नमस्ते मायबोलीकर,
घेऊन आलो आहे एक नवा खेळ.
या खेळामध्ये तुम्ही मनात एक गुपित धरायचे. हे गुपित म्हणजे - वाक्य, म्हण, वाक्प्रचार, घोषणा, शब्द, कवितेची ओळ, सुविचार, नाव यांसारखे काहीही असू शकेल. नावामध्ये प्रसिद्ध व्यक्तींची, ठिकाणांची, चित्रपटांची, पुस्तकांची नावे, इत्यादी असू शकेल. तर हे मनात धरलेले गुपित खाली दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे व एंटर बटनावर टिचकी मारायची. ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक बनवून देईल. हि लिंक तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय, सोशल मिडिया यांना द्यायची. ती लिंक उघडणाऱ्याला शब्दवेध हा खेळ सादर होईल. तो खेळ खेळून तुमच्या मनात धरलेली गोष्ट त्यांना ओळखता येईल.
या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.
https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
मायबोलीकर aschig यांच्या शब्दखुळ कडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा त्या प्रकारचा मराठी शब्दखेळ तयार केला आहे. हा शब्दखेळ इंग्रजी Wordle शी जास्त साधर्म्य असणारा आहे. यामध्ये मराठी शब्दाची फोड करून त्यातील अक्षरे व मात्रा यांची गुप्त शब्दाशी तुलना केली जाते. त्यामुळे हा खेळ शब्दखुळ पेक्षा जास्त आव्हानात्मक व म्हणून मजेदार आहे असे मला वाटते. सर्व शब्द तीन अक्षरी व मराठी आहेत. शब्दांच्या यादीसाठी मायबोलीकर aschig यांचे आभार.
मराठी भाषा गौरव दिन २०२३
खेळ शब्दांचा - ५ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आखलेल्या अनेक खेळांपैकी हा खेळ आहे शब्दांचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सगळ्यांनी तासनतास पत्ते झोडले असतीलच. त्यातल्या त्यात बराच वेळ चालणारा आणि आवडीचा खेळ म्हणजे झब्बू. आता आपण खेळणार आहेत शब्दांचा झब्बू.
शब्दांच्या या खेळात आपल्याला गायक, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, प्रशासक अशा प्रसिद्ध मराठी व्यक्ती ओळखावयाच्या आहेत.
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.
शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.