गझल- माणूसकी मनाची तेथून दूर टळते
" माणूसकी मनाची तेथून दूर टळते -"
दु:खात त्यास पाहुन काळीज आत जळते
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते
ती मेनका न येथे ना मी कुणी ऋषीही
भीती मनास माझ्या का नेहमीच छळते
समजावतो मनाला अपुले न येथ कोणी
आशा परी मनाची सगळीकडेच पळते
झाकावयास अंगा घे आवरून पदरा
जाईल तोल माझा मन त्याकडेच वळते
दंगे समोर होता बघती निवांत सारे
माणूसकी मनाची तेथून दूर टळते
.