*****
नमस्कार मंडळी.
आपला गणेश उत्सव मजेत सुरू आहे. डेकोरेशन पासून ते आरती पर्यंत, सगळीकडे मस्त तयारी झाली आहे. केवढी ही तयारी आणि धावपळ. बापरे ! थकला असाल ना? पोटातील कावळे काय म्हणतात?
"सुग्रासी दर्शने जाहला जठराग्नी प्रबळ
वदनी कवळ ... बोलावयासी थांब हा पळभर " !!
खड्ड्यातील चिकन
खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी
Dabba Chicken..
(पाककृती)
साहित्य: (५ कोंबड्यांसाठी)
दालचिनी पावडर : ६ चमचे
वेलची पावडर : १० ते १२ वेलच्यांची
खसखस : २ चमचे
कोथींबीर : ८ ते १० काड्या
आले -एक इंची : अदमासे १० नग
काळीमिरी पावडर : १ चमचा
लसूण : ४ ते ५ आख्खे कळे
वरील सर्व साहित्याचे वाटण करून घ्यावे
साहित्य :
सॅलड -
१) १ कप पर्ल कुसकुस
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार
४) हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
टँगी योगर्ट सॉस -
१) ३/४ कप घट्ट दही
२) वाळलेला किंवा ताजा पुदिना
३) लिंबाचा रस चवीनुसार
४) बारीक कुटलेली मिरी व मीठ चवी नुसार
सजावटीकरता -
१) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप
गंमत जंमत म्हणत म्हणत
करणी रात्री केली जाते
कविच्या बोटांना
कवितेची धार लागते
भळभळणार्या कविता
कश्या आवरू समजत नाही
डकौघाने नुसता
ट्यार्पी वाढत जाई
रडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा
(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)
विसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.
आजकाल बरेचदा पुरुष मंडळी पाककृती लिहितात, पण त्यात एक विशेष भाषा असते, जी नेहमी पाककृती करणाऱ्या पुरुषांना आणि सर्वच स्त्रियांना कळते. पण वर्षातून एकदा किंवा मैत्रिणीवर किंवा नव्यानेच लग्न झालेल्या / किंवा लग्न होवून बरेच वर्षात जिला चहाही करून न दिलेल्या (स्वतःच्या) बायकोवर छाप पाडायची असेल, तर अश्या पाककृतींचा विशेष उपयोग नसतो. म्हणून आम्ही (म्हणजे मी) पुरुषांनी पुरुषांकरिता लिहिलेल्या पाककृती हे (अनियमित) सदर सुरू करत आहोत. असो, नमनाला घडाभर तेल नको. (ही म्हण आहे, कृती नाही).
तर आजची पाककृती आहे, पालक कबाब. मूळ पाककृती तुम्हाला खालील दुव्यावर बघता येईल.
एखादा दिवस असा नतद्रष्ट उगवतो, किरकोळ कारणावरून सकाळी सकाळी पत्नीशी प्रचंड वैचारिक मतभेद (!) होतात. मुलाला शाळेत पिटाळून घेत असलेल्या पहिल्या चहातही अबोल्याची माशी पडते आणि ऑफिसला लवकर जायचे असल्याने वाद न मिटवता पळावे लागते. पहिल्या दोनेक तासांचा कामाचा रगाडा जरा आवरला की फोन करून अंदाज घेऊ म्हणत मी कार गॅरेजच्या बाहेर काढतो. घरासमोर वळण घेताना सवयीने रिअर व्ह्यू मिरर पाहिला जातो, पण टेरेसचा रोजचा प्रसन्न कोपरा आज रिकामा दिसतो. आता कामाचा दिवस पुढे दिसायला लागलेला असतो आणि मोठ्या रस्त्यावर आल्याने गाडी चालवण्याकडे लक्ष द्यायला हवे असते.
कॉकटेल्स, मॉकटेल्सबाबत आधी काहीच माहिती नव्हती. नोकरीसाठी दिल्लीत आलो आणि जरा शिंगं फुटली खरी पण या सगळ्या 'अक्वायर्ड टेस्ट्स' असल्याने त्यात अनुकरणाचा भाग जास्त होता. कधी कधी माकड-पाचर न्यायानुसार नको ते प्रयोग करून अंगाशी पण आले होते. कुठेसे पाहिले म्हणून बिअर मध्ये 'स्मॉल' जीन घालून बेफाम हाणल्यावर २४ तास सुषुम्नावस्थेत राहिल्याची कटू आठवण सुद्धा होती. दिल्लीत २००० सालाच्या आसपास लाऊंज बारचे नवे पेव फुटले होते.