तापास प्रयत्न (Spanish Tapas Style Dishes)

Submitted by अमेय२८०८०७ on 26 October, 2018 - 09:26

स्पेनमध्ये जाऊन सग्रादा फॅमिलिया, बुलफाईट्स, पायेया किंवा सांग्रीया इतकेच 'तपस'चा अनुभव घेणे बंधनकारक आहे.संध्याकाळी तपस खिलवणाऱ्या जागी जाऊन उत्तमोत्तम वाईन किंवा अगदी बियरसोबत या वैविध्यपूर्ण पण थोड्याथोड्या डिशेस येत राहतात आणि गप्पा सरता संपत नाहीत. तपस कसे करायचे याचे काही कडक नियम नाहीत. तळून, भाजून, उकडून, कच्चे कशाही प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आणि मांसाहारी, समुद्री पदार्थ वापरून पेश करायचे. आकर्षण वैविध्याचे आणि चवीसोबत दृश्यसुखाचेही. तपसच्या पारंपरिक सर्व्हिंग डिशेसही सुंदर असतात. टेराकोटाच्या या लाल गोल बाऊलना Cazuela म्हणतात.

स्पॅनिश चवीनुसार ऑलिव्ह ऑइल, लसूण, टोमॅटो, सॉसेजेस आणि सी फूड यांवर जास्त भर पण आपण आपल्या चवीही तयार करू शकतोच की.
आज केलंय त्यात तयारीचा जरा कुटाणा पण रिझल्ट झ्याक.

घटक व कृती:
1. भरलेले मशरूम्स
बटण मशरूम्सचे देठ काढून साफ करून धुवून कोरडे करून घ्या.
सारण म्हणून मशरूमचे काढलेले देठ, कांदा, सिमला मिरची आणि थोडा लसूण अगदी बारीक चिरून घ्या.

कोटींगसाठी घट्ट दही, काश्मिरी लाल तिखट, हळद, मीठ, मिरपूड, बारीक कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, थोडे ऑलिव्ह ऑइल आणि ब्रेडक्रंब्ज यांचे जाडसर मिश्रण करा,
मशरूम यांत मुरवत ठेवा
(हाच मसाला थोडा सारण परतताना व प्रॉन्ससाठीही वापरायचा आहे, जास्त करा)

सारणाचे घटक व कोटींगचा अर्धा चमचा मसाला थोड्या तेलात परतून घ्या, हे परतलेले सारण मशरूममध्ये भरून मशरूम थोड्या तेलात सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्या

2. एक लाल सिमला मिरची ग्रीलवर भाजून घ्या, थंड झाल्यावर वरचे काळे साल व आतील बिया काढून बारीक तुकडे करा, हे तुकडे व मेयोनीज यांचे डिप तयार करा

3. चेरी टोमॅटो आणि पातीचे कांदे एका ओव्हनप्रूफ बाऊलमध्ये घालून त्यांवर किसलेला लसूण, मीठ, मिरपूड व बलसेमिक व्हिनेगर घाला, 200 डिग्री से. वर 5-6 मिनिटे किंवा टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवा

4. मशरूम परतलेल्या तेलातच अननस कॅरॅमलाईज करून घ्या

5. झुकीनी किंवा स्क्वाशचे जाडसर पण रोल होतील इतपत लांबट काप करा, चिकन हॅम किंवा हॅमचे झुकीनीइतकेच लांब काप करा. झुकीनीला मीठ, मिरपूड, थोडं आलं लसूण लावून त्यावर हॅम ठेवून रोल करून घ्या आणि हे रोल कढई किंवा ग्रीलवर रोस्ट करा.

6. प्रॉन्सना हळद, मीठ लावून ठेवा, नंतर कोरडे करून कोटिंग मसाल्यात घोळवा आणि शॅलो फ्राय करून घ्या.

7. हव्या त्या ब्रेडचे कुरकुरीत टोस्ट करून घ्या, काही टोस्टवर डिप आणि एखादा चेरी टोमॅटो ठेवा

8. सलामीच्या चकत्या दोन्ही बाजूंनी परतून घ्या.

वाढणी:
सर्व पदार्थ लाकडी बोर्ड किंवा मोठ्या ट्रेमध्ये (किंवा वेगवेगळ्या बाऊलमध्ये) मांडून सर्व्ह करा.

(फोटोत उकडलेले अंडे एक्स्ट्रा आहे)

9064.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आणि फोटो. सोबत चांगलीशी रिओहा हवी फक्त !

स्पेनमधे सलामी / चोरिझोचे स्लाइसेस परतलेले कधी पाहिले नाहीत. इथे ( अमेरिकेत ) देखील क्युअर्ड / स्मोकड मीट स्लाइसेस नुस्त्याच सर्व्ह करतात .

मेधा,
सलामी किंवा क्युअर्ड मीटबद्दल बरोबर लिहीलंत, माझ्याकडे बिग बजारातील फ्रोजन सलामी होती, ती थॉ केल्यावर पाणी सुटतं म्हणून हलकी भाजतो इतकंच,
तापास असा उच्चार आहे का? मी कितीदा ऐकण्याचा प्रयत्न केला तिथे पण नीट कळलं नाही. म्हणूनच इंग्लिशमध्येही नाव लिहिलं,
शीर्षक बदलता येतंय पण बाकी मजकूर नाही. असो.

छान आहेत रेसिपीज. मस्त आउटडोर सेटिंग मधे आपण निवांत गप्पा टप्पा करत बसावं आणि दुसर्‍या कुणी असे पदार्थ एका पठोपाठ एक बिनबोभाट सर्व्ह करावेत यासारखं सुख नाही !! Happy

मस्त रेसिपीज अमेय. कार्ड पार्टी बार्बेक्यु साठी सुद्धा वेगवेगळया भारी आयडिया आहेत.
मला कधीचा एक प्रश्न पडला आहे. हयाच संदर्भात आहे म्हणुन इथेच विचारते..... सँडविच हॅम / सलामी असे पदार्थ वापरायच्या आधी भाजावेत का नाही? बेकन / सॉसेजेस नेहमीच भाजुन / परतुन / शिजवून घेते.

अमेय२८०८०७ , स्पेन मध्ये शुद्ध शाकाहारी तापास कसे ओळखायचे? कसे सांगायचे?
पुढील आठवड्यात जात आहे.
धन्यवाद

Pan con tomate, Padron peppers, olives. Mancheगो cheese, roasted red peppers, roasted asparagus are all veg. Garbanzo y espinaca is chick peas and spinach -vegetarian too. Torta espanola is made with eggs potatoes and onions.
You can also ask -no carne, no pollo, no pescados,

मस्त दिसतंय अमेय. Happy
@ मेधा, 'नो मीट' नाही समजणार का? नाहीतर नो लिस्ट मध्ये काही तरी एक सांगायला विसरायचं आणि तेच आणून द्यायचे.

>>"नो मीट' नाही समजणार का?<<
नो मीट हि अमेरिकन फुड ऑर्डर आहे, स्पॅनियर्ड्सना कितपत झेपेल याची शंका आहे. Proud

इथे अमेरिकेत भरपुर तापस रेस्तराँ आहेत आणि ते फक्त तापसंच (स्मॉल प्लेट, फिंगर फुड) सर्व करतात (अ‍ॅल्कहोल इज की रेवेन्यु जनरेटर). आणि या रेस्तराँकडॅ येणारी गर्दि बेसिकली "चिल आउट" होण्याकरता असते, पोट भरण्याकरता नव्हे... Happy

मस्त आहे पदार्थ.मैत्रेयी शी सहमत.मस्त बीच चेअर वर रात्री आरामात बसून लाटांचा आवाज ऐकत दुसऱ्याने सर्व्ह केलेले खायला मजा येईल ☺️☺️☺️

@ अनु,
धाग्यावरील तुमची पोस्ट शोधणे खुप सोपे जाते आहे. सिग्नेचर म्हणून प्रतीसादाखाली ३ स्मायली शोधायच्या. Happy

You can also ask -no carne, no pollo, no pescados, >>
हे उच्चारी नो कार्ने , नो पोयो, नो पेस्कादोस, शिवाय नो हुएवेस ( नो एग्स) असे सांगता येईल.

बार्सीलोना मधे अजून एक फेमस डिश पतातास ब्राव्हास - उकडलेले बटाटे त्यावर तिखट सॉस घालून देतात. ते पण शाकाहारी