सर्वात प्रथम या निमित्ताने मभादि संयोजकांनी स्मरणरंजनाची संधी मिळवून दिली म्हणून त्यांचे खूप आभार.
लहानपणी घरात, बाहेर, शाळेत, अगदी पंचक्रोशीत सुध्दा प्रामुख्याने मराठी भाषेचाच बोलण्यात/लिहीण्यात वापर व्हायचा.
घरात लहान मुलांची पुस्तके, मोठ्या माणसांची मासिके/पुस्तके , शलाका ग्रंथालयाचे सभासदत्व …अगदी चंगळ होती.
२ री-३ री पासूनच मी मोठ्या माणसांची पुस्तके वाचू लागले. माहेर मासिकातील ज्योत्स्ना देवधरांचे लिखाण लख्खपणे आठवते आहे.
मला मायबोली मराठीची गोडी माझ्या मायमाऊलीमुळेच प्रथम लागली. इतकी लागली, की शालेय जीवनात कितीतरी मराठीच्या शिक्षिकांनी धुरंधर प्रयत्न करूनही तीत बाधा आली नाही.
आई कोकणातली, त्यामुळे तिच्या अभिव्यक्तीला ते एक वाकुडं वळण जन्मजात लाभलेलं आहे. तसं तिचं शालेय शिक्षण तेव्हाच्या मॅट्रिकपर्यंतच झालेलं होतं, पण तरीही, किंबहुना त्यामुळेच की काय, तिच्या जिभेवर सरस्व.... एक हिंदू देवी सातत्याने नृत्याचे कार्यक्रम करत आली आहे. विशेषतः आई चिडली की या कार्यक्रमांना भलताच रंग चढतो.
आज "मराठी दिन". मराठी मातृभाषा असलेल्या जवळपास सर्व व्हाट्सएप वापरकर्त्यांनी त्यांना मराठी भाषेचा किती अभिमान आहे, हे स्टेट्स, समुहावर संदेश पाठवुन कळवले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. मराठी भाषेचा महिमा कसा आहे हे सांगण्यासाठी काही गंमतशीर वाक्ये सुद्धा सांगितली गेली. जसं की पुण्याच्या आजीबाई एका मुलाला विचारतात "नातुंचा नातु ना तू?" किंवा कप फुटता फुटता त्याला झेलणारा नवरा जेव्हा म्हणतो की "वाचला" तेव्हा बायको म्हणते "वाचला" नाही तर "वाचलात".
यांनी घडवले माझे मराठी...
जेव्हा मराठी कविता कोणत्या सर्वाधिक आवडल्या हे आठवायला सुरुवात केली तेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मूडसच्या कविता आपल्याला आवडल्या असे लक्षात आले. माझे बालपणीचे, तरुणपणीचे दिवस समृद्ध करणार्या शब्दप्रभू गोविंदाग्रज यांच्या शब्दातच हा प्रवास मांडू इच्छिते. या ओळी आहेत त्यांच्या, 'विराम-चिन्हे' कवितेतील -
वही थमके रह गयी है
मेरी रात ढलते ढलते
जो कही गयी ना मुझसे
वो ज़माना कह रहा है
शब-ए-इन्तज़ार आखिर
कभी होगी मुक्तसर भी
यूँ ही कोई मिल गया था
सरे राह चलते चलते
-- कैफी आज़मी
तिथंच मूक निश्चल थबकून राहिलेली रात्र
तिथंच कुंठलेलं साकळलेलं माझं सगळं असतेपण
जिथं तू मला माझ्यावर सोडून गेला होतास
आणि आता तू येत नाहीस
माझ्याच्यानं यातला एक शब्दही बोलवत नाही, ऐकवत नाही
पण हे लोक म्हणतात
की तू मुळातच कधी अस्तित्वात नव्हतास
तू म्हणजे माझ्या कल्पनेतली एक कथा आहेस फक्त
आणि तरीही तू येत नाहीस
दरवर्षी ऑक्सफर्ड प्रेस, मिरियम वेबस्टर इ. शब्दकोशांची जबाबदारी घेतलेल्या संस्था त्या त्या वर्षातील सगळ्यात जास्त वापरला गेलेला शब्द, दर महिन्यांप्रमाणे या शब्दांत होत गेलेले बदल, जगातील विविध देशांतील स्थानिक प्रश्नांमुळे या शब्द जंजाळात होत गेलेले स्थानिक आणि त्यामुळे कदाचित घडलेले (शब्दांतील) वैश्विक बदल, वापरात आलेले नवे शब्द/ जोडशब्द, नवसंजीवनी मिळालेले जुनेच शब्द, नव्या शब्दांच्या रचनेत आंतरजाल -सोशल मिडिआच्या प्रभावामुळे घडत जाणारे बदल अशी भरगच्च आणि मनोरंजक माहिती वर्षाअखेरीस प्रसिद्ध करतात.
रामा खरात जवा बाळू सुताराच्या घरी पोचला, तवा बाळ्या तोंडात तंबाखूची गुळणी धरून उकिडवं बसून पायात दाबल्याल्या दगडावर घासून रंध्याच्या पात्याला धार काढत बसलं हुतं. आजूबाजूला कोंबड्यांचा कलकलाट अन मदीच गुळणीमुळं त्वांडाचा चंबू करून बसल्यालं बाळ्या मजेदार दिसत हुतं. दुनी पाय प्वाटाशी घिऊन बसनं त्येला काय साधत नव्हतं, कारण मुदलातलं डेऱ्यावानी असनारं त्याचं गरगरीत प्वाट मजबूत दिसत हुतं. एकंदरीतच घायकुतीला आलेलं बाळ्या जवा पुढं वाकून रंध्याच्या पात्यावर जोर मारी त्यावेळी त्याचं मागं खोवलेलं धुतर मजेदार फुगा होऊन वरखाली होई. बाळ्या सवताच एखाद गरगरीत पांढऱ्या कोंबड्यावानी आसमंतात मिसळून गेलंवतं.