Submitted by वीरु on 22 March, 2021 - 02:21
माझ्यासारखे अनेक मराठी वाचक मराठी वाचनासाठी मायबोली या संकेतस्थळाला भेट देत असतील. आणि मायबोलीवर लिहिणाऱ्या अनेक मान्यवर लेखकांच्या कसदार लिखाणामुळे कधी निराश व्हावे लागत नाही. पण सध्या कथा/ लेखांमध्ये हिंदी इंग्रजी या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसुन आला. कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी अन्य भाषा वापरणे आणि १० टक्क्याहुन अधीक लिखाण अन्य भाषेत करणे यामध्ये फरक असावा. याबद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच अन्य भाषेतील लिखाणामध्ये मराठीचा थोडाफार वापर होतो का यावरही जाणकारांनी प्रकाश टाकला तर उत्तम होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
याबद्दल तारतम्य स्वतः
याबद्दल तारतम्य स्वतः लेखकांनी बाळगायला हवे,
बाकी १०% पेक्षा जास्त मजकूर इतर भाषिक मजकूर असेल तर प्रसिद्ध करताना एरर असा बदल थोड्या कष्टाने करता येतो. पण मग त्याला पण लोक पळवाट काढतात. ते एक वाक्य मराठीत लिहून १०-१५ वेळा चिकटवून एकूण परकीय भाषेतला मजकूर १०% करतात
सर्व मराठी/ महाराष्ट्रातील प्रांतीय बोलीभाषा (खानदेशी अहिराणी कोल्हापुरी वर्हाडी आगरी मालवणी इत्यादी) मात्र याला अपवाद, या नक्की याव्यात आणि वाचल्या जाव्यात.
त्यामुळे स्वतः लेखकच मराठी संकेतस्थळावर मराठी लिहीतील, आणि अती जास्त परकीय भाषा असतील (यात हिंदी इंग्लिश गुजराती बांगला कन्नड वगैरे सर्वच आले) तर हा मजकूर फेसबुकवर लिहीतील असे काहीतरी.
स्वतः असे धागे न वाचणे हा एक पर्याय आहेच. पण मग तो स्लिपरी स्लोप होत जातो, एकाने भरपूर हिंदी लिहीलं, त्याचं चालतं, मी पूर्ण धागाच इंग्लिश मध्ये काढेन, मी नवीन आहे मला मराठी लिहायला कंटाळा येतो वगैरे.
सर्व मराठी/ महाराष्ट्रातील
सर्व मराठी/ महाराष्ट्रातील प्रांतीय बोलीभाषा (खानदेशी अहिराणी कोल्हापुरी वर्हाडी आगरी मालवणी इत्यादी) मात्र याला अपवाद, या नक्की याव्यात आणि वाचल्या जाव्यात.>> + १११
म्हणूनच साहित्याला समाजाचा
म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हणत असावेत.
आता हा बदल काळानुसार आहे की मराठी भाषिकांच्या-वाचकांच्या अनास्थेमुळे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी
कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी अन्य भाषा वापरणे आणि १० टक्क्याहुन अधीक लिखाण अन्य भाषेत करणे यामध्ये फरक असावा>>+१
मला स्वतःला मातृभाषेतलं लेखन वाचायला आवडतं. दुसऱ्या कुठल्या भाषेचा तिरस्कार नाही; पण मातृभाषेतलं लेखन मनाला खोलवर स्पर्शून जातं.
साहित्याला समाजाचा आरसा म्हणत
साहित्याला समाजाचा आरसा म्हणत असावेत. >> सहमत. अन्य भाषेतील शब्द कुठले हे कसं ठरवणार? आपण ज्याला प्रमाण मराठी समजतो, त्यात अनेक शब्द संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, पोर्तुगीज भाषेतून आले आहेत. त्यात आता आणखी हिंदी, इंग्रजी शब्दांची भर.
मातृभाषा म्हणजे नक्की कुठली भाषा? अशी सर्व भाषांची मिळून झालेली भाषा हीच मातृभाषा झाली आहे. भाषा ही प्रवाहाप्रमाणे कायम बदलत असते, त्यामुळे दोन पिढ्यात वापरल्या जाणाऱ्या शब्दात फरक हा पडतोच. नक्की कशाचं शुचित्व पाळणं गरजेचं आहे, आणि का?
हे शब्द आता मराठी शब्दकोशात
हे शब्द आता मराठी शब्दकोशात अंतर्भूत आहेत ते, किंवा ज्या बोलीभाषेत ओळखता येईल इतका मराठीचा अंश आहे ती.
थोडक्यात मराठी म्हणवणार्या प्रत्येकाला वाचून समजेल अशी. (जुन्या नव्या पिढीच्या भाषेत फरक असला तरी मराठी लिपी वाचता येत असल्यास ते ६०% किंवा जास्त लिखाण समजू शकतात.)
आपण ज्याला प्रमाण मराठी समजतो
आपण ज्याला प्रमाण मराठी समजतो, त्यात अनेक शब्द संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, पोर्तुगीज भाषेतून आले आहेत.>> अगदी बरोबर.
नवनवीन शब्दांनी भाषा समृध्द होते. तीसचाळीस वर्षांपुर्वीची मराठी भाषा आणि आजची मराठी यामध्येसुध्दा काही अंशाने फरक दिसुन येईल. पण म्हणुन मराठी शब्द उपलब्ध असताना हिंदी /इंग्रजीचा वापर, आवश्यकता नसतांना हिंदी इंग्रजी भाषेतील वाक्य घुसवणे, याने मराठीचा कोणता फायदा होणार आहे.
आता अनेकांना जुने मराठी शब्द
आता अनेकांना जुने मराठी शब्द कळणार नाहीत. उलट 'गर्व' हा शब्द (मला व्यक्तिशः पटला नाही तरी) अनेक जण अभिमान ह्या हिंदी अर्थानेच घेतील. शिवाय रिक्षा, सायकल, बसगाड्या, टेबले असे अनेक मराठीकरण झालेले शब्द आहेतच. मग शब्दकोशात आणखी भर टाकायला हरकत नाही. 'म्हणजे', 'त्यामुळे' ऐवजी सो हा शब्द अनेकांना कळेल अशी चिन्हे आहेत. मला वाईट वाटतं, पण मी पण असेच दुसरे कुठलेतरी शब्द वापरून ह्या प्रक्रियेला नकळत हातभार लावतच असतो. काय बरोबर आणि काय चूक, मी पुरता गोंधळून गेलोय.
आजकाल कपाटाच्या बिजागऱ्या गंजून खल्लास म्हणजे नक्की काय हे मला एक्स्प्लेन करावं लागतं. कालाय तस्मै नमः।
मराठी शब्द उपलब्ध असताना
मराठी शब्द उपलब्ध असताना हिंदी /इंग्रजीचा वापर >> हेच फारसी वगैरे बाबतीतही करता येऊ शकतं. सहस्र शब्द असताना हजार. आणि च्या ऐवजी व. दार ऐवजी दरवाजा. असे बरेच शब्द आपण वापरतो. बोलणारे लोक कुठले शब्द आत्मसात करतील त्याप्रमाणे भाषा आपोआप बदलत जाते. आपण किती सक्ती करणार आणि कुठल्या आधारावर?
उलट 'गर्व' हा शब्द (मला
उलट 'गर्व' हा शब्द (मला व्यक्तिशः पटला नाही तरी) अनेक जण अभिमान ह्या हिंदी अर्थानेच घेतील. >>
हो हल्ली हाच शब्द वापरला जातो सरसकट सगळीकडे. गर्व आहे मला मराठी असल्याचा वगैरे..
ते खरं तर अभिमान असंच म्हणायला हवं हे माझं वैयक्तिक मत. मराठीत गर्वाचा अर्थ वेगळा होतो. गर्वाचे घर खाली म्हण माहिती असेलच
मला वाटतं चर्चेचा कंटेक्स्ट
मला वाटतं चर्चेचा कंटेक्स्ट मराठी (यात पूर्वी आलेले उर्दू शब्द, हल्ली आलेले अमक्याची रेकी केली वगैरे इंग्लिश शब्द पण आले) साईट वर मराठी अपेक्षित असलेल्या लेखात ६०% पेक्षा जास्त हिंदी किंवा इंग्लिश मजकूर लिहून मराठी साईट च्या मूळ अस्त्वित्व आणि उद्देशाला सुरुंग लावणे यावर आहे. (माझा कोणत्याही एका लेखावर रोख नसून अश्या प्रकारचे सर्व लेख आठवत आहेत. मागे एकदा कोणीतरी 'इथे नवीन आहे, मराठी लिहीता येत नाही' म्हणून पूर्ण ३०-४० ओळींची पोस्ट इंग्लिश मध्ये लिहीली होती.(मग मराठी लिहीता येईपर्यंत कोणत्यातरी इंग्लिश साईटवरच लिहा ना
))
इथेही प्रतिसादात वेगळ्या भाषा, मूळ परदेशी स्थाईक लोकांच्या चर्चा बोर्ड वरच्या वेगळ्या भाषा यावरही रोख नाही.
मराठी साईटवर लेख/ कथा/ललित म्हणून जे मूळ साहित्य येतं ते मराठी भाषेत असावं (ती बोलीभाषाही चालेल.)
मला मराठी वाचन खूप आवडते
मला मराठी वाचन खूप आवडते,कित्येकदा लिहिता बोलताना चुकीचे मराठी वापरले जायचे पण इथे येउन निरनिराळे शब्द, त्यांचे अर्थ समजले आहेत,मुळात मी *मराठी* या एकाच कारणासाठी मायबोलीवर येत असेन तर इथे येऊन इतर भाषेतील साहित्य वाचण्यात किंवा मराठी मध्ये निम्मे इंग्लिश, हिंदी सरमिसळ असल्यास मला रस असण्याचे कारणच नाही,याच कारणाने मला व्यक्तिशः हे पटत नाही.
रच्याकने,काल अचानक बोलता बोलता मुलांना रागाने म्हटलं लवकर आटपा नैतर तुमची रवानगी हॉस्टेल ला करेन,तर रवानगी म्हणजे ???ऍडमिशन घेणार का आमचे तिथे? असं समजून खिदळत बसली मुलं, पण मला स्वतःचे आश्चर्य वाटले,मी बहुतेक पहिल्यादा शब्द वापरला, धन्स मायबोली
मला वाटतं चर्चेचा कंटेक्स्ट
मला वाटतं चर्चेचा कंटेक्स्ट मराठी (यात पूर्वी आलेले उर्दू शब्द, हल्ली आलेले अमक्याची रेकी केली वगैरे इंग्लिश शब्द पण आले) साईट वर मराठी अपेक्षित असलेल्या लेखात ६०% पेक्षा जास्त हिंदी किंवा इंग्लिश मजकूर लिहून मराठी साईट च्या मूळ अस्त्वित्व आणि उद्देशाला सुरुंग लावणे यावर आहे.>> +१११
अगदी हेच मनात होते, पण मला नीट मांडता आले नसावे असे दिसते.
साईट वर मराठी अपेक्षित
साईट वर मराठी अपेक्षित असलेल्या लेखात ६०% पेक्षा जास्त हिंदी किंवा इंग्लिश मजकूर लिहून मराठी साईट च्या मूळ अस्त्वित्व आणि उद्देशाला सुरुंग लावणे यावर आहे.>> अनु स मोदन. मला तिनही भाषा उत्तम समजतात व येतात. पण मराठी साइट वर मुद्दाम इंग्रजी तसेच हिंदी लिहण्यात काय मतलब आहे?! ते ही आधी बाफ काढल्यावर तिथे अॅडमिन ह्यांनी व्यवस्थित रीत्या समजावले होते.
मराठी( असे आमुचि मायबोली) साइट वर इंग्रजी/ हिंदी कंटें ट वाचायला येत नाही.
बेअर मिनिमम शुद्धलेखन असावे. कंटेंट क्वालिटी चांगली अभिरुची संपन्न असावी इतकी अपेक्षा असते मात्र.
मराठी च्या सर्व बोली भाषांचे अगदी स्वागत व नाविन्य असते. पूर्वी गजाली, अहिराणी गप्पा, कोपु वर तिथल्या भाषा वाचायला मिळत. हैद्राबादेस असताना तर मी ह्या बा फांच्या गप्पा बोलुन बघत असे. तिथे असे मराठी कानावर पडा यचे देखील नाही.
मला कधी कधी शुद्ध मराठीत बोलून समो रच्याची विकेट घ्यायला आवडते. एस्प. उगीचच हिंदी इंग्रजी झाडणार्या पब्लिकची. पण ते मजेतच. दुराग्रह नव्हे.
धागाकर्ता, मी_अनु, आन अमा
धागाकर्ता, मी_अनु, आन अमा तिघाईले बी मायं अनुमोदन.
आपन इथं मराठी वाचायले येतो, मंग ते कुठल्याबी प्रांतातलं का असन. आता मंदी एखांदं हिंदी वाक्य, एखांदं इंग्लिश वाक्य असन, अजुन कुठक्या भाषेतलं असन तर काही वाटत नाही. पन लोक जर त्याचा भरना करु लागले तर जिवावर येईन वाचायले. हां एखादा धागा असा आहे तिथं दुसऱ्या भाषेत चर्चा होऊन राहिली, एखादी भाषा शिकासाठी कोनी धागा काढला तर गोष्ट वेगळी.
आन आपन ज्या बोली भाषेत लिहुन राहिलो त्या बोली भाषेचं शुद्धलेखन पन पाळा लागन. एखाद्या लेखकाले/लेखिकेले कुठल्या बोली भाषेतलं एखांदं पात्र रंगवायचं असन, नाही तं पूरी कथाच एखांद्या जागेच्या ग्रामीन भाषेत रंगवायची असन तर त्यायनं त्या बोलीभाषेचा जरा अभ्यास केला पाहिजे. फक्त मी चा म्या केला ठ चा ट केला आन ण चा न केला का ते कुठलीबी ग्रामीन भाषा नाही होत. बोली भाषेचा जरा अभ्यास करून लिहिलं तरच मजा येते.
काळाच्या ओघानं भाषा बदलत रायते हे बरोबर हाय पन म्हणुन आपण अजुन खिचडी करून लिहायचं अन त्याचं 'भाषा तर बदलतच रायते ना भाऊ' करून समर्थन करायचं' हे नाही पटत गड्या.
मजा आली
मजा आली
नागपुरी बोली ऐकून.
आमचा एक कलिग बोलतो असा.
मानवजी - भारी प्रतिसाद
मानवजी - भारी प्रतिसाद लिहिलायं.. वाचताना खरंच मजा वाटली. माझी एक मैत्रिण असंच बोलते.. ती अमरावतीची आहे.
खाजगी साईट आहे त्यामुळे
खाजगी साईट आहे त्यामुळे प्रशासनाने ठरवलं तर हिंदीच काय पोर्तुगीज लॅटिन अरेबिक भाषेतलं लिखाणही चालेल की.
बाकी एखादी कथा हिंदीत असल्यामुळे वाचली नाही तरी
खालचे प्रतिसाद टाईमपास असतील तर पॉपकॉर्न ऑर्डर करायला हरकत नसते
सगळे लोक प्रतिसादही वेगवेगळ्या भाषांमध्ये देऊ लागले तर मात्र प्रॉब्लेम येईल.
मानवजी - भारी प्रतिसाद
मानवजी - भारी प्रतिसाद लिहिलायं.. वाचताना खरंच मजा वाटली.>>+१११
मानव, प्रतिसाद आवडला. फक्त
मानव, प्रतिसाद आवडला. फक्त शेवटचा परिच्छेद पुन्हा मला संभ्रमात टाकून गेला.
काळाच्या ओघानं भाषा बदलत रायते हे बरोबर हाय पन म्हणुन आपण अजुन खिचडी करून लिहायचं अन त्याचं 'भाषा तर बदलतच रायते ना भाऊ' करून समर्थन करायचं' हे नाही पटत गड्या. >> मुद्दाम खिचडी भाषेत लिहिण्याचं मी समर्थन करणार नाही, पण जर बोली भाषाच खिचडी असेल तर त्यावर आक्षेप घ्यावा का? म्हणजे "सगळ्या व्हेजिटेबलस चॉप करून नॉनस्टिक पॅन मध्ये घ्या आणि शॅलो फ्राय करा" अशी शहरी बोलीभाषा आजकाल झालीच आहे. ती भाषा प्रमाण नसेल, त्यामुळे शासकीय नियम वगैरे त्या भाषेत नाही लिहिता येणार, पण ललित लेखन, पाककृती वगैरे गोष्टी अश्या मिश्रभाषेत लिहिले जात आहेत आणि वाचकांनाही ते समजते. मग त्यावर आक्षेप घ्यावा का? किती मर्यादेपर्यंत असे नवीन शब्दांचे मिश्रण चालू शकेल ह्याला काही मोजमाप नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रमाणात हिंदी इंग्रजी मिश्रण करतो आणि प्रत्येकाला त्याच्यापेक्षा अधिक मिश्रण करणारे चुकीचे वाटू शकतात.
मराठीत बोलताना माझा अनुभव
मराठीत बोलताना माझा अनुभव ----. अनेक मराठी लोकांना शुद्ध मराठी मध्ये बोलायचा कंटाळा येतो. त्याना चांगली मराठी बोलण्याचा आग्रह केला की विषय टाळतात.
प्रत्येक जण वेगवेगळ्या
प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रमाणात हिंदी इंग्रजी मिश्रण करतो आणि प्रत्येकाला त्याच्यापेक्षा अधिक मिश्रण करणारे चुकीचे वाटू शकतात.>> अगदीच खरं आहे.
आपण आपल्याला योग्य वाटतं त्या प्रकारच्या भाषेत बोलत आणि लिहीत रहावं, हेच करू शकतो. पण जागरूक राहिलं पाहिजे हेही आहेच. म्हणजे आपल्याला एखादी वाक्यरचना किंवा एखादा शब्द बरोबर वाटत असेल, पण तो बरोबर नसेल तर बदलायची तयारी पाहिजे. आपण दुसऱ्याला हे दाखवून द्यावं की नाही हाही एक वेगळा मुद्दा आहेच.
आपल्याला एखादी वाक्यरचना
आपल्याला एखादी वाक्यरचना किंवा एखादा शब्द बरोबर वाटत असेल, पण तो बरोबर नसेल तर बदलायची तयारी पाहिजे >> मान्य आहे.
"सगळ्या व्हेजिटेबलस चॉप करून
"सगळ्या व्हेजिटेबलस चॉप करून नॉनस्टिक पॅन मध्ये घ्या आणि शॅलो फ्राय करा" >>>
हरचंद याच उदाहरणात व्हेजिटेबल्स हा शब्द खटकणारा आहे, इतर नाहीत. शहरात सुद्धा कुणी भाजीच्या ऐवजी व्हेजिटेबल असा शब्द वापरत नाहीत.
"मी व्हेजिटेबल आणायला चाललो." "आज जेवणात कसली व्हेजिटेबल आहे?" असे शहरातही बोलत नाही. चॉप करा, शॅलो फ्राय करा हे मात्र बोलले जाते.
तेव्हा सगळ्या भाज्या चॉप करून घ्या ऐवजी सगळ्या व्हेजिटेबलस् चॉप करून घ्या ही मुद्दाम केलेली खिचडी वाटत नाही का?
नसेल वाटत तर माबुदो.
हो, ती जरा अतिशयोक्तीच झाली.
हो, ती जरा अतिशयोक्तीच झाली. पण कदाचित आणखी पाच वर्षांनी ते नाही खटकणार. आत्ताचा ट्रेंड एक्सट्रापोलेट करून पाहता असे वाटते.
वरचे बाकी प्रतिसाद पाहता असं वाटतंय की ह्या धाग्याला काहितरी पार्श्वभूमी आहे. ह्यापूर्वी कुठले नवीन हिंदी/इंग्रजी धागे आलेत का चेक करतो.
हरचंद याच उदाहरणात
हरचंद याच उदाहरणात व्हेजिटेबल्स हा शब्द खटकणारा आहे, इतर नाहीत. >>>> मला व्हेजिटेबल्स हा शब्द ही नाही खटकला इथे..पण हे फार वैयक्तिक कारण झाले..मे बी आम्ही घरात हिंदी बोलतो त्यातही इंग्रजी शब्द जास्त असतात म्हणून असेल...बाकी मराठीत वाचायला, बोलायला छानच वाटते, पण मी इतर भाषांमध्ये सुध्दा कम्फर्टेबल असते.
अच्छा! आता धुंडाळल्यावर
अच्छा! आता धुंडाळल्यावर संदर्भ लागला मला. त्या प्रकाराबद्दल काय बोलावं माहीत नाही. खालील लिखाण पहा:
मी कालकेयाला म्हणालो, "आत्ताच्या आत्ता इथून चालता हो", तर तो म्हणाला, "हिरर्र रा माँजदा, चक् फ़िररर सोमडा, हिचक बोम चा". मी चिडून म्हणालो, "काय करशील माकडा", तर तो उत्तरला, "झिम झिम चिमदा. डुर किम हिम रोम्पिंगडा"
आता ही मराठी असेल, तर येथे कर माझे गळती!
माझ्या डोक्यात हरचंद चा आताचा
माझ्या डोक्यात हरचंद चा आताचा प्रतिसाद वाचून आफ्रिकन ढोल वाजायला लागलेत
हरचंद याच उदाहरणात
हरचंद याच उदाहरणात व्हेजिटेबल्स हा शब्द खटकणारा आहे, इतर नाहीत.
>> नाही... व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवलाय ना..
आम्ही व्हेजिटेबल म्हणतो..
धागाकर्ता, मी_अनु, आन अमा
धागाकर्ता, मी_अनु, आन अमा तिघाईले बी मायं अनुमोदन. >>> मानव - ही पोस्ट मस्त आहे!
हरचंद पालव >>>
Pages