भाषा

किशोर अन चांदोबा

Submitted by चैत्रपालवी on 12 October, 2019 - 00:29

लहानपणी.. "चांदोबा" आणि "किशोर" हे अंक आपणा सर्वांनाच वाचायला आवडत असत..

या दोन्ही लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला "चांदोबा" आणि "किशोर" मासिकाचे स्कॅन केलेले १९६० ते २००५ पर्यंतचे अंक मिळतील आणि ते डाऊनलोडही करता येतील... लिंक अवश्य Save करा..

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-EksNuzurbfZj72Dbso4rIsTq...

"किशोर" मासिकांसाठी लिंक..

पड रं पाण्या .....

Submitted by रमेश भिडे on 25 September, 2019 - 14:09

गेल्या महिन्यात कोकणात गावी गेलो होतो. संध्याकाळी गावाबाहेर फिरायला गेलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. छत्री असूनही नखशिखांत भिजायला झालं. कोकणात जोरदार बरसणाऱ्या पावसाला,'मुसळधार 'म्हणतात. म्हणजे पडणारी धार कशी?' मुसळा' सारखी (उखळातले जाडजूड, सरळसोट मुसळ). झोडपणारी! बाजूच्या भाताच्या खाचरात, डोक्यावर ईरली घेऊन एक शेतकरी उभा होता. झाडाचा भक्कम आडोसा घेत, मी त्याला विचारले," काय गाववाले! यंदा पाऊस कसा पडतोय? "पावसा पासून चेहरा वाचवत तो उत्तरला,"एकदम भारी !' सासूचा पाऊस'! भयंकर कडाडतोय! हाणतोय नुसता!"

विषय: 

तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात?

Submitted by केअशु on 15 August, 2019 - 08:43

आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.

असे का लिहिल्या - बोलल्या जाते ?

Submitted by वाट्टेल ते on 12 August, 2019 - 13:58

मायबोलीवर अनेक ठिकाणी खालील प्रकारची वाक्ये वाचनात आली. उदा.
अमुक एक लेख आवडल्या गेला आहे
या टॉवेलने पाणी चांगल्या प्रकारे शोषल्या जाते
राजाकडून प्रजेवर अन्याय केल्या गेला आहे.

एक ड्राइवर, सिंगापूर मधला !

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 23:50

परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर. त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात, तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!!

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग असतील त्याची प्रचितीच म्हणा ना !

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली.

Where did you learn hindi? माझा स्वाभाविक प्रश्न.

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर.

काव्य प्रकार :- त्रिवेणी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 13:01

त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो.
पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा सम्पूर्ण विषय बदलून टाकते
अश्याच माझ्या काही त्रिवेण्या इथे आपल्या समोर सादर करतो ....
.
त्रिवेणी
.
1) तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
.
2) इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
.
3) रडताना पहिलीय माय रात्रभर

भाषेशी खेळू नका

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 June, 2019 - 12:38

भाषेशी खेळू नका
************

भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी

कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी

भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी

एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी

आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही

शब्दखुणा: 

मुलासाठी ना व सु च वा

Submitted by manasi0987 on 21 June, 2019 - 06:46

मु ला साठी स वरून संस्कृत नाव हवे आहे. किंवा ज्या नावाचा अर्थ कृष्ण किंवा विष्णु असेल असे नाव हवे आहे.कृपया सुचवावे.किंवा एखादे छान नाव वरील criteria madhe नसेल बसत तरीही हरकत नाही.धन्यवाद

मायबोली

Submitted by सागर सावंत on 18 June, 2019 - 09:58

मायबोली
माय मराठी, आई मराठी
वाढलो आम्ही बोलत मराठी
नाव मराठी, गाव मराठी
अनं हावभाव आमचे ते बी मराठी.

संतांची वाणी मराठी,
सहयाद्रीची गाणी मराठी
शिवशंभूंचे राज्य मराठी
अनं भगवे आमुचे रक्त ते बी मराठीचं

शिरकाव झाला परभाषेचा
कोनीच न उरला वाली
पेचात पडली आमुची मायबोली

धुंद झाली आमुची मती
आमचीचं आम्ही केली माती
सांगावे लागेल जगाला
आमची मराठी काय होती

विषय: 
शब्दखुणा: 

बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भाषा