एखादा दिवस असा नतद्रष्ट उगवतो, किरकोळ कारणावरून सकाळी सकाळी पत्नीशी प्रचंड वैचारिक मतभेद (!) होतात. मुलाला शाळेत पिटाळून घेत असलेल्या पहिल्या चहातही अबोल्याची माशी पडते आणि ऑफिसला लवकर जायचे असल्याने वाद न मिटवता पळावे लागते. पहिल्या दोनेक तासांचा कामाचा रगाडा जरा आवरला की फोन करून अंदाज घेऊ म्हणत मी कार गॅरेजच्या बाहेर काढतो. घरासमोर वळण घेताना सवयीने रिअर व्ह्यू मिरर पाहिला जातो, पण टेरेसचा रोजचा प्रसन्न कोपरा आज रिकामा दिसतो. आता कामाचा दिवस पुढे दिसायला लागलेला असतो आणि मोठ्या रस्त्यावर आल्याने गाडी चालवण्याकडे लक्ष द्यायला हवे असते.
आई मुंबईची त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की मामाकडे मुंबईला जायचं हे ठरलेलं होतं. बिचार्या बाबांची कामं मात्र चालूच असायची त्यामुळे ते आम्हाला घ्यायला सुट्टीच्या शेवटी चार-पाच दिवस आले तर यायचे. मुंबईत मनसोक्त हुंदडताना, मजा करताना बाबा आपल्याबरोबर नाहीत याचं मला थोडंफार शल्य वाटत असे. आईमागे बाबा नीट जेवत असतील की नाही, त्यांना चहा-पाणी कोण बघत असेल असे प्रश्न मला नेहेमी पडायचे. आई मात्र माहेरपण आणि सुट्टी पूर्ण एंजॉय करण्याच्या मूडमध्ये दिसायची.
माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं