पार्सलला मराठीत काय म्हणतात?

Submitted by योगी on 6 April, 2021 - 08:21

पार्सल या शब्दाला मराठीत काय म्हणतात? यातही फूड पार्सल आणि कुरीयरचं पार्सल वेगळं...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दशः भाषांतर करणे योग्य नसू शकते.

एखाद्या भाषेत एखादा सर्वसमावेशक /बहु समावेशक शब्द आहे. तसा प्रतीशब्द इतर भाषेत असेलच असे नाही.

"गाठोड्याला इंग्रजीत काय म्हणतात?" असे विचारल्यास काय उत्तर द्याल?

तेव्हा नक्की कसला भावार्थ हवाय हे सुद्धा सांगायला पाहिजे. त्यासाठी संदर्भासहित वाक्य सांगावे हवे.

उदा: तुम्हाला झोमॅटोला "What's this? I didn't get my (food) parcel yet!" अशी तक्रार करायची असेल.

तर तुम्ही " अहो हे काय? माझं खाणं अजूनही आलं नाही!" असे मराठीत म्हणु शकता.

ब्लू डार्टला " When can I expect my parcel?"

अशी चौकशी करायची असेल तर " मला माझे सामान कधी मिळेल हो?" असे विचारू शकता.

एखाद्या भाषेत एखादा सर्वसमावेशक /बहु समावेशक शब्द आहे. तसा प्रतीशब्द इतर भाषेत असेलच असे नाही.
>>>>

+७८६

अश्यावेळी पार्सल शब्दच मराठीत घ्यायचा.

अर्थात एखाद्या भाषेतला शब्द आपल्या भाषेत घ्यायला हरकत नसावी असे मला वाटते. याबाबतचे कायदे माहीत नाहीत. जाणकार प्रकाश टाकतील

तेव्हा नक्की कसला भावार्थ हवाय हे सुद्धा सांगायला पाहिजे. त्यासाठी संदर्भासहित वाक्य सांगावे हवे.
>>>>>नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 6 April, 2021 - 22:39>>>>>>>+१

खाण्याच्या दुकानातून न्यायचे असेल तर बोली भाषेतील शब्द
"बांधून द्या".

अश्यावेळी पार्सल शब्दच मराठीत घ्यायचा. >> + १.
जेव्हा तसा बहुसमावेशक सापडत नाहीय तेव्हा सरळ तो परभाषीय शब्द वापरावा.
आजकाल पार्सल हा तसा फार "कॉमन" शब्द आहे "कॉमन" शब्दा एवढाच.

तुम्हाला तो शब्द कॉमन होण्यापूर्वीचा काळ रंगवायचा असेल आणि त्या करता मराठी प्रतिशब्द हवा असेल तर संदर्भासहित वाक्य द्या. मायबोलीवर तज्ज्ञ आहेत तुम्हाला नक्कीच योग्य प्रतिशब्द सुचवतील.

भारतीय रेल ट्रान्सपोर्ट किंवा पोस्टल सिस्टीममध्ये तुम्हाला कदाचित पार्सलसाठीचा मराठी प्रतीशब्द मिळू शकेल.

बटवडा, डाक वगैरे हिंस्त्र शब्द तिथूनच ऊत्पन्न झाले. (माझे पौष्टिक जीवन) Proud

ईथे बघा काही मिळतेय का,
https://www.maayboli.com/node/33512?page=8

बंगालीत डाक म्हणजे हाक. पूर्वी पत्रांचा बटवडा करताना पोस्टमन प्रत्येकाचे नाव मोठ्याने पुकारायचा. म्हणून डाक आली म्हणजे पत्र आले असे समजायचे. जोदी तोर डाक शुने केऊ ना आशे तोबे ऍकला चालो रे ही महर्षींची कविता सुप्रसिद्ध आहे.

बंगालीत डाक म्हणजे हाक. पूर्वी पत्रांचा बटवडा करताना पोस्टमन प्रत्येकाचे नाव मोठ्याने पुकारायचा. म्हणून डाक आली म्हणजे पत्र आले असे समजायचे.>> हे रोचक आहे!

एकला चलो रे मधला शब्द मला 'ढाक' वाटायचा. डाक आहे हे आत्ता कळलं.

मोळी वेगळी गाठोडे वेगळे. मोळी म्हणजे दोरी , वेलींनी बांधलेले. त्याला बंडल म्हणता येईल.
गाठोडे म्हणजे मोठ्या फडक्यात वस्तू ठेवून गाठी मारणे. बोचके. त्याला बॅग म्हणता येईल. पोस्टमन कडे पूर्वी गाठोडे असायचे. गुगल वर दिसेल.

बोचकं
फूड पार्सल = जेवणाचं बोचकं
कुरीयरचं पार्सल = सामानाचं बोचकं

पुडके बरोबर वाटतंय त्यातल्या त्यात. त्यावरून आठवलं पाकीट शब्दही किती सर्रास वापरतो आपण, जो खरेतर पॅकेट असा इंग्रजी शब्द आहे पण मराठीच वाटतो.

पार्सल साठवून ठेवतात त्या जागेला "डाक घर" असे म्हणतात.
सोलापुरात सात रस्त्यापशी अशी एक जागा आहे जिथे पूर्वी गावाहून येणारी Samples वगैर उतरवली जात असत. आणि तिथून लोकं आपापल्या घरी घेऊन जात असत. त्या ठिकाणचे नाव डाक बंगला असे होते. जे आता शासकीय विश्रामगृह मध्ये परावर्तीत झालेले आहे...

पुडक म्हणायला काही हरकत नाही. पण पुडक हा जरा गाव खेड्याच्या पातळीवरचा शब्द वाटतो...

डाक म्हणजे टपाल.
टपाल सेवेत पत्र आणि पार्सल अशा दोन सेवा पूर्वी होत्या. त्यात तार, बचत आणि अन्य सेवांची भर पडत गेली.
पार्सल ही सेवा आहे. त्यात थैल्या, पुडकी, बोचकी असे सर्व काही येते.

टपाल कार्यालयातून पार्सल आले तर त्याला पुडके आले, थैली आली, गाठोडे आले, खोके आले, पाकीट आले असे काहीही म्हणून शकता. पण थैली सेवा. गाठोडे सेवा, बोचके सेवा असा शब्दप्रयोग रूढ नाही. पोहोचवणे या अर्थाने पार्सल सेवा हा शब्द रूढ आहे. पार्सल मधे अनेक गोष्टी येत असल्याने एकच एक शब्द त्याला पर्याय नाही.

खाद्यकेंद्रातून आलेल्या किंवा आणलेल्या पार्सलला खाद्यपदार्थांची थैली म्हणू शकता.

पार्सल म्हणजे नुसती वस्तू नाही, तर पार्सल म्हणजे वेष्टनात गुंडाळून व्यवस्थित पॅक केलेली/ भरलेली वस्तू. ह्या दृष्टीने पुडके शब्द त्यातल्या त्यात योग्य ठरेल.

वर्णिता यांच्या पहिल्या प्रतिसादानंतरच धागा बंद व्हायला हवा होता. तसेही इथे शब्दार्थ आणि तश्याच विषयावर अर्धा डझन धागे असताना नवा धागा का विणला गेला हा मूळ प्रश्न बाकी उरतोच. Wink

पुडके हा पार्सलचा एक अर्थ झाला. जर जिन्नस एका डब्यात, पेटीत भरले असतील तर आपण त्याला पुडके म्हणत नाही. दुचाकी जर रेल्वे पार्सल सर्व्हिसने पाठवली तर त्याला दुचाकीचे पुडके म्हणाल का?
आणि पार्सल हे क्रियापद सुद्धा आहे.
समजा मी जेवणाचा स्टील डबा घेऊन खानावळीत गेलो आणि म्हणालो: "I want one north Indian thali. I want it to be parcelled in this lunch box"

याचे मराठीत भाषांतर करताना मला त्याचे या डब्यात पुडके करून हवंय असं योग्य असेल का?
तेव्हा अनेकदा एखादा शब्द सांगून याला अमुक भाषेत काय म्हणतात असे विचारणे योग्य ठरत नाही, त्याने योग्य भाषांतर करता येत नाही.

पार्सल ही सेवा आहे. त्यात थैल्या, पुडकी, बोचकी असे सर्व काही येते. >> सहमत. जरी वस्तू असे मानले, तरी पुडके म्हणजे कागदात ओबडधोबड बांधलेले पुडके डोळ्यासमोर येते, तर पार्सल म्हटल्यावर शिस्तीत डिंक अथवा सेलोटेप (चिकटपट्टी) लावून नीटनेटकी बांधलेली वस्तू डोळ्यासमोर येते. शिवाय पुडके छोटे असते. एखादा अवाढव्य खोका पार्सल करता येतो. तो खोका पुडके करता येत नाही.

जुन्या मराठीत बघायला पाहिजे. त्या काळी वस्तू कशा पाठवल्या जात, (म्हणजे पॅकिंग कसे असे) ह्या क्रियेला काय म्हणत वगैरे.

अशी चिटिंग नाही करायची. म्हणी, वाक्प्रचार हे त्या त्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचं भाषांतर होत नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा - ह्याचं इंग्रजी भाषांतर कसं कराल? जरी प्रत्येक शब्द इंग्रजीत भाषांतरित होण्याजोगा असला तरी?

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे वाक्य मराठीतही त्या म्हणीमागची संदर्भकथा माहीत असल्याशिवाय निरर्थकच.
कुठल्याही भाषेत हे वाक्य भाषांतरीत करायला काय हरकत आहे? त्यामागचा संदर्भ तिथेही सांगावा लागणार तसा ईथेही सांगावा लागणारच.

दुसरे एखादे उदाहरण घ्या..

बरं, सोपं उदाहरण घ्या. अति तेथे माती. ह्याला मराठीत काही संदर्भाची गरज नाही. माती होणे म्हणजे काय ते बहुतेकांना कळतं. इंग्रजीत too much / surplus becomes soil किंवा हिंदी जहाँ अति वहाँपे मिट्टी - ह्यांना काहीच अर्थ नाही. वाक्प्रचार किंवा म्हणी अश्याच वेळी वापरल्या जातात जिथे समोरच्याला ते ऐकून अर्थ कळेल. नाही कळला किंवा त्याचा अर्थ सांगावा लागला तर मग उपयोग काय त्या वापरण्याचा? ढवळ्या शेजारी बांधला पवळा - हे एखाद्या इंग्रजी माणसाला समजवायला इतिहास आणि भाषेचा तास घ्यावा लागेल. तसंच a bird in hand ... चं भाषांतर 'हातातला एक पक्षी झुडपातल्या दोन पक्ष्यांपेक्षा बरा' - हे मराठी वाक्य तितकंच असंबद्ध वाटतं.