तापास प्रयत्न (Spanish Tapas Style Dishes)
स्पेनमध्ये जाऊन सग्रादा फॅमिलिया, बुलफाईट्स, पायेया किंवा सांग्रीया इतकेच 'तपस'चा अनुभव घेणे बंधनकारक आहे.संध्याकाळी तपस खिलवणाऱ्या जागी जाऊन उत्तमोत्तम वाईन किंवा अगदी बियरसोबत या वैविध्यपूर्ण पण थोड्याथोड्या डिशेस येत राहतात आणि गप्पा सरता संपत नाहीत. तपस कसे करायचे याचे काही कडक नियम नाहीत. तळून, भाजून, उकडून, कच्चे कशाही प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आणि मांसाहारी, समुद्री पदार्थ वापरून पेश करायचे. आकर्षण वैविध्याचे आणि चवीसोबत दृश्यसुखाचेही. तपसच्या पारंपरिक सर्व्हिंग डिशेसही सुंदर असतात. टेराकोटाच्या या लाल गोल बाऊलना Cazuela म्हणतात.