Submitted by विदेश on 16 December, 2013 - 02:17
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)
नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |
कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|
'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|
जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव .. |३|
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लै भारी! म्हणून पाहिली. मस्त
लै भारी! म्हणून पाहिली. मस्त लय जमते!!
http://abhivachan.blogspot.in
http://abhivachan.blogspot.in/2013/12/blog-post.html
हेच विडंबन इथे ऐकता येईल.