष नक्कीच होईल.
ही गोष्ट भारतातील ग्रामीण भागातली जरी असली तरी अर्थातच माणसानी चंद्रावर पाऊल ठेवायच्या किती तरी वर्ष आधीची आहे. आपणास कदाचित ऐकून माहीत असलेल्या बोकलवाडी जवळील सुप्रसिद्ध झोल बुद्रुक गावाचं नाव हे तिथे राहणाऱ्या लोकांच्या वृत्ती मुळे पडलं याची इतिहासात नोंद आहे.
''तो हिंदू आहे का?''
होय.. पण चॉईसनं वगैरे नाही.
आई-बाप हिंदू, म्हणून तो हिंदू.
"कसा हिंदू आहे तो?"
गोडसेवाला हिंदू नाही,
गांधीवाला हिंदू आहे तो..!
बरं वाटतं ते त्याला स्वतःपुरतं,
किंचाळावं वगैरे लागत नाही त्यात.
'तो परंपरावादी आहे का?'
नाही.
पुरणपोळी मिळते म्हणून सण आवडतात त्याला.
बाकी तो देवळांच्या वगैरे वाट्याला जात नाही.
आणि देवांनीही फारसं मनावर घेतलेलं नाही त्याला
अजूनतरी..
पण असं असलं तरीही तुकाराम जाम आवडतात त्याला..!
आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?
(या माझ्या लेखावर मला अगदी प्रामाणिक प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माझे येथे काही चुकत असेल तर तेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.)
खरं तर हा लेख लिहायला मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं. कारण मी स्वत: किंचितसा लेखक आहे आणि बराचसा प्रकाशक. तरीही या विषयावर लिहिण्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही म्हणून लिहित आहे. वाचकांनी त्याबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करावी.
आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्यापैकी बरीच मंडळी घरी बसून आहेत (किंवा त्यांनी तसे बसणे अपेक्षित आहे.). वाचनासाठी आता नक्कीच आपण वेळ काढू शकतोय.
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
माझ्यासारखे अनेक मराठी वाचक मराठी वाचनासाठी मायबोली या संकेतस्थळाला भेट देत असतील. आणि मायबोलीवर लिहिणाऱ्या अनेक मान्यवर लेखकांच्या कसदार लिखाणामुळे कधी निराश व्हावे लागत नाही. पण सध्या कथा/ लेखांमध्ये हिंदी इंग्रजी या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसुन आला. कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी अन्य भाषा वापरणे आणि १० टक्क्याहुन अधीक लिखाण अन्य भाषेत करणे यामध्ये फरक असावा. याबद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच अन्य भाषेतील लिखाणामध्ये मराठीचा थोडाफार वापर होतो का यावरही जाणकारांनी प्रकाश टाकला तर उत्तम होईल.