कविता

पाऊस

Submitted by Godeya on 7 September, 2016 - 07:42

सर सर शिवार
हिरवं रान

भिजली जमिन
रानोमाळ

गंध पसरे
चोहिकडे

फिरत राही
काही वेडे

उनाड वारा
भरभरारा

कुठं राहिला
गांव माझा...!

गोदेय १६

विषय: 

लॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची "शलॉट".....

Submitted by अशोक. on 10 July, 2016 - 13:05

~ परवा ८ जुलै रोजी पर्सी शेलीची जयंती होती. त्या निमित्ताने त्याच्या "Ode to the West Wind" चे वाचन करत असताना पहिल्या ओळीतील "O Wild West Wind, thou breath of Autumn's being...." पासून त्याने केलेले अतिशय सुंदर असे निसर्ग वर्णन भावत असतानाच मला आठवत गेली लॉर्ड टेनिसनची जगप्रसिद्ध कविता "The Lady of Shalott". हळवी आणि करूण रसाचा वापर केलेली ही एका तरुणीची शोकांतिका. ह्या दीर्घ कवितेत टेनिसनने एका युवतीची कहाणी प्रकट करून सांगितली आहे. इंग्रजी साहित्यातील "Ode" या गीत प्रकारातील ही चार भागाची कविता.

विषय: 
शब्दखुणा: 

भगीरथ तप तुटो

Submitted by चितस्थधि on 7 July, 2016 - 13:57

भगीरथ तप तुटो
जटा सुटो
अवतरलेल्या गंगेला
पुन्हा प्रवाह फुटो....

खांब तुटो
शिळा फुटो
गाभाऱ्यातल्या देवाला
पुन्हा देहभान सुटो

किनारे तुटो
गुरुत्व सुटो
माणसांच्या धरित्रीला
पुन्हा विनाश नांदो

भाव तुटो
सत्व-रज-तम सुटो
उपद्व्यापी चैतन्याला
पुन्हा निराकार मिळो...

चितस्थधि

शब्दखुणा: 

आई

Submitted by अमितवा on 21 April, 2016 - 13:14

। आई ।

का सोडून गेलीस वासराला ?
कोण देई मज वात्सल्य तुझ्याविना ?
कोण भरवी मज घास तुझ्याविना ?

का दूर केलेस मज मातेस ?
काय अपराधांची हि शिक्षा ?
असे का प्रारब्ध दिले मज ?
कसा हा तुझा न्याय ?
केले पोरके या बाळाला

तुझ्यावीना अपूर्ण सारे सुख
तुझ्यावीना अपूर्ण हे उत्सव
कोण देई मज आशीर्वाद

तुझ्यावीना अपूर्ण हि भक्ती
कोण करी मज मार्गदर्शन
तुझ्यावीना अपूर्ण माझे स्वप्न
कसे होतील पूर्ण तुझ्यावीना

# अमितवा

शब्दखुणा: 

कुंजविहारी हसे का मनी -

Submitted by विदेश on 26 March, 2016 - 14:49

कुंजविहारी हसे का मनी -
निद्राधीन ती राधा बघुनी

नयनी उतरे शाममुरारी
हळूच नकळत स्वप्न होऊनी

स्वप्नामधली राधा बावरी
गेली सगळे सत्य समजुनी

हसे खुदुखुदू झोपेमधुनी
खट्याळ कृष्णाची मोहिनी

देशी रे किती त्रास तू मजला
वदते राधा जात मोहुनी

मोरपीस मग अलगद गाली
कान्हा हसतो लबाड फिरवुनी

खोड्या वाढता म्हणते राधा
जा तू आता निघून येथुनी

स्वर राधेला गोड ऐकवी
मुरलीधर हळु पावा काढुनी

नयने उघडी राधा अपुली
मधुर सूर ते पडता कानी

आत्ता होता कुठे कन्हैया
शोधत हसते घरभर फिरुनी

शब्दखुणा: 

नजरानजर अचानक

Submitted by विदेश on 18 March, 2016 - 10:34

समजावले मनाला
माझ्या कितीतरी मी
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..

का ऐकते न मन हे
सांगीतले जरी मी
वळुनी पुन्हापुन्हा का
बघते तुलाच नेहमी..

गर्दी बघून तिकडे
रुसतो मनी इथे मी
एकांत पाहुनीया
हसतो खुषीत नेहमी..

नजरानजर अचानक
होतोच बावरा मी
त्रेधा उडे कशी मग
अवघड स्थितीत नेहमी..
.

शब्दखुणा: 

झिरपत गेलेली कविता घेऊन

Submitted by आनंद संजय जलताडे on 12 March, 2016 - 08:39

झिरपत गेलेली कविता घेऊन
मी चालतो माझीच वाट
ओली-कोरडी, वेडी वाकडी

तिची सुरुवात एका क्षणांत होते
आणि अंत होत नाही
चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, डोळे खोल जातात..
पण आत ती नवजातच असते

तिच्या चिरंतनत्वाचा ध्यास
माझ्या लेखणीतून झरतो.
कागदावर ती स्वतःचं अस्तित्वच
जणू कोरत जाते.....कायमचं

कुंचल्यांचे फटकारे जसे
ध्रुवासारखे स्थिरावतात
शिल्पातले आकार जसे
अचलासारखे उभरतात
तिचीही धडपड तशीच असते

तप्त कोरड्या जमिनीवर
ती बरसून झिरपू पाहते
स्वतःला रुजवू पाहते
कधी तिचा वृक्ष होतो
कधी मृदगंध होऊन उडून जाते

तिच्या अस्तित्वाला मात्र कधीच बाधा येत नाही

शब्दखुणा: 

पत्रं

Submitted by मिल्या on 4 March, 2016 - 04:14

पूर्वी तू मला खूप पत्रं पाठवायचीस

मी ही तासनतास उताणा पडून छातीवर पत्रं ठेवून, डोळे बंद करून ती वाचत असे.

हो हो डोळे बंद करून... कारण तुझी पत्रं वाचायला मला डोळ्यांची गरजच नसे.

अजूनही तू मला खूप पत्रं पाठवतेस...

पण काही केल्या ती मला वाचता येत नाहीत.

एकतर तुझे अक्षर बदललेयं आणि...

माझेही डोळे आता उघडलेत.

- मिलिंद छत्रे

शब्दखुणा: 

आमचे आजोबा

Submitted by विदेश on 3 March, 2016 - 13:11

दोन पाय अन आधार काठी
तीन पायांचे आमचे आजोबा..

पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..

दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..

धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..

गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..

चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..

नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..

................ विजयकुमार देशपांडे
.
.

शब्दखुणा: 

बसते बिचारी एकटी आजी -

Submitted by विदेश on 1 March, 2016 - 00:45

बसते बिचारी एकटी आजी
देवापुढती वाती वळत
असते मुखात नामस्मरण
कधी तिचे ना कंटाळत..

गत आयुष्याचा पाढा
असते स्वत:शीच उगाळत
गालावर एखादा अश्रू
नकळत येई ओघळत..

सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..

सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..

........ विजयकुमार देशपांडे
.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता