कास पुष्प पठार - धावती भेट
केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
दव बिंदू आहे मी हिरव्या ओल्या पानावरचा
मी प्रतीकच ठरलो आहे क्षणभंगुरतेचा
माझी क्षण भंगुरता आहे शाप कि वरदान
कोणाचे असावे का आयुष्य माझ्या समान
या इवल्या जीवनी चातकाची मी भागवतो तहान
आकर्षक वाटे हर एकास असुनी इतकास लहान
क्षणात रूजुनी उगवतो रोपातुनी कोठे ना कोठे
तुम्हीच ठरवा आयुष्य सुंदर असावे कि मोठे
पूर्व प्रकाशित : www.davbindu.com
पृथ्वीवर वनस्पति प्राण्यांच्या आधी निर्माण झाल्या. इथे प्राणी हा शब्द मी वनस्पति सोडून बाकी सर्व सजीव, अशा व्यापक अर्थाने वापरतोय. पण नंतर निर्माण झालेले प्राणी, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी वनस्पतिंवरच अवलंबून आहेत. भले ते मांसाहारी का असेनात, ते ज्या अन्नसाखळीचा हिस्सा आहे, त्या साखळीचे एक टोक, वनस्पति हेच असते.
निसर्गात अशी देवाणघेवाण एकतर्फी नसते. प्राण्यांची उत्सर्जिते, वनस्पतिंना अन्न पुरवतात हे खरे आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.