[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….
आयुष्य प्लुटो सारखं जगावं.
कुणी येतात शोध घेतात
नवीन मित्र सापडला म्हणतात
मोठे नाव सन्मान देतात.
.
कालांतराने, "हा तर खूप छोटा" म्हणतात.
"मित्र व्हायच्या लायकीचा नाही" म्हणतात.
पुन्हा जवळून येऊन निरखून जातात
"काय करावे याचे" बोलतात.
.
हा लहान तो मोठा करणारे
द्विधा मनाचे छोटे छोटे जीव.
.
असो. त्यांचे त्यांच्यापाशी.
अनेक येतील. अनेक जातील.
आपण मात्र आपले, सूर्य रुपी
ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं.
.
इथे या विहीरी कडेला उभा मी निहाळीत आहे जुन्या सावल्या
इथे रीघ लागे इथे होय झुंबड इथे रोज येती किती बाहुल्या
कुणी हासता बोलता माठ भरती कुणी लाडलाडे करी मस्करी
कुणी लागता फक्त हंड्यास हंडा शिव्याशाप देवून गलका करी
इथे होय देवाण घेवाण सारी कुठे कोण गेली कुणा सोबती
कुणाचा न आला सणाला मुऱ्हाळी उपाशीच निजली कशी कोणती
दिसे वाट माहेरची आस लागे निरोपास व्याकूळ मनबावरे
कधी भेटले जर कुणी गावचे तर खुशीनेच नेत्री झरा पाझरे
पदर खोचलेली खुळी अर्धओली बटा सावरीता हसे मंदशी
घटांच्या उतारात उतरून पाणी उरी भेट घेई कि सजणी जशी
म्हताऱ्या वडाचा जिथे पार होता तिथे मी रिकामाच टेकायचो
धुंद पाऊस रम्य गारवा
झरझर झरतो तनुवर मारवा
त्याच्या मिठीतही तुझेच भास
नजरेत इंद्रधनु ओलेते श्वास
श्वासांची लय गंधित स्वर
लाडिक मिठी तरीही कातर
गंधाळल्या तनुस शब्दांचाही भार
श्वासांच्या लयीत जणू मेघमल्हार
आठवांचा वळीव बरसतो जरी
मन धुंद हळवे तरी
प्रेमाची सय घेऊन वारा
वेचित जाई आसमंत सारा
मधाळ स्पर्श अल्लड मिठी
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी!
त्या खर्या कविता..म्हणुनी
शब्द कल्पना सांगत नाही.
येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?)
अश्या कुठे त्या.. थांबत नाही.
बोलावुनी वा हाकारुनी त्या
ढुंकुन कधिही पहात नाही.
आणि घेतले टाळे लावुनी
येणे-असता.. रहात नाही.
बासरी ,पुंगी..नाद कसाही
निश्चित त्यांचे स्वरूप नाही.
किंवा स्वये त्या नाद-घेऊनी
येतील..त्याचे अप्रुप नाही.
वार्या समं ते शब्द वाहती
कवेत त्यांना घेता.. नाही.
कुठला परिसर ..माळं कोणता?
पडणे निश्चित..रुजणे नाही!!!
छंद..मुक्त वा बंध...कसेही!
काहि त्यांना सांधत नाही.
आशय जरं का असेल पक्का
कशानीच मगं वांधत नाही.
काव्याचा हा प्रांत असा की
भोगले जे दु:ख त्याला दु:ख तरी म्हणू कसे
हरेक क्षणी सुखाची आस होती
तुझी आश्वासक साथ होती
पण हाय रे , दुर्दैव माझे की
नावातच माझ्या वनवास होता
फक्त त्या वाटेवर उब तुझी यादगार होती
आजही ते दु:ख पांघरावे वाटते
दु:खाचेही साजरे करावे म्हणते सोहळे
कारण तूच फुलवलेस ताटवे वनवासी या
म्हणूनच झेलले हे दु:ख त्याला दु:ख म्हणवत नाही रे
शेवटी तू कितीही टाळलेस तरीही
हेच खरे की , नावातच माझ्या वनवास होता .....
-मैथिली
आज काहीतरी कुरबुर
तो तसाच गेला ओफिसला
नेहमी कवेत घेऊन चुंबन
आज मागे वळुनही न पाहीलेला
.
ती आता एकटीच घरी
सारे आसमंत उन्हाने पेटलेले
रिकामे रिकामे तिचे घर
एकटीला खायला उठलेले
.
दुपारी अवचित बेल वाजली
मेघांचा गडगडाट सुरू झालेला
हुरहुरत्या नजरेने तिने पाहीले
बाहेर अनपेक्षित पणे तो आलेला
.
दरवाजा उघडला वीज कडाडली
नेत्र कटाक्षांचा खेळ सुरू झालेला
सुटले बंधन आवेगाने आलिंगन
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
बाहेर वळीव तूफान गर्जत आलेला
.
-अतुल
नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..
निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..
गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..
गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..
भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..
.