Submitted by फेरफटका on 10 February, 2014 - 10:59
धूसर होत, विरत जाणारी संध्याकाळ,
क्षितीजावर उधळीत जाते अनेकस रंग,
तुझ्या आठवणींचे....
हिरवे, पिवळे, जांभळे, ... कितीतरी..
काही ओळखीचे.... बरेचसे अनोळखी,
पण तरिही हवेहवेसे....
प्रत्येक रंग असतो अनाघ्रात.....
तुझा नाजुकसा स्पर्श झेलूनही...
तुझा शब्द न शब्द रंगवणारा प्रत्येक रंग,
घेऊन येतो नि:शब्दतेचं अबोल वरदान.....
अन प्रत्येक रंग असतो, तुझ्या श्वासातला उष्णावा माझ्यापर्यंत पोहोचवणारा, एक सुगंधी दूत.
सगळेच रंग कसे हवेसे वाटणारे, मनाला मोहवणारे,
तुझ्या डोळ्यातल्या नशेसारखे..... झिंगवणारे...
अंतरीचा कण न कण पुलकित करणारे.....
खरं सांगू सखे, हे सगळे रंग नुसतेच रंगवतात....
..... भिजवत नाहीत मला..
कारण, रंगांची रांगोळी जेव्हा तारा छेडते ना मनातल्या सतारीच्या..
तेव्हा एकच सूर शोधित रहातो मी .... वणवण करित...
तुझ्या अंतरंगातील शुभ्रतेचा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा