Submitted by विदेश on 3 March, 2016 - 13:11
दोन पाय अन आधार काठी
तीन पायांचे आमचे आजोबा..
पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..
दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..
गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..
चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..
नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..
................ विजयकुमार देशपांडे
.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा