लॉकडाउन इफेक्ट
नुकतीच सुचलेली एक कविता व्हाट्सअप स्टेटस ला ठेऊन (त्याच्याशिवाय तुम्ही कवी आहात असं लोक आता मानत नाहीत) मी माझ्या कामात व्यस्त झालो. थोड्या वेळाने मोबाइल स्क्रीन वर माझी नजर गेली तेव्हा नोटीफीकेशन मधे मेसेज होता "मला माहित न्हवत तू इतकं छान लिहितोस" माणुस कौतुकाने हुरळून जातो(आणि त्यातली त्यात जर ते एखाद्या मुलीने केल असेल तर विचारायलाच नको). हातातलं काम खाली टाकुन मी मेसेज कुणाचा आहे ते पाहील तर ती माझी शाळेतली मैत्रीण होती आणि आज पहिल्यांदाच ईतक्या वर्षाने तिने मला मेसेज केला होता.