Submitted by पाचपाटील on 24 June, 2020 - 00:33
बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.
बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं.
कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं.
बोलणं, माझ्यासारखं, आधी.
लिहिणं, तुझ्यासारखं, नंतर.
बोलणं, मौनातून, शक्य आहे.
लिहिणं, मौनातून, जमलं पाहिजे..!
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कविता छानच!
कविता छानच!

धन्यवाद
धन्यवाद
खूपच छान...
खूपच छान...
धन्यवाद रूपाली विशे-पाटील
@रूपाली विशे-पाटील... धन्यवाद..!
वा, खूप सुंदर
वा, खूप सुंदर
डीप्लोमसीटाईप...
सॉरी, समर्पक असेल जरी तरी खटकतोय शब्द
@तेजो खरंय.. असलंच काहीतरी
@तेजो.. ^^खरंय..पण असलंच काहीतरी तोंडात येतं पटकन.. उदाहरणार्थ सँडविचटाईप भूक ...