पंढरीचा वारस
Submitted by पुष्कर एकतारे on 1 December, 2013 - 11:10
पंढरीचा वारस
पंढरीच्या विटेचा । वारस शोधाया ।
निघाला माझा । विठुराया ।
धुंडिले तयाने । भक्ताचिये दारी ।
नसे त्या वारी । एकादस ।
शोधि तो योग्यांत । तपस्वी साधुंत ।
त्यांना भ्रांत फक्त । मोक्षाची ।
देवतांचा स्वर्ग । म्हणे अध्यात्माचे धाम ।
त्यांचे खरे काम । अप्सरांत ।
जगी मग तो । संतासिये पाही ।
खरा संत काही । सापडेना ।
वारसाचा शोध । फळाला न आला ।
पुन्हा तो राहिला । विटेवरी ।
विठुच्याही डोळी । अंती आले पाणी ।
अन् गेले वाहोनी । तमा कोणा ।
विषय:
शब्दखुणा: