शब्दजोड्यांचा खेळ

Submitted by तोमीन on 1 March, 2020 - 07:39

नमस्कार
मराठी दिनानिमित्त आम्ही आमच्या मित्रपरिवारात काही खेळ खेळलो.
त्यापैकी एक शब्दखेळ आपल्या विरंगुळ्यासाठी आणि भाषाज्ञानाला चालना देण्यासाठी इथे देत आहे.

खाली दिलेल्या शब्दजोडीची समर्पक उत्तरे द्यायची आहेत. दोन्ही उत्तरे ३ अक्षरी आहेत. जोडीच्या दोन्ही उत्तरांची पहिली दोन्ही अक्षरे समान आहेत. तर फक्त तिसरे भिन्न आहे.

उदा: मधला / दलाल
उत्तर आहे : मध्यम / मध्यस्थ
……..

०१ प्रीत /ओंकार
०२ सहाय्य /अनंग
०३ खटाटोप /प्रस्थान
०४ जुळे /एक शब्दालंकार
०५ लोक /संयोग

०६ बैठक / औषध
०७ एक प्राणी / सार
०८ स्वतःचा / खर्ची
०९ चंदेरी /परीट
१० अरण्य/ हलणारे

११ साधारण /वस्तू
१२ थारा /मठ
१३ सरसरीत /वाईट कृत्य
१४ गळू /नड
१५ खडबडीत / खोल

१६ बनावट/ वेलबुटी
१७ कावीळ/ इच्छा
१८ वर्ष / मायाळू
१९ कसब /ठोकायचे साधन
२० सर्व /जाण

२१. कंटाळवाणे/ एक फूल
२२ रसिक /जीभ
२३ ललाट / कापूस
२४ आड / रहित
२५ वाणी / वदंता

२६ यथार्थ / शोषणे
२७ सोटा /पुजारी
२८ भयंकर/ निश्चय
२९ असमान / कष्टी
३० सामुग्री /रक्षण

चला तर मग, करा सुरवात खेळाला......

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

12. आश्रय आश्रम
19. हातोटी हातोडी
23.कपाळ कपाशी
29.विषम विषण्ण

आताच, कायप्पावर असे कोडे आले होते,
तिकडे टाकलेले बहुसंख्य प्रश्र्न इथेही आहेत. अनुक्रमांक वेगळे आहेत.
IMG-20200301-WA0000.jpg

मामी, बरोबर.
मूळ कोड्यातील ५ प्रश्न ठरवून बदलले आहेत.
त्याची उत्तरे जरूर द्यावीत.
आभार .

२५. वाचा- वार्ता >>> चूक. शब्द ३ अक्षरी हवेत.

१७. कामीन - कामना >>>> कामला .

बाकी बरोबर.