महात्मा गांधी
गांधी आणावे आचरणात..!
55 कोटी कुणामुळे दिले गेले...!!!
गांधीहत्येच्या खटल्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानला खजिन्यातील हिस्सा म्हणून 55 कोटी रुपये देणे. भारताचा १/३ भाग पाकिस्तानला दिल्यावर, खजिन्यातला हिस्सा सुद्धा दिला पाहिजे असं मत पाकिस्तानचे नेते मांडत होते.. यावेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रेस नोट दिनांक 12 जानेवारी 1948 रोजी काढली त्यात त्यांनी असे म्हणले आहे की, " It was found that feverish attempts were being made by the Pakistan Government to secure the payment of Rs. 55 crores which it had been agreed to allocate to Pakistan out of the cash balances.
'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे
आगाखान पॅलेस
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो. सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा केलेला हा फेरफटका....
अॅक्शन ....... कट ! कट !! कट !!!
दिनांक २ ऑक्टोबर २०११.
रविवार असल्यामुळे दुपारचे जेवण करुन घरी मस्तपैकी पहुडलो होतो. दुपारची झोप महत्वाची होती. सवय ... दुसरे काय? पण झोप येईपर्यंत काहीतरी टाईमपास म्हणून टिव्हीवर चॅनल फिरवीत होतो. एका चॅनलवर सुप्रसिद्ध 'सरफरोश' चित्रपट लागलेला दिसला.
एक महात्मा
एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला.
रस्ता होता त्याचा दूरचा, आणि अगदी उंचावरचा,
आमच्या मानेवर मात्र पापांचे ओझे...
मान वर करुन पाहूही नाही शकलो, सन्मार्ग तयाचा.
नेणार होता तो स्वर्गाकडे आम्हांला - आपल्याबरोबर घेऊन,
आम्ही मात्र पाताळातच गेलो - मोहाच्या पाशात अडकून.
एक युधिष्ठिर होऊनी गेला - 'कुत्र्या'साठी स्वर्गही नाकारला,
देवांचा राजा रथ घेऊनी उभा - त्यालाही अट्टाहास हा न उमगला !