कविता

"दु:ख "

Submitted by मैथिलीपिंगळे on 2 April, 2015 - 18:23

भोगले जे दु:ख त्याला दु:ख तरी म्हणू कसे
हरेक क्षणी सुखाची आस होती
तुझी आश्वासक साथ होती
पण हाय रे , दुर्दैव माझे की
नावातच माझ्या वनवास होता
फक्त त्या वाटेवर उब तुझी यादगार होती

आजही ते दु:ख पांघरावे वाटते
दु:खाचेही साजरे करावे म्हणते सोहळे
कारण तूच फुलवलेस ताटवे वनवासी या
म्हणूनच झेलले हे दु:ख त्याला दु:ख म्हणवत नाही रे
शेवटी तू कितीही टाळलेस तरीही
हेच खरे की , नावातच माझ्या वनवास होता .....

-मैथिली

शब्दखुणा: 

--

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अवकाश आतले
भेदून जावे
-- आकाश व्हावे

____

ऐकवावी कुणाला?
मनातील गाज
.. शब्दांना नाही जाग

प्रकार: 

वळीव...

Submitted by अतुल. on 18 March, 2015 - 01:57

ज काहीतरी कुरबुर
तो तसाच गेला ओफिसला
नेहमी कवेत घेऊन चुंबन
आज मागे वळुनही न पाहीलेला
.
ती आता एकटीच घरी
सारे आसमंत उन्हाने पेटलेले
रिकामे रिकामे तिचे घर
एकटीला खायला उठलेले
.
दुपारी अवचित बेल वाजली
मेघांचा गडगडाट सुरू झालेला
हुरहुरत्या नजरेने तिने पाहीले
बाहेर अनपेक्षित पणे तो आलेला
.
दरवाजा उघडला वीज कडाडली
नेत्र कटाक्षांचा खेळ सुरू झालेला
सुटले बंधन आवेगाने आलिंगन
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
-अतुल

शब्दखुणा: 

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

Submitted by विदेश on 29 January, 2015 - 03:34

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..
.

शब्दखुणा: 

"अवकाळी"

Submitted by -शाम on 2 January, 2015 - 00:11

"अवकाळी"
_________________________

अवकाळी तो येतो आता
अवकाळी गातो गाणी
माघारी फिरतात पाखरे
चोचीचे गिळुनी पाणी

पानांसोबत झिम्मा खेळुन
कणसे सारी आसडतो
मुळाखालच्या ईच्छा सार्‍या
मुळापासुनी हासडतो

झुकता झुकता मोडुन पडतो
धांड्यांचाही ताठ कणा
पाण्यावरती उरती केवळ
हिरवाईच्या जन्मखुणा

बघता बघता चिल्यापिल्यांचा
घास माखतो चिखलाने
हक्काने लुटल्या रानाचे
कोण ऐकतो गार्‍हाणे

जन्मच ज्याचा पाण्याचा अन्
हातपायही पाण्याचे
त्याला कैसे दु:ख कळावे
स्वप्ने वाहून जाण्याचे

शब्दखुणा: 

दूर माझे गाव होते

Submitted by शिवम् on 29 December, 2014 - 05:12

डोंगराची रांग होती, पाखरांचे गाण होते,
त्या तिथे पलिकडे हो, दूर माझे गाव होते...

नागमोडी वाट होती, सोबतीला भव्य वाडे..
कोपर्याला त्या नदीच्या, विखुरलेले कैक पाडे..
तो वडाचा पार होता, एक अन् देऊळ होते,
त्या तिथे पलिकडे हो, दूर माझे गाव होते...

गावची हो शान होती, आमुची ती प्रिय शाळा...
चिंच, गोट्या, आमराई, दर सुटीचा ठोकताळा..
ती नदीपण माय होती, शेत-वावर बाप होते...
त्या तिथे पलिकडे हो, दूर माझे गाव होते...

शांत आता गाव झाले, क्षुब्ध अन् ऊदास झाले,
त्या दुष्काळाने सदाच्या, तोरणे गळफास झाले...
शेत झाले वाळवंटे, जे कधी कसदार होते..
त्या तिथे पलिकडे हो, दूर माझे गाव होते...

शब्दखुणा: 

बरे वाटले....!

Submitted by अविकुमार on 26 November, 2014 - 18:12

बरे वाटले....!

नकार-होकारावर कधीचे शब्दही होते अडले,
आसवांतून अखेर बोलून गेली... बरे वाटले....!

सव्वा रुपया, चार फुले... अन् नारळही नाही!
स्वस्तामधला सौदा..."माऊली"!... बरे वाटले...!

घाव केले हृदयावर त्यांनी... शब्दांचेच होते,
कट्यार नव्हती बगलेखाली... बरे वाटले....!

दारामध्ये ताटळलो कधीचे दोघे आम्ही,
श्वानाला तरी त्या भाकरी मिळाली... बरे वाटले...!

फुलली 'कमळ'दले अशी 'शरदा'त अचानक...
जादू कोणती रातोरात झाली?... बरे वाटले....!

असह्य होते शिवार जळते एकट्यानेच पहाणे
मृत्यो!..तव साथ मिळाली....बरे वाटले...!

दुध-दह्याच्या अभिषेकांची 'सावळी' पाऊले,

शब्दखुणा: 

अजुनी बसून आहे

Submitted by विदेश on 7 November, 2014 - 13:18

(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..

मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..

का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..

हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.

शब्दखुणा: 

खेळ जीवनाचा

Submitted by यःकश्चित on 7 September, 2014 - 01:57

खेळ जीवनाचा
=====================

खेळता हा जीवनाचा खेळ सारा
जाहला आता जिवाचा खेळ सारा

दान टाके का मनीच्या भावनांचे
संपला होता कधीचा वेळ सारा

का कळेना अर्पितो मी प्रेम माझे
मोडला होता मनांचा मेळ सारा

गुंतलो ना राहिले मज भान माझे
फाटला हा भावनांचा पीळ सारा

माजला कल्लोळ या मनी भावनांचा
मामला या प्रेमिकेचा निर्भेळ सारा

- प्रतिकवी

सुख !!

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2014 - 00:24

सुख !!

अंगणात किलबिल
उठे झुळुक मनात
कोण वेडा गातो गीत
अशा एकट्या बागेत

चाक खुर्ची हळु नेत
हले आशा काळजात
असेल का अजून तो
जरा थोडा बागडत

एक उनाड पाखरु
फुलासवे झोंबू पाहे
त्याला पाहता पाहता
तिचे नेत्र भरु वाहे

कितीतरी वरुषात
कोणी आले अवचित
रखरख मिटे सारी
आज सुख बरसत...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता