Submitted by विदेश on 25 February, 2014 - 03:17
" माणूसकी मनाची तेथून दूर टळते -"
दु:खात त्यास पाहुन काळीज आत जळते
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते
ती मेनका न येथे ना मी कुणी ऋषीही
भीती मनास माझ्या का नेहमीच छळते
समजावतो मनाला अपुले न येथ कोणी
आशा परी मनाची सगळीकडेच पळते
झाकावयास अंगा घे आवरून पदरा
जाईल तोल माझा मन त्याकडेच वळते
दंगे समोर होता बघती निवांत सारे
माणूसकी मनाची तेथून दूर टळते
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह विदेशजी ! किती दिवसांनी
वाह विदेशजी ! किती दिवसांनी आणि तेही गझल घेवून ...
वाह !
निर्ढावल्या मनाच्या<<< असे हवे आहे काय ? टायपो सुधाराल का
असो
खयाल जमीन सफाईदारपणा (शैलीदारपणा)फार आवडला
सगळेच शेर छान अलगद उतरवलेत
अजून येवूद्यात विदेशजी
अजून येवूद्यात
शुभेच्छा व धन्स
निर्ढावल्या मनाचा ना काळजास
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते.. म्हणजे,
"तो " तशाच मनाचा, पण माझ्या काळजास ते कळत कुठे कळते .
चांगल्या प्रतिसादाबद्दल आभार, वैभव !
आभारबद्दल आभार मला आता आपला
आभारबद्दल आभार
मला आता आपला अपेक्षित अर्थ उमगला
पुनश्च धन्स
आवडली
आवडली
अरविंदजी, प्रतिसादाबद्दल आभार
अरविंदजी,
प्रतिसादाबद्दल आभार .