Submitted by बोबो निलेश on 10 February, 2014 - 11:50
वरटीप - कुणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही.
लोखंडी खाटेवर - विडंबन कविता (गाण्याशी संबंधित सर्व थोर आणि महान मंडळींची आणि रसिकांची माफी मागून… )
चाल - मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग
-----------------------------------------------------
लोखंडी खाटेवर अंग निजून दुखतंय ग
सांगा या ढेकणास रक्त शोषून पीडतोय ग।।धृ ।।
सूळसूळतो गोधडीत हाच दुष्ट मेला ग
हुळहुळतो चाव्याने अजून देह सारा ग ।।१।।
अजून तुझे काविळीचे डोळे पिवळे पिवळे ग
अजून तुझ्या देहामध्ये त्राण नाही उरले ग ।।२।।
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा