नमस्ते मायबोलीकर,
घेऊन आलो आहे एक नवा खेळ.
या खेळामध्ये तुम्ही मनात एक गुपित धरायचे. हे गुपित म्हणजे - वाक्य, म्हण, वाक्प्रचार, घोषणा, शब्द, कवितेची ओळ, सुविचार, नाव यांसारखे काहीही असू शकेल. नावामध्ये प्रसिद्ध व्यक्तींची, ठिकाणांची, चित्रपटांची, पुस्तकांची नावे, इत्यादी असू शकेल. तर हे मनात धरलेले गुपित खाली दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे व एंटर बटनावर टिचकी मारायची. ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक बनवून देईल. हि लिंक तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय, सोशल मिडिया यांना द्यायची. ती लिंक उघडणाऱ्याला शब्दवेध हा खेळ सादर होईल. तो खेळ खेळून तुमच्या मनात धरलेली गोष्ट त्यांना ओळखता येईल.
शब्दकोडे म्हणजे सर्व शाब्दिक खेळांचा जणू राजाच. शब्दकोडे नसलेले वर्तमानपत्र हे विरळच. जगातले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शब्दकोड्यांविषयी काही रंजक माहिती दिली आहे.
या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.
https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
नमस्कार मायबोलीकर मित्रमंडळी !!!
कसे आहात तुम्ही सगळेजण?
महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात विखुरलेल्या मायबोलीकर बांधवांना एका महत्त्वाच्या कामासाठी साद द्यायला आम्ही आलोय.
सकारात्मक भाषेमध्ये केवळ सकारात्मक विचार आणि बोलणेच नाही तर शरीराचे सकारात्मक हावभाव, वागणूक आणि सकारात्मक लेखन देखील समाविष्ट आहे. एकदा तुम्ही सकारात्मक विचार करण्याची आणि प्रत्येक परिस्थितीची उजळ बाजू पाहण्याची सवय लावली की, तुम्ही बोललेले शब्द आणि वाक्य आणि तुमची देहबोली आपोआप सकारात्मक बनते. याचा अर्थ तुम्ही कोणतीही भाषा बोला आणि लिहा, पण ती स्वत:च्या आणि लोकांच्या भल्यासाठी सकारात्मकतेने युक्त असावी. तुम्हाला माहिती आहेच की, तुम्ही विश्वाला जे काही देता ते तुमच्याकडे अनेक पटीने परत येते. मग जगाला सकारात्मक स्पंदने का देत नाहीत?
शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app