मध्यपूर्व आशियातील खाद्य संस्कृती- माहेर मासिकात छापून आलेला लेख
मध्यपूर्व आशियातील खाद्यसंस्कृती
माहेर मासिकासाठी लिहिलेला हा लेख, नक्की कुठल्या महिन्यात छापून आला ते आठवत नाहिये. पण तेव्हा इथे देता येणार नव्हता म्हणून आत्ता पोस्ट करते आहे.
मध्यपूर्व आशियातील खाद्यसंस्कृती
माहेर मासिकासाठी लिहिलेला हा लेख, नक्की कुठल्या महिन्यात छापून आला ते आठवत नाहिये. पण तेव्हा इथे देता येणार नव्हता म्हणून आत्ता पोस्ट करते आहे.
"एकलीच निगालिस व्हय माय? सोबती नाय काय कुनी तुज्या?", मी आजुबाजुला, पुढे मागे बघत म्हटल, नाही आलं कुणी, चालतं ना एकट आलं तर?
"व्हय व्हय चालतय की, तसला कायबी नेम नाय बग इट्टलाचा, या म्हनतो समद्यास्नी",
"कोन गाव म्हनायच ?", मी गोंधळले होते, आता नक्की काय सांगु या माउलीला, नुकतीच पुण्यात आले म्हणून सांगू, औरंगाबादची आहे म्हणून सांगू का दुबईहुन आले म्हणून सांगु? माझा गोंधळ निरखत समोरुन दुसरा आवाज आला ,"-हाऊ द्ये बाई, कुटं कुनाला कळतय कोन कुठला अन कशाला आलाय ते",. "समदे येकाच जागेला जायचे आखिरला"
इथे काही न बोलताच चालतंय बहुतेक सगळं!
चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
कसा सांग सुटतो ग हातातला हात
स्वच्छ निळ्या आभाळाचा का ग तुला राग?
झाकोळता नभ पुन्हा येतेस धावून
दिसे बापुडेसे मग कोवळे हे ऊन्ह
नवी ओळ, नवे खूळ घेऊन येतेस
डोळ्यास जागाई तू ग देऊन जातेस
नित्य नव्या खुळापायी येई दाटून पापणी
प्राक्तनांची खूण अवघ्या जन्माच्या गोंदणी
ओळ धरून उशाला मन निजले थकून
तिथे भेटली कविता रडे तिला बिलगून
का ग वेळ लावियेला किती केले जपजाप
अंतरीचा तूच दीप; तूच ईश, मायबाप
(कधीकधी ओळखिची सापडते खूण
भेट होते आता अशी अधुनमधुन
काही रुसवे-फुगवे, काही शपथा वचने
कैक जन्म फिटू नये ऐसे कवितेचे देणे)
~श्यामली
ई-सकाळच्या दिवाळीअंकात माझी कविता छापून आलिये... माझ्यासाठी एवढा आनंद देणारी गोष्ट मायबोलीकरांबरोबर शेअर करणं हीच माझी यंदाची दिवाळी ....
मायबोलीकरांचे अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. अभिप्राय नक्की कळवा.