अंकाचे गाणे
Submitted by प्रतिभारिसवडकर on 6 February, 2014 - 06:20
अंकामध्ये पहिला एक
आपण सारे होऊ एक
एक नि एक झाले दोन
शहाण्यासारखे वागणार कोण
दोन नि एक झाले तीन
आईच्या कामाला मदत करीन
तीन नि एक झाले चार
वडील माणसांना नमस्कार
चार नि एक झाले पाच
कविता नि धडे नीट वाच
पाच नि एक झाले सहा
व्यायाम करून बळकट व्हा
सहा नि एक झाले सात
जेवताना काही टाकायचे नाही पानात
सात नि एक झाले आठ
वाचता लिहिताना बसायचे ताठ
आठ नि एक झाले नऊ
मुक्या प्राण्यांवर दया करू
विषय:
शब्दखुणा: