पत्रं

Submitted by मिल्या on 4 March, 2016 - 04:14

पूर्वी तू मला खूप पत्रं पाठवायचीस

मी ही तासनतास उताणा पडून छातीवर पत्रं ठेवून, डोळे बंद करून ती वाचत असे.

हो हो डोळे बंद करून... कारण तुझी पत्रं वाचायला मला डोळ्यांची गरजच नसे.

अजूनही तू मला खूप पत्रं पाठवतेस...

पण काही केल्या ती मला वाचता येत नाहीत.

एकतर तुझे अक्षर बदललेयं आणि...

माझेही डोळे आता उघडलेत.

- मिलिंद छत्रे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users