परदेशी भाषा कोणती शिकावी

Submitted by मनू on 16 May, 2024 - 03:40

नमस्कार,
माझ्या भाच्याने या वर्षी १०वी ची परीक्षा दिली आहे. त्याला एखादी परदेशी भाषा शिकायची आहे तर कोणती भाषा शिकणे श्रेयस्कर राहील. करिअर संदर्भात विचार केला तर कोणत्या भाषेला जास्त स्कोप असेल भविष्यात याबद्दल मार्गदर्शन हवे होते.
तसेच तुमच्या माहितीतले CSMT-DADAR मधले क्लासेस सांगू शकता का?

धन्यवाद

Group content visibility: 
Use group defaults

जर पुढे जाऊन मेकॅनिकल-ऑटोमोटिव्ह मध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर जर्मन किंवा जपानी.आता शिकायला चालू केली आणि नीट चालू ठेवले तर मुख्य शिक्षण पूर्ण होईपर्यंत जर्मन c1 किंवा जपानी इक्यु होईल.(दोन्ही कठीण आहेत.)
जर्मन थोडी इंग्लिश सारखी असल्याने लवकर शिकता येते.फ्रेंच उच्चार कठीण.
मायबोलीकर केदार जाधव जर्मन c1 आहेत, आणि प्रसिद्ध जर्मन शिका वाला युट्युब चॅनल पण चालवतात.सल्ल्यासाठी संपर्क साधा.

कोणतेही भाषा शिक्षण घेतले तरी नोकरी मुख्य स्किल च्या जोरावर मिळेल.जपान मध्ये कंपनीत नोकरी मिळवताना, किंवा 1 वर्षांपेक्षा जास्त राहताना भाषा हा मोठा भाग आहे.

"करिअर संदर्भात" भाषा शिकण्यामागे नक्की काय उद्देश आहे? म्हणजे परीक्षेत जास्त मार्क मिळवण्यासाठी की उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी की परदेशात नोकरी करून स्थाईक होण्यासाठी?

Thanks Mi_anu, युट्युब चॅनल बघते.

करिअर संदर्भात म्हणजे परदेशी जाणे किंवा होणे हा गोल नाहीये. भारतात राहून ही कोणत्या भाषे मध्ये जास्त करिअर ऑप्शन्स असतील हा प्रश्न आहे. म्हणजे वर अनुने सांगितलं त्याप्रमाणे मेकॅनिकल-ऑटोमोटिव्ह मध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर जर्मन किंवा जपानी शिकल्यास उपयुक्त ठरेल.

माझी एक कलिग जर्मन शिकली आहे, पण तिच्या मताप्रमाणे अजून थोड्या वर्षात जर्मन ला स्कोप नसेल. तर मला याबद्दल काहीही माहिती नाहीये म्हणून इथे मार्गदर्शन हवे आहे.

भारतात राहून परदेशी भाषा ऑप्शन म्हटले तर टेक्निकल इंटरप्रिटेशन वगैरे.
(सध्या भारतीयच इतक्या विविध परदेशांमध्ये स्थायिक आहेत की अगदी मल्टी नॅशनल कंपनीत वेगवेगळ्या टाईम झोन मध्ये काम करूनही बरेच रिपोर्टिंग परदेशी स्थायिक भारतीय माणसाला होते.याही मुद्द्याचा विचार करा.)

मनू व सर्वांनीच नक्की वाचावी अशी पोस्ट :

कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपानी भाषा का शिकावी? व कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपान मधील संधी
https://mogheg.blog/category/jobs-in-japan/?fbclid=IwY2xjawC1WvBleHRuA2F...

कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपानी भाषा का शिकावी? >>

<< नक्कीच जपान मधील पगार हा तुमच्या जपानी भाषेवर व तुमच्या अनुभवानुसार अवलंबून आहे. पण कमीतकमी ३०-४० लाख जपानी येन व त्यापेक्षा जास्त असेल. >>

४० लाख येन पगार धरला तरी आजच्या दराने USD $26,000 वार्षिक पगार होईल. या पगारात जपानमध्ये खर्च भागून शिल्लक उरेल की भिकाऱ्यासारखे राहावे लागेल, याचा विचार नक्की करा.