नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

Submitted by विदेश on 29 January, 2015 - 03:34

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर
गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. >>>
स्वताच्या श्रीमंतीचा रुबाब नसणं आणि दुसर्याच्या श्रीमंतीचा हेवा न वाटणं खरच फार अवघड असतं.